आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुळेच भारतात भव्य रेल्वे स्टेशन बनवण्याची परंपरा सुरु झाली.

भारतात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. रेल्वेला भारताची जीवनरेखा म्हटले जाते. भारताच्या खऱ्या सुंदरतेचे दर्शन करण्यासाठी बहुतांश लोकं रेल्वेचाच वापर करतात.एवढच नाही तर अनेक रेल्वे स्टेशन असे सुद्धा आहेत जे कोणत्या पर्यटन स्थळापेक्षा कमी नाहीत.

परंतु जर गोष्ट भारतातील सर्वांत सूंदर व मोठ्या रेल्वे स्थानकाची होत असेल तर तेव्हा तेथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाच उल्लेख केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

होय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील सर्वांत सूंदर व भव्य असे रेल्वे स्थानक आहे. चला तर मग जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाच्या काही खास व विशेष गोष्टी.. मुंबईत असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील सर्वांत सूंदर स्थानक समजल्या जाते. या स्थानकाचे नाव अगोदर विकटोरीया टर्मिनस असे होते नंतर हे नाव बदलून नव्याने छत्रपती “शिवाजी महाराज टर्मिनस” असे नामकरण करण्यात आले.

1996 च्या अगोदर स्टेशनची ओळख बॉंबे विकटोरीया टर्मिनस अशीच होती. 1996 ला भारतीय रेल्वेमंत्री असलेले श्री. सुरेश कलमडी यांनी पुन्हा नव्याने स्थानकाचे नामकरण “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असे केले.
जे आज पूर्ण भारतभर (CST) नावाने गाजतंय.

सी.एस. टी. स्टेशनचे आर्किटेक्चर एवढे सुंदर आहे की अनेक लोक सर्वप्रथम स्टेशनला व्यवस्थित पहात बसतात. हे स्टेशन भारतीय आणि युरोपीय स्थापत्य कलेचे एक जिवंत उदाहरण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

या स्टेशनचा निर्मितीवेळी भारतीय दगडांच्या सोबत इटालियन मारबल्सचा सुद्धा उपयोग केला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला युनेस्कोने हेरिटेज साईट घोषित केले आहे.

1887 साली स्टेशनच्या बांधकामास सुरवात झाली होती आणि स्टेशन पूर्ण तयार होण्यासाठी तब्बल 10 वर्ष एवढा कालावधी लागला होता.

युरोपात 16व्या शतकात लोकप्रिय असलेल्या गौथिक वास्तुकला शैलीत या वस्तूची निर्मिती करण्यात आली होती.

या स्टेशनच्या महत्वाच्या तिकीट हॉलला स्टार चेंबर नावाने ओळखल्या जाते. हॉलमध्ये असलेल्या स्टारकृतींमुळे या हॉलला स्टार चेंबर असे नांव देण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकामुळेच भारतात भव्य रेल्वे स्टेशन बनवण्याची परंपरा सुरु झाली.

या स्टेशनमधून रोज 30लाख लोक प्रवास करतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये एक हेरिटेज गॅलरी बनवण्यात आली आहे जेथे तुम्ही भारतीय रेल्वेचा इतिहास जाणून घेऊ शकता.

रात्रीच्या वेळी स्थानकावर तिरंगा कलरमध्ये करण्यात येणाऱ्या रोषणाईमुळे या स्थानकाची सुंदरता अजूनच वाढते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

काही लोकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाशी डिझाईन ही ब्रिटनच्या अनेक रेल्वे स्थानकांशी मिळती जुळती आहे.

प्रत्येक मुंबईकर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर नक्कीच भेट देत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिवाय मुंबई अशी कल्पना करणे सुद्धा मुंबईकरांना शक्य नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा= भारतातून  नष्ट झालेली शहर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here