आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

देवदाशी प्रथा संपुष्ठात आणण्यासाठी मुथुलक्ष्मी यांचेच योगदान महत्वाचे आहे.

 

भारताच्या इतिहासामध्ये अनेक महिलांनी मोलाचे योगदान दिले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते स्वतंत्र  भारताची जगामध्ये विशिष्ठ ओळख निर्माण करून देण्यापर्यंतचे त्यांचे योगदान कोणताही भारतीय विसरणार नाही.
आजच्या या लेखामध्ये आपण अशाच एका महिला व्यक्तिमत्वा बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना खऱ्या अर्थाने (allrounder)म्हणले जाते ज्यांचे नाव आहे मुथुलक्ष्मी रेड्डी. वाचा सविस्तर…!

 

मुथुलक्ष्मी रेड्डी यांना भारताची पहिली महिला हाउस सर्जन, पहिली महिला आमदार तसेच मद्रास विधानपरिषदेची पहिली महिला उपाध्यक्ष बनण्याचा सन्मान प्राप्त आहे.

 

देवदाशी
डॉ.मुथुलक्ष्मी रेड्डी

 

मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म ३० जुलै १८८६ रोजी तामिळनाडू राज्यातील पुडुकोट्टई मध्ये झाला होता. त्यांचे वडील नारायण स्वामी अय्यर हे महाराजा कॉलेज मध्ये प्राध्यापक तर माता चंद्रामाई ह्या देवदाशी होत्या. त्याकाळचे मैट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांना आपल्या वडिलांकडून घरीच मिळाले. घरी अभ्यास करूनही त्या परीक्षेमध्ये अव्वल आल्या होत्या. परंतु महाराजा हायस्कूल मध्ये मुथुलक्ष्मी रेड्डी यांना केवळ महिला असल्यामुळे प्रवेश दिला नाही.

 

मुथुलक्ष्मी रेड्डी यांना शाळेत शिकवण्यावरून समाजातील रूढीवादी लोकांनी बराच विरोध केला होता. परंतु शिक्षणामध्ये असलेली त्यांची रुची बघून पुडुकोट्टई च्या मार्तंड भैरव थोंडामन राजा यांनी शिष्यवृत्ती देऊन मुथुलक्ष्मी रेड्डी यांना हायस्कूल मध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यावेळी संपूर्ण शाळेमध्ये त्या एकमेव महिला ( मुलगी ) विद्यार्थी होत्या.

 

मुथुलक्ष्मी रेड्डी ह्या मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये सर्जरी विभागात प्रवेश घेणाऱ्या प्रथम भारतीय महिला होत्या. सर्जरीमध्ये त्यांनी कॉलेज मध्ये अव्वल येवून गोल्ड मेडल पण मिळवले होते. त्यांनी अजीवन महिला मुक्ती आणि महिला सशक्तीकरणासाठी संघर्ष केला होता.

 

देवदाशी
अड्यार कॅन्सर इंस्टीट्यूट

 

एप्रिल १९१४ मध्ये त्यांनी टी सुंदर रेड्डी यांच्यासोबत विवाह केला. परंतु विवाह करण्यापूर्वी त्यांनी पतीसमोर एक अट ठेवली होती ती म्हणजे; लग्नानंतर त्यांच्या पतीने सामाजिक कार्यात आणि गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत करण्यामध्ये हस्तक्षेप करू नये. इंग्लंडमध्ये महिला आणि मुलांच्या आरोग्य प्रशिक्षणार्थ त्यांची निवड झाली होती.

 

जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी आर्थिक कारणांमुळे त्यांना इंग्लंडला जाण्यास नकार दिला, तेव्हा तामिळनाडूचे आरोग्यमंत्री पनागल राजा यांनी त्यांना एक वर्षासाठी आर्थिक मदत देण्याचे निर्देश सरकारला दिले होते.

 

मुथुलक्ष्मी यांना कळाले होते कि महिलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या आरोग्याच्या पातळीवर काम करणे पुरेसे नाही. म्हणूनच त्या एनी बेसेंट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला चळवळीत सहभागी झाल्या. त्याच वेळी त्यांचे नाव भारतीय महिला समितीतर्फे (WIA) मद्रास विधान परिषदेसाठी नामांकित करण्यात आले होते.

 

त्यांनी १९२६ ते १९३० पर्यत विधान परिषद मध्ये काम केले होते. सुरुवातीला मुथुलक्ष्मी रेड्डी ह्या विधान परिषदेत काम करण्यास धजावत नव्हत्या कारण त्यांना आपल्या वैद्यकीय कामावर परिणाम होण्याची भीती वाटत होती. परंतु महिलांनी त्यांची घर सांभाळण्याची शक्ती ही देश सांभाळण्यासाठी पण वापरावी असेही त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी आपले काम सुरु ठेवले.

 

मुथुलक्ष्मी यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा, मंदिरातून देवदासी व्यवस्था रद्द करणे, वेश्यालय बंद करणे आणि महिला व मुलांची तस्करी रोखण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परिषदेमध्ये विवाहासाठी मुलींचे वय १४ वर्षे असावे यासाठी एक विधेयक सादर करताना त्या म्हणाल्या होत्या कि,

 

“सती प्रथेमध्ये काही वेळासाठीच त्रास होतो परंतु बाल विवाह प्रथेमुळे मुलींना जन्मापासून ते मरेपर्यंत एक बाल पत्नी, बाल माता, आणि बाल विधवा म्हणून जीवनभर त्रास सहन करावा लागतो.”

 

देवदाशी
देवदाशी प्रथा

 

असे त्यांनी त्यांच्या पुस्तकात ‘माय एक्सपीरियेंस एज़ लेजिस्लेचर’ लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे कि, जेव्हा त्यांचे बाल विवाह प्रतिबंधक कायदे स्थानिक प्रेसमध्ये प्रसिद्ध झाले तेव्हा कट्टरपंथीयांनी त्यांच्यावर खुल्या सभांमध्ये व प्रेसच्या माध्यमातून हल्ला केला यामध्ये विद्यापीठाचे पदवीधरही सामील होते.

 

 

देवदाशी प्रथा संपुष्ठात आणण्यासाठी मुथुलक्ष्मी यांचेच योगदान महत्वाचे आहे.

 

याकामासाठी त्यांना समाजातील अनेक कट्टर पंथीयांचा सामना करावा लागला होता. अखेर मद्रास विधान परिषदेने या प्रस्तावाला सर्वानुमते पाठिंबा दर्शविला होता आणि केंद्र सरकारला याची शिफारस केली होती. हे विधेयक १९४७ मध्ये अंतिम कायदा म्हणून अस्तित्वात आले होते.

 

देवदाशी प्रथेमध्ये युवतींना आणि महिलांना देवासाठी अर्पण केले जायचे. मद्रास विधानपरिषदेसमोर ठराव मांडताना मुथुलाक्ष्मी रेड्डी म्हणाल्या, “देवदासी प्रथा सतीचा सर्वात वाईट प्रकार आहे आणि हा धार्मिक गुन्हा आहे.” मुथुलक्ष्मी यांच्यावर एनी बेसंट आणि महात्मा गांधी यांच्या विचार धारेचा खूप प्रभाव होता. म्हणूनच जेंव्हा गांधीजींना दांडी यात्रेच्या चळवळीमध्ये अटक करण्यात आली तेंव्हा त्यांनी मद्रास विधानपरिषदेच्या सदस्यतेचा राजीनामा दिला.

 

देवदाशिंच्या सुरक्षेसाठी त्यांनी १९३१ मध्ये आपल्या घरीच ‘अव्वाई घर’ ची सुरुवात केली होती.

Remembering Dr Muthulakshmi Reddi, The First Female Legislator Of ...

 

मुथुलक्ष्मी यांच्या लहान बहिणीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी १९५४ मध्ये अड्यार कॅन्सर इंस्टीट्यूट ची स्थापना केली. या संस्थेमध्ये आजही अनेक कर्करोगींवर उपचार करण्यात येतात.

 

१९५६ मध्ये औषध आणि समाजसुधारणेच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू सरकारने १९८६ मध्ये मुथुलक्ष्मी यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीटही सादर केले होते. मुथुलक्ष्मी यांनी १९६८ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी आपला अंतिम श्वास घेतला.

 

गुगलने त्यांच्या जयंतीच्या दिवशी डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… सुधा मूर्ती यांचा आजच्या पिढीला प्रेरित करणारा जीवनपट…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here