आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

संभाजी: १६८९ प्रदर्शित का होत नाही? काय आहेत कारणे?

धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याच रक्षण केले.

मराठ्यांच्या इतिहासावर आणि संभाजी महाराजांच्या जीवनावर अनेक मराठी चित्रपट, लघुपट, मालिका ,नाटके येऊन गेली. परंतु २०१४ मध्ये संभाजी महाराज यांच्यावर आधारित  संभाजी १६८९ हा चित्रपट आजूनही का रिलीज झाला नाही हा प्रश्न आजही आहे.

२०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या संभाजी १६८९ च्या ट्रेलरनंतर लवकरच चित्रपट रिलीज होणार होता. परंतु त्यानंतर असे काय घडले कि आज जवळपास ६ वर्ष उलटून गेली असताना सुद्धा  संभाजी १६८९ रिलीज होत नाहीये.

संभाजी १६८९

२०१४ मध्ये ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर शिवभक्त या चित्रपटाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होते. परंतु जसे जसे दिवस लोटत गेले तसे या चित्रपटाच्या  प्रदर्शनाचा सुद्धा विसर पडत गेला. या काळात  नेमके कोणती कारणे होती जे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणत आहेत,पाहूया सविस्तर..

बजेटचा प्रश्न?

सर्वप्रथम दिग्दर्शक राकेश एस. दुलगज यांनी संभाजी १६८९ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २५ जानेवारी २०१४ ठेवली होती. परंतु नंतर काही दिवसातच बजेटची अडचण दाखवून चित्रपटाचे  शुटींग थांबवण्यात आले.

साहजिकच प्रश्न पडतो कि, संभाजी महाराज यांच्यासारख्या शूरवीर योद्ध्याचा इतिहास दाखवण्यासाठी मराठी  सीनेसृष्टीमध्ये असा एकही दिग्दर्शक, निर्माता,अभिनेता नव्हता जो चित्रपटाचा बजेटचा प्रश्न मार्गी लावून चित्रपट रिलीज करण्यासाठी समोर येईल.  एवढ्या गडगंज संपत्या सांभाळून असलेले चित्रपट जगतातील एकसुद्धा समोर नाही येऊ शकत यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे मुळात बजेटचा प्रश्न चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा नक्कीच नाहीये.

चित्रपटाचे चीत्रीकरन पूर्ण झाल्यांनतर सुद्धा अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो जसे प्रमोशन, इव्हेंट आणि आजून बरच काही या साठी पुरेसे पैसे नसल्यामुळे संभाजी १६८९ रिलीज न करण्याचा निर्णय घेण्यात आला असे काहींचे मत आहे.

स्वतः दिग्दर्शक राकेश एस. दुलगज  हे सुद्धा या प्रश्नावर शांत बसून आहेत ते फक्त पैश्याच्या अडचणीमुळे, हे कस शक्य आहे?

संभाजी: १६८९

भावना भडकून काही घडण्याचा आक्षेप:

दुसरी गोष्ट म्हणजे काहींच्या मते संभाजी १६८९ या चित्रपटात संभाजी राजेंची औरंगजेबाने कश्या प्रकारे  छळ करून हत्या केली, ते सर्व दाखवण्यात येणार होते.  चित्रपटातील दृश्य पाहता हिंदूच्या भावना भडकावून मुस्लीमाविरुद्ध काही केले जाऊ शकते असा समज होता. त्यामुळे काही ठराविक संस्था व व्यक्ती चित्रपट प्रदर्शनाला आतून विरोध करत होते.

त्यानाही माहिती आहेच कि संभाजी राजेंच्या ऐतिहासिक चित्रपटाला जाहीर उघडरित्या विरोध करणे तर शक्य नाही. कारण तसे  केल्यास शिवभक्त त्यांना त्यांची लायकी दाखवती हे ते चांगले जाणून होते.

चित्रपटाभोवती असलेले वाद: 

२०१४ मध्ये रिलीज  होणाऱ्या संभाजी १६८९ चित्रपटाभोवती अनेक वाद होते. साहजिकच जेव्हा कोणताही निर्माता  ऐतिहासिक घटनांवर अथवा ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवतात तेव्हा ते चित्रपटात चित्रीकरणासाठी  इतिहासातील अवश्यक ते पुरावे पाहूनच बनवतात. तरीसुद्धा जर संभाजी १६८९ मध्ये काही वादग्रस्त होते, तर त्यावर पर्याय  होतेच. ते दृश्य कमी करून सुद्धा चित्रपट रिलीज केला जाऊ शकला असता.

जसे पद्मावत, बाजीराव मस्तानी यांसारख्या हिंदी सिनेमात सुद्धा काही चुका,वाद होतेच. त्यावर उपाय म्हणून मग पद्मावतीचे पद्मावत करणे असो किवा बाजीराव मास्तनीतील काही सीन कापणे असो. हे सर्व करून सिनेमे प्रदर्शित करण्यात आलेच ना? मग संभाजी १६८९ यात काय एवढा मोठा वाद होता जो कि चित्रपटाच्या प्रदर्शनात आडवा येत आहे.

औरंगजेबाची क्रूरता:

संभाजी १६८९

काही चित्रपट समीक्षकांच्या मते औरंगजेबाने संभाजी महाराजांचा केलेला छळ पाहून नागरिकांमध्ये मुस्लीम समाजाविषयी द्वेषभावना निर्माण झाली असती. कारण औरंगजेबाने संभाजी महाराजांवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार केलेले दाखवण्यात येणार होते.

एकंदरीत चित्रपटाच्या प्रदर्शनाला आडव्या येणाऱ्या दाखवण्यात आलेल्या गोष्टी पाहता त्यावर विश्वास होत नाही कारण  संभाजी महाराजांचा इतिहास जवळपास सर्वांनाच माहिती आहे. अश्या वेळी चित्रपटरुपी इतिहास पाहून हिंदूंच्या भावना भडकतील असे शक्य नाही. शिवाय बजेट व अन्य दाखवण्यात आलेली कारणे सुद्धा विश्वास ठेवण्याजोगी नाहीयेत.

एक गोष्ट तर नक्कीच आहे कि, संभाजी १६८९ चित्रपटाचे प्रदर्शन न होण्यामागे काहीतरी राजकारण नक्कीच चाललय. जर संभाजी १६८९ प्रदर्शित झाला असता तर धर्मवीर शंभूराजेंचा इतिहास नव्याने एकदा लोकांसमोर आला असता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved..

हेही वाचा…संभाजी महाराज का पकडले गेले?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here