आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

इथे डीएनए मॅचिंगने मिळतात गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंड.

आयुष्यात कधी न कधी सोबतीची गरज पडते. तेव्हा आपल्याला साथ देणाऱ्या जोडीदाराचा शोध सुरू होतो. आता ज्यांना आपल्या परिघातच जोडीदार गवसतो, त्यांचं नशिब चांगलं म्हणायला हवं पण ज्या लोकांना आपल्या परिघात जोडीदार मिळत नाही, त्यांना मात्र वेगळे मार्ग पडताळून पहावे लागतात.

सोशल मीडिया हे देखील असंच नवी नाती निर्माण होण्याचं आणि ती नाती बहरण्याचं एक माध्यम बनलं आहे. ह्या माध्यमातून एकमेकांशी संपूर्णतः अनभिज्ञ असलेले दोन जीव एकमेकांच्या जवळ येऊ शकतात, याच संकल्पनेतून पुढे डेटिंग ऍप्सचा उदय झाला आहे.

डीएनए

new google

आज अनेक डेटिंग ऍप्स उपलब्ध आहेत आणि अशी असंख्य जोडपी आहेत जी ह्या माध्यमातून एकत्र आली आहेत. अनेकांना जसे याचे चांगले अनुभव आहेत तसेच अनेकांना याचे वाईट अनुभव देखील आहेत. बऱ्याचदा यावर फसवणूक देखील होत असते. परंतु असं असून देखील ह्या डेटिंग ऍप्सला मिळणाऱ्या प्रतिसादात कुठेच कमतरता राहत नाही.

जपान हा देश तसा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बराच पुढारलेला आहे, हे आपण जाणतोच, पण डेटिंगच्या बाबतीत देखील ह्या देशाने एक अत्यंत वेगवान पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

जपानने डीएनए मॅचिंग तंत्रज्ञानाचा माध्यमातून योग्य जोडीदार शोधण्याची नवीन पद्धती विकसित केली आहे आणि यामाध्यमातून एकमेकांना संपूर्णतः पूरक असणाऱ्यांच्या जोड्या जुळवल्या आहेत.

ह्या संपूर्ण प्रकाराला स्पीड डेटिंग असे नामकरण करण्यात आले असून, जेवढा जास्त भिन्न जनुकांचा समूह असेल तेवढी जास्त जोडीदाराला आकर्षित करण्याची शक्ती असते, अशी संकल्पना ह्या तंत्रज्ञानामागे आहे.

गेल्या 25 वर्षांपासून मॅच मेकिंगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या Nozze या जपानी कंपनीने जानेवारीत डीएनए मॅचिंग प्रोग्रामची सुरुवात केली. कंपनी तिच्या युझर्सकडून ‘लार’ च्या स्वरूपात डीएनए सॅम्पल घेते आणि त्यातून एक रिपोर्ट तयार केला जातो. ह्या रिपोर्टच्या आधारावर मॅचिंग केली जाते. परफेक्ट जेनेटिक मॅच मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी Nozze च्या ह्या प्रोग्राममध्ये स्वतःची नोंदणी केली आहे.

डीएनए

मागच्या महिन्यात टोकियोत या कंपनीने डीएनए मॅचिंग पार्टी देखील आयोजित केली होती. एका जपानी वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार ह्या पार्टीत चार नवीन जोड्या तयार झाल्या असून दोघांची मॅचिंग कॉम्पिटेबीलिटी 80 टक्क्यांपर्यंत आहे. एका 41 वर्षीय पुरुषाची आणि 32 वर्षीय महिलेचा स्कोअर तर 98 टक्क्यांपर्यंत अंकित करण्यात आला आहे.

कंपनी डीएनए टेस्टचे सॅम्पल कलेक्ट करते आणि शास्त्रज्ञ HLA जनुकाच्या आधारावर रिपोर्ट तयार करतात. कंपनीच्या प्रवक्त्याच्या मते एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होण्यासाठी डीएनएचं योगदान हे 50 टक्क्यांपर्यंत आहे. बाकी 50 टक्के भाग हा नैसर्गिक असतो.

तर मित्रांनो जपानने हे तंत्रज्ञान विकसित केलं असलं तरी भारतात हे तंत्रज्ञान रुजायला अजून अवकाश आहे, त्यामुळे डेटिंग ऍप्स हाच जोडीदाराच्या शोधाचा सध्या तरी एक उत्तम उपाय आहे. परंतु ही डीएनए जीन मॅचिंग ही सुख:द भविष्याची नांदी आहे, ह्यात कुठलंच दुमत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…संभाजी महाराज का पकडले गेले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here