आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

करपका विनायक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर. वाचा सविस्तर…!

सध्या सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे निर्देश जरी सरकारने दिले असले तरी सर्व नियम पळून गणेशोत्सव पार पडण्याची तयारी सर्वजन करत आहेत. गणेशोत्सव जवळ येताच सर्वत्र अष्ठविनायक मंदिरांबद्दल चर्चा सुरु होते.

भारतातील अष्ठविनायक गणपतींबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. परंतु भारतामध्ये अष्ठविनायक मंदिरांप्रमाणेच अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेले गणपती मंदिर आहेत ज्याबद्दल खूप कमी लोकांनाच माहिती आहे. असेच एक मंदिर आहे तामिळनाडू राज्यातील पिल्लरेपट्टी येथील करपका विनायक मंदिर.

करपका विनायक
करपका विनायक मंदीर आणि सोन्याने मढवलेली गणेश मूर्ती

 

या ठिकाणी मंदिरापासून ते गणपती बाप्पाच्या मूर्तीपर्यंतचा इतिहास खूप विशेष आहे. आज जाणून घेऊया या करपका विनायक मंदिराबद्दल सविस्तर …!

देशभरात भगवान गणेशाची अनेक प्राचीन व सुंदर मंदिरे आहेत. असेच एक मंदिर तामिळनाडूच्या तिरुपाथूर तालुक्यातील पिलारेपट्टी येथे आहे. हे जगप्रसिध्द मंदिर करपका विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते.

असे मानले जाते की इथल्या गणपतीची मूर्ती चौथ्या शतकाच्या आसपास कोरली गेली होती. या मंदिराची देखभाल चेतियार समुदायाद्वारे केली जाते आणि हे मंदिर चेतियार समाजाच्या नऊ सर्वात महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे.

करपका विनायक मंदिराचे ऐतिहासिक महत्व:

करपका विनायक मंदिर हे भगवान श्रीगणेशाला समर्पित एक प्राचीन गुहेमध्ये स्थित असलेले हेमाडपंथी मंदिर आहे. त्याच प्रमाणे हे मंदिर पिल्लरपट्टी पिलर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. येथे काही प्राचीन लेणी आहेत जी एका अखंड दगडाला कोरून बनवली गेली आहे. ही लेणी देखील गणपती बाप्पालाच समर्पित आहे.

या लेणीमध्ये भगवान शिव आणि इतर देवी देवतांची दगडी शिल्पे आहेत. मंदिराची गुहा एकाच दगडावर कोरलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात पुरेसा प्रकाश राहावा यासाठी तेलाचे दिवे सतत पेटत असतात. येथे सापडलेल्या शिलालेखांनुसार हे मंदिर इ स १०९१ ते १२३८ दरम्यान बांधले गेले आहे.

करपका विनायक मंदिराचे निर्माण करणारे पंड्या राजवंश:

पंड्या राजांनी पिल्लरपट्टी टेकडीवर हे मंदिर बांधले आहे. गणपतीप्रमानेच अन्य तीर्थे भगवान शिव, कात्यायनी, नागलिंगम आणि पसुपथिस्वरार हे या मंदिरात स्थापित आहेत. पुराणानुसार अशी मान्यता आहे कि, कात्यायनी देवीची मनोभावाने आराधना केल्यास कुमारिका युवतींचे लग्न कार्य लवकर होते आणि त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाहीत. त्याचप्रमाणे भगवान नागलिंगम ची पूजा अर्चना केल्यामुळे संतान प्राप्ती होते. तसेच धन प्राप्ती आणि सुख समृद्धी साठी पसुपथिस्वरार यांची पूजा केली जाते.

सोन्याने मढवलेली केवळ दोन हात असलेली अप्रतिम गणेश मूर्ती:

करपका विनायक
करपका विनायक वैलपूरी पिल्लईर

याठिकाणी श्री गणेशाची ६ फूट उंच दगडाची मूर्ती आहे. साधारणत: गणपतीच्या प्रत्येक रूपात चार हात असतात, परंतु या मंदिरात स्थानापन्न असलेल्या मूर्तीमध्ये गणपतीला केवळ दोनच हात आहेत. तसेच मुख्य मूर्ती ही सोन्याने मढवलेली आहे. या मंदिरातील गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे, यामुळेच गणपतीच्या या रुपाला वैलपूरी पिल्लईर असेही म्हणतात.

इथल्या सर्व देवतांच्या मूर्ती उत्तरेकडे मुख करून स्थापित केलेल्या आहेत. गणपतीची सोंड उजवीकडे असणे अतिशय शुभ मानले जाते अशी मूर्ती ही समृद्धी, संपत्ती आणि ज्ञानाचे प्रतिक मानल्या जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… एका मुस्लीम देशाच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो आला तरी कसा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here