Reading Time: 3 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

राजा भूपिंदर सिंह यांच्या ‘खास’ महालात केवळ नग्न लोकांनाच प्रवेश मिळत असे. वाचा सविस्तर…!

जुन्या काळात काय काय घडत असे याची आपण कल्पनाच करू शकत नाही. प्राचीन काळात अनेक राजे महाराजे होऊन गेले जे त्यांच्या चांगल्या चरित्रासाठी परिचयाचे आहेत. परंतु असेही काही राजे होऊन गेलेत जे इतिहासात आजही त्यांच्या वाईट कामगिरीसाठी ओळखले जातात. आज आपण अशाच एका राजाबद्दल जाणून घेऊया जो आपल्या “रंगीनमिजाजी” साठी प्रसिध्द होता. या राजाविषयी असेही म्हणाले जाते कि, तो आपल्या रंगमहालात केवळ नग्न लोकांनाच प्रवेश देत असे.

राजा भूपिंदर सिंह
राजा भूपिंदर सिंह

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल परंतु हे खरे आहे, आणि तो राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हे तर पटियाला रियासतचा महाराजा भूपिंदर सिंग आहे. त्यांच्याविषयी जितके जाणून घ्याल तितकेच तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण या महाराजाचे कारास्थानेच काही अशी होती.

महाराजा भूपिंदरसिंग यांचे दिवाण जरमनी दास यांनी आपल्या ‘महाराजा’ या पुस्तकामध्ये राज्यांच्या या आंबट शौकांची पूर्ण माहिती लिहून ठेवली आहे. त्यांचे हे पुस्तक जर आपण वाचले तर आपल्याला त्याकाळातील अचंबित करणारी माहिती मिळेल.

महाराजा भूपिंदरसिंग यांनी पटियाला येथे एक ‘लीला-भवन’ महल बनविला होता जिथे फक्त नग्न लोक प्रवेश करू शकत होते. भूपिंदरसिंग यांनी हा महल पटियाला शहरातील भूपेंद्रनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर बाहरदरी बागेजवळ बांधला होता. या महालाचा उल्लेख राज्याच्या दिवाणने ‘महाराजा’ या पुस्तकामध्ये केला आहे.

या महालातील एक खास खोली ही महाराजासाठी राखीव होती. या खोलीच्या भिंतीवरील चित्रांमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कामक्रीडेमध्ये मग्न असल्याचे रेखाटले होते. महाराजाची ही खास खोली भारतीय शैलीमध्ये सजवलेली असायची.

जमिनीवर मौल्यवान रत्नांनी सुसज्ज असे जाडजुड कार्पेट अंथरलेले असायचे. तसेच या खोलीमध्ये राजाच्या भोग विलासाचे सर्व साजोसामान ठेवलेले असायचे. यावरूनच राजाची वासनाधीनता समजली जाऊ शकते.

राजा भूपिंदर सिंह
राजा भूपिंदर सिंह

या राजाने आपल्या महालाच्या बाहेर एक अलिशान स्विमिंगपूल सुद्धा बनवला होता. हा स्विमिंगपूल एवढा विशाल होता कि यामध्ये एकाच वेळी १५० स्त्री पुरुष एकत्र जलक्रीडा करू शकत होते. या ठिकाणी अनेक शाही पार्ट्या व्हायच्या आणि या शाही पार्ट्यांमध्ये उघडपणे कामक्रीडा चालत असायच्या.

या शाही पार्ट्यांमध्ये सामील होण्यासाठी राजा आपल्या खास प्रेमिकांना बोलावत असे. ह्या प्रेमिका राजा तसेच त्यांच्या शाही अतिथी सोबत स्विमिंगपूल मध्ये पोहत असत.

राजा भूपिंदर सिंह

सर्व कर्मकांड या पुलाच्या अवतीभवतीच होत असत. यामध्ये राज्यातील काही इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या बायका सामील होताना पहिल्या जात. दिवाण जरमनी दास यांनी महाराजा-महाराणी नावाची एक बेस्टसेलर पुस्तक लिहिले आहे., या पुस्तकात त्यांनी या ठिकाणी काय काय घडत असे याबद्दल खुलेआम लिहिले आहे.

या पार्टीमध्ये विलायती आणि गैर भारतीय लोकांना कधीतरी आमंत्रित केले जायचे. परंतु याठिकाणी त्याच युरोपियन बायकांना बोलावले जायचे ज्या महाराज्यांच्या मोतीबाग महालात अतिथी म्हणून थांबलेल्या असायच्या. आणि राजासोबत त्यांची इश्कबाजी सुरु असायची.

राजा भूपिंदर सिंह

पटियाला रियासतीवर सुमारे ३८ वर्षे राज्य करणाऱ्या या राज्याबाद्दल असेही म्हणाले जाते कि, सिख परिवारामध्ये जन्मलेल्या या राजाने १० पेक्षा जास्त लग्न केले होते. एका अनुमानानुसार या राज्याचे ८८ अपत्य होते. तसेच महाराजा भूपिंदर सिंह जवळ जगप्रसिध्द पटियाला हार होता.

या हाराला प्रसिध्द ब्रांड कार्टीयर एस ए यांनी बनवले होते. राणी बख्तावर कौर इतकी सुन्दर होती कि त्यांना क्वीन मेरी ची उपाधी देण्यात आली होती. पटीयाला पेग पण राजा भूपिंदर यांचीच देन आहे.

याच राजाला स्वतः हिटलरने कर गिफ्ट जवळी होती. वाचा तो किस्सा!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here