आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
त्रिनेत्र गणेश: जगातील पहिले गणपती मंदिर वाचा सविस्तर …!
गणपती बाप्पाच्या अगमानापासूनच आम्ही तुमच्यासाठी गणेशोत्सव विशेष सिरीज घेऊन आलो आहोत. आपल्या देशातील काही चमत्कारिक मंदिरांबद्दल आपण मागच्या काही लेखांमधून जाणून घेतले आहे. या सिरीजमध्ये आज आपण जाणून घेऊया भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या गणेश मंदिराबद्दल.

हे मंदिर आहे राजस्थानमधील त्रिनेत्र गणेश मंदिर. याठिकाणी भगवान गणेशाची त्रिनेत्री प्रतिमा विराजमान आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे असे मानल्या जाते आपल्या देशात अशा प्रकारच्या केवळ चारच प्रतिमा अस्तित्वात आहेत.
राजस्थान मधील सवाई माधोपुर जिल्ह्यातील रणथंभौर येथे असलेल्याया गणेश मंदिराला रणतभंवर मंदिरही म्हणले जाते. हे प्राचीन मंदिर अरावली आणि विंध्याचल पर्वताच्या शिखरावर १५७९ फुट उंचावर एका किल्ल्यामध्ये स्थित आहे. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे येथे गणपती बाप्पांसाठी लोकांकडून येणारे पत्र.
घरामध्ये लग्न कार्य असो किंवा अन्य काही शुभकार्य असो याठिकाणी प्रथमपूज्य गणेशाला त्याचे निमंत्रण पाठवले जाते. याठिकाणी दररोज हजारो पत्र भक्तांकडून डाक विभागामार्फत मिळतात. येथील पोस्टमन पण मोठ्या भक्तिभावाने ती पत्रे मंदिरापर्यंत पोहचवतात. याठिकाणी मागलेली मनोकामना लवकरच पूर्ण होते अशी मान्यता आहे.

राजपूत महाराजा हम्मिरदेव चौहान आणि अलाउद्दीन खिलजीचे १२९९-१३०१ चे युध्द रणथंभौर येथेच झाले होते. यादरम्यान रणथंभौर किल्ला ९ महिन्यापेक्षा जास्त दिवस शत्रूंनी वेढा देऊन घेरला होता. किल्ल्यातील राशन सामग्री हळूहळू संपत होती म्हणून चिंताग्रस्त असलेल्या महाराजा महाराजा हम्मिरदेव चौहान यांना गणपती बाप्पांनी स्वप्नामध्ये दर्शन देऊन त्याठिकाणी पूजा करण्यास सांगितली ज्याठिकाणी आज गणपतीची त्रिनेत्र मूर्ती स्थानापन्न आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेंव्हा महाराजा त्याठिकाणी पोहचले तेंव्हा त्यांना त्याठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली गणेश मूर्ती दिसली. हम्मिरदेव यांनी याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे असे म्हणल्या जाते.

त्रिनेत्र गणेशजिचा उल्लेख हा रामायण आणि द्वापर युगातही आहे. असे म्हणतात की श्रीरामाने लंकेवर आक्रमण करायला जाण्यापूर्वी अशाच त्रिनेत्र गणेशाचा अभिषेख केला होता. एका प्राचीन मान्यतेनुसार द्वापार युगात भगवान कृष्णाचा विवाह हा रुक्मिणीशी झाला होता. या लग्नामध्ये गनेशजीला बोलावण्यास कृष्ण विसरले होते. यामुळे गणेशाचे वाहन असलेल्या उंदरांनी श्रीकृष्ण यांच्या रथाच्या सर्वबाजूने जनीन खोदुन खड्डा बनवला.
यामुळे श्रीकृष्णाला आपली चूक कळाली आणि त्यांनी कसेबसे गणपतीला राजी केले. तेंव्हापासूनच गणपतीला मंगल कार्यात सर्वप्रथम पूजले जाते. श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी गणपतीला विनंती करून राजी केले ते ठिकाण आज रणथंभौर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच हे मंदिर भारतातील प्रथम गणेश मंदिर आहे असेही म्हणतात.
या मंदिराबद्दल असेही म्हणतात कि राजा विक्रमादित्य दर बुधवारी या ठिकाणी येऊन पूजा करतात. या मंदिरात गणपती त्रिनेत्र रुपात विराजमान आहेत त्यांचे तिसरे नेत्र हे ज्ञानाचे प्रतिक मानल्या जाते. संपूर्ण जगामध्ये हे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये गणपती बाप्पा आपल्या पूर्ण परिवारासह विराजमान आहेत.
आपल्या देशात चार स्वयंभू गणेश मंदिरे आहेत ज्यामध्ये त्रिनेत्र गणेश पहिल्या स्थानावर आहे. बाकी तीन स्वयंभू मंदिरे सिद्दपुर गणेश मंदिर गुजरात, अवंतिका गणेश मंदिर उज्जैन आणि सिद्दपुर सिहोर मंदिर मध्यप्रदेश हे आहेत. याठिकाणी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मोठी जत्रा भरते ज्यामध्ये लाखोंच्या संखेने भक्तजन सहभागी होतात. आणि भगवान त्रिनेत्र गणेशाची ७ किमी लांब परिक्रमा पूर्ण करतात.
रणथंभौर मध्ये त्रिनेत्र गणपतीशिवाय अन्य काही ठिकाणेही प्रसिध्द आहेत ज्यामध्ये रणथंभौर (व्याघ्रप्रकल्प ) टाइगर रिजर्व एरिया पण सामील आहे. येथील नैसर्गिक सुंदरता प्रत्येकाचे मन मोहून टाकते. पावसाळ्यामध्ये याठिकाणी अनेक लहान मोठे धबधबे वाहताना दिसतात. हे मंदिर एका प्राचीन किल्ल्याच्याआत आहे हा किल्ला पुरातत्व विभागाकडून संरक्षित करण्यात आला आहे. जवळपासच्या जिल्ह्यातील लोकं तर पायी प्रवास करत दर्शनासाठी येतात.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… कनिपकम विनायक मंदिर येथील गणेशाच्या मूर्तीचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे…! वाचा सविस्तर.!