आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

 भारतातील प्राचीन मंदिरांत अनेक रहस्य दडलेली आहेत. ही रहस्ये बऱ्याचदा विज्ञानाच्या चष्म्यातून उलगडली जातात अथवा ही रहस्ये कायमच गूढ बनून राहतात. असंच एक गूढ रहस्य दडवून बसलेलं एक शिव मंदिर हिमालयाच्या कुशीत आहे, ज्याने विज्ञानासमोर एक न उलगडणारं रहस्य उभं केलं आहे.

हिमाचल प्रदेशात हे मंदिर असून ह्या ठिकाणी दर 12 वर्षांनी एका विशिष्ट समयी मंदिरातील शिवलिंगावर वीज कोसळते. पण हे कसं याचं उत्तर विज्ञान अजूनही देऊ शकलेलं नाही.

महादेव मंदिर

काय आहे मंदिराचा इतिहास?

हिमाचल प्रदेशातील कुल्लूपासून 18 किलोमीटर वर असलेल्या ‘मथान’ नामक ठिकाणी हे शिवमंदिर आहे. दर 12 वर्षांनी येथील शिवलिंगावर एक वीजेचा वज्रघात अचूकपणे होत असतो. ह्याचा परिणाम म्हणून महादेवाच्या शिवलिंगाला तडा जातो. मग पुजारी ह्या तडा गेलेल्या जागेला लोण्याचा लेप लावतात.

‘मख्खन महादेव’ म्हणून प्रसिद्ध

एका पुराणकथेच्या मान्यतेनुसार या ठिकाणी असलेली विशालकाय पर्वतरांग ही एक सर्पाच्या स्वरूपात आहे. ह्या सर्पाचा वध भगवान शंकराने केला होता. देवांचा राजा व मेघाधिपती इंद्रदेव भगवान शंकराच्या परवानगीनेच वीजेचा वज्रघात करत असतो.

ह्या तडाख्यामुळे जो तडा शिवलिंगाला जातो, ती महादेवाला झालेली जखम आहे असे मानून त्याला लावण्यात येणारा लोण्याचा लेप हे त्यावरील उपचार आहेत ज्यामुळे महादेवाच्या वेदना कमी होण्यास मदत होते, अशी इथे मान्यता आहे. यामुळेच ह्या मंदिराला भक्त “मख्खन महादेव” म्हणतात.

काय आहे मंदिरा मागची पौराणिक कथा?

महादेव मंदिर

इथे प्रचलित लोककथेनुसार ह्या मंदिरात ‘कुलांत’ नामक दैत्याचा वास होता. त्याने एकदा व्यास नदीचा प्रवाह रोखून धरला. व्यास नदीच्या पाण्यावर आपलं आयुष्य व्यतित करणाऱ्या जीवांचा तरफडत मृत्यू व्हावा अशी त्यामागची भावना होती.

हे बघून महादेव क्रोधीत झाले. त्यानंतर त्यांनी एका मायाजाळाची निर्मिती केली. महादेव दैत्याजवळ गेले आणि त्यांनी त्याच्या शेपटीला आग लावली. आग कोणी लावली हे बघण्यासाठी त्या दैत्याने आपली मान वळवली तेव्हा भगवान शंकराने त्याचा शिरच्छेद केला.

त्यानंतर त्या दैत्याचा विशालकाय शरीराचं रूपांतर पर्वतरांगेत झालं. आज ही पर्वतरांग “कुल्लू घाटी” नावाने प्रसिद्ध आहे. भगवान शंकराच्या आदेशावरून इंद्रदेव दर 12 वर्षाने ह्या भागावर वीजेचा वज्रघात करतो. जेणेकरून मालमत्तेची आणि जीविताची होणारी हानी टळू शकेल.

वैज्ञानिक आहेत अजूनही कोड्यात.

ह्या मंदिरात दर 12 वर्षांनी वीज कोसळण्यामागे काय विज्ञान आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न अनेक वैज्ञानिक करत आहेत. परंतु अजूनही हे त्यांच्यासाठी कोडंच आहे. ह्यामागे नक्कीच काहीतरी भौतिक कारण असणार असा दावा इथल्या विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक वेळोवेळी करत असतात.

परंतु जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत तरी चमत्कारिक म्हणूनच लोक ह्या मंदिराकडे बघत राहणार आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here