आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या व्हिडिओने अपलोड केल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच १० कोटी वेळा बघितल्या जाण्याचा अनोखा विक्रम बनवला आहे.

आपल्याला असे खूप कमी वेळा पाहायला मिळते कि , एखादे गाणे किंवा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला गेला आणि लगेचच पूर्ण जगाला त्या व्हिडिओचे वेड लागले. परंतु अशक्य वाटणारी हि घटना आता घडली आहे. युट्यूबच्या इतिहासामध्ये एक नवीन रेकॉर्ड बनले आहे, जे आजपर्यंत कोणीही करु शकले नाही. YouTube वर एका गाण्याचा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. अवघ्या चोवीस तासातच हे गाणे इतक्या लोकांनी पाहिले आहे की त्या गाण्याने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे.

व्हिडिओ

व्हिडिओ २४ तासांत १० करोड वेळा बघितल्या गेला आहे:

कोरियन पॉप-बँड BTS ने डायनामाइट नावाचा त्यांचा लेटेस्ट ट्रैक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे. संपूर्ण जगातील युवांमध्ये खूप लोकप्रिय होत असलेल्या K-POP च्या या व्हिडिओने अपलोड केल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच १० कोटी वेळा बघितल्या जाण्याचा अनोखा विक्रम (New Record on YouTube) बनवला आहे.

२५/०८/२०२० आज सकाळीपर्यंत या गाण्याला लोकांनी १९ कोटी वेळा पहिले आहे. यापहिले युट्यूबवर सर्वात जास्त वेळाबघितल्या जाणाऱ्या व्हिडिओचा रेकॉर्ड Blackpink BAND च्या नावे होते. Blackpink चा हाऊ यु लाईक द्याट (How You Like That ) या व्हिडिओला चोवीस तासात 86.3 मिलियन वेळा बघितल्या गेले होते.

तरुणांमध्ये लोकप्रिय कोरियन पॉप बँड:

व्हिडिओ

कोरियन पॉप बँड हे जगातील सर्वच देशातील तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. या कोरियन बँडची गाणी बरेच यंगस्टर्स ऐकतात आणि पाहतात. कोरियन पॉप-बँड बीटीएसचे नवीन गाणे डायनामाइट सुपर हिट होईल अशी अपेक्षा अगोदरच सर्वांना होती. याचे कारण म्हणजे , या गाण्याचा टीझर व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. हे टीझर आतापर्यंत यूट्यूबमध्ये ६ कोटीहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

आतापर्यंत डायनामाइट या गाण्याला यूट्यूबवर १९१ मिलियन व्यू मिळाले आहेत. 2020 MTV Video Music Awards मध्ये BTS बँड पहिल्यांदाच टीव्हीवर डांस नंबर परफॉर्म सादर करताना दिसणार आहे, हा Music Awards पुरस्कार कार्यक्रम 30 ऑगस्ट रोजी ऑन एअर होणार आहे.

आता इंटरनेट वर धुमाकूळ माजवणारा हा व्हिडिओ पुढे चालून कोणकोणते नवीन विक्रम आपल्या नावे करतो हे बघण्यासारखे आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  इंटरनेटबद्दलचे 5 रहस्य जे आजपर्यंत कोणीही उलगडू शकले नाही..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here