आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
श्रीकृष्णा समवेत त्याच्या यदुवंशाचा अंत कसा झाला होता ?
अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात रक्तपाताशिवाय दुसरं काहीच हाती लागलं नाही. ह्या युद्धात कौरवांच्या कुळाचा सर्वनाश झाला होता, पाच पांडव वगळता पांडवांच्या कुळातील बहुतांश लोक ह्या युद्धात मृत्युमुखी पडले होते. परंतु ह्या युद्धानंतर अजुन एक वंश संपला होता, तो वंश होता भगवान श्रीकृष्णाचा यदुवंश.
गांधारीने दिला होता यदुवंशाचा विनाशाचा शाप
महाभारत युद्धाच्या समाप्ती नंतर जेव्हा युधिष्ठीराचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी गांधारीने श्रीकृष्णाला महाभारतासाठी दोषी ठरवत, त्याचा संपूर्ण यदुवंशाला विनाशाचा शाप दिला होता. गांधारीच्या शापाने विनाशकाळ आल्याने श्रीकृष्ण समस्त यदुवंशाच्या सैन्यासोबत द्वारकेला परतले. यदुवंशीसोबत आपला अन्न भंडार देखील घेऊन आले होते. श्रीकृष्णाने ब्राह्मणांना अन्नदान करून, यदुवंशियांना मृत्यूची प्रतीक्षा करायला सांगितली.
काही दिवसांनी महाभारतावर चर्चा करताना सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात वाद विवाद झाला. सात्यकीने संतप्त होऊन कृतवर्माचं शिर धडा वेगळं केलं. त्यानंतर एक मोठं युद्ध भडकलं ज्यात खूप मोठा नरसंहार झाला. ह्या युद्धात सात्यकी समवेत श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युमन आणि संपूर्ण यदुवंशाचा विनाश झाला. फक्त बब्रू आणि दारूक हे दोघेच बचावले. यदुवंशाच्या विनाशानांतर कृष्णाचे जेष्ठ बंधू आणि शेषनागाचा अवतार असलेले बलराम यांनी समुद्रकिनाऱ्यावर आत्मार्पण करून आपल्या अवतार कार्याचा शेवट केला.
शिकाऱ्याचा बाण लागून झाला श्रीकृष्णाचा मृत्यू
बलरामाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्ण पिंपळाच्या एका वनात झाडाखाली ध्यान मुद्रेत बसले होते. तेव्हा त्या वनात एक शिकारी आला, तो हरणाची शिकार करण्यासाठी आला होता. श्रीकृष्ण ध्यानस्थ बसले होते. घनदाट वनराईत त्या शिकऱ्याला श्रीकृष्ण नीट दिसले नाही. त्याला फक्त श्रीकृष्णाचा तळपाय दिसत होता.
त्याने कुठलाच विचार न करता धनुष्यातून बाण सोडला, जो तळपायाच्या आरपार गेला. जेव्हा त्या शिकऱ्याला त्याचा कृतीची जाणीव झाली तेव्हा मात्र तो कृष्णाची माफी मागू लागला. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तू जे काही केलं आहे, ते माझ्यासाठी खूप हिताचं होतं आणि ह्या कृत्यासाठी तुला वैकुंठाची प्राप्ती होणार आहे.
त्यानंतर ती शिकारी तेथून निघून गेला. थोड्या वेळाने श्रीकृष्णाचा सारथी दारुकि तेथे पोहचला. श्रीकृष्ण त्याला म्हणाले की आता त्यांचं अवतार कार्य संपलं आहे आणि यदुवंश नष्ट झाला आहे. द्वारकेला जाऊन माहिती द्या की नगरी लवकरात लवकर खाली करा, कारण आता द्वारका जलमग्न होणार आहे. माझ्या मात्या पित्याला म्हणावं की एवढा संदेश देऊन श्रीकृष्णाची प्राणज्योत मालवली.
श्रीकृष्णाच्या मृत्यूवेळी स्वर्गातुन अप्सरा, यक्ष, देव दानव यांनी पुष्पवृष्टी केली.
श्रीमद भागवता अनुसार जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांचा अंतर्धान पावल्याची बातमी त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहचली, तेव्हा दुःखात त्यांनी आपले प्राण त्यागले. देवकी, रोहिणी, वासुदेव, बलराम आणि श्रीकृष्णाच्या राण्या, सर्वांनी आपले प्राण त्यागले. यानंतर अर्जुनाने यदुवंशातर्फे पिंडदानाचा व श्राद्धाचा विधी केला.
या संस्कारांनंतर यदुवंशात उरलेले लोक अर्जुनसोबत इंद्रप्रस्थला परतले. यानंतर श्रीकृष्णाच्या निवास्थानाला वगळता द्वारका पाण्याखाली गेली. श्रीकृष्णाच्या देहांताची बातमी मिळताच पांडवांनी हिमालयाच्या दिशेने आपली यात्रा सुरू केली. त्यादरम्यानच त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. युधिष्ठिर एकमेव होते जे स्वर्गापर्यंत पोहचू शकले.
वानरराज बली होता शिकारी.
संतांच्या मताप्रमाणे त्रेतायुगात प्रभूंच्या श्रीराम अवतारात बलीला लपून बाण मारला होता, त्यामुळे कृष्णवतारात त्याला शिकारी बनवून, प्रभुने त्याचा हातून आपल्या मृत्यूची सुनिश्चिती केली होती.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… इंटरनेटबद्दलचे 5 रहस्य जे आजपर्यंत कोणीही उलगडू शकले नाही..!