आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

महाभारतातील संजयला दिव्यदृष्टी कशी मिळाली होती? पाहूया सविस्तर..


महाभारतात हस्तनापूरचे राजा कौरवांचे पिता धृतराष्ट्र डोळ्यांनी पाहून शकत नसल्यामुळे  त्यांना हस्तणापूर मध्ये राजमहालात युद्धभूमीवर चाललेल्या सर्व घटनांची महिती संजयने सांगितली होती. युद्धाचे डोळ्याने पाहिलेले सर्व हाल संजय युद्धभूमीपासून लांब असताना सुद्धा कसा काय पाहू शकत होता. हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

संजयला अशी कोणती विशेष शक्ती प्राप्त होती जिच्याद्वारे तो एवढ्या लांबवर रनभुमीत चाललेले युद्ध अगदी स्पष्टपणे पाहू शकत होता. याच्याअगोदर आपण जाणून घेऊया संजय कोण होता आणि तो हस्तनापूरमध्ये कसा आला होता.?
संजय हा धृतराष्ट्र यांच्या सभेमधील सदस्य होता.

संजय

संजयची ओळख, सदाचारी, धर्मपालन करणारा, स्पष्टवादी, सदाचारी आणि श्रीकृष्णाचा भक्त अशीच होती.

धर्माच्या मार्गांवर चालणारे संजय जरी धृतराष्ट्र यांच्या सभेतील सदस्य असले तरी त्यांना मनात पांडवाबद्दल सहानुभूती होती.

असंही अनेक वेळा म्हटले जाते की संजयनी महाराज धृतराष्ट्रला त्यांचे पुत्र कौरवांच्या बाबतील अनेक वेळा चेतावणी दिली होती. जेव्हा भरलेल्या सभेमध्ये कौरवांकडून द्रौपदीचा अपमान करण्यात येत होता तेव्हा भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासह सर्वच जण शांत होते. तेव्हा सुद्धा कौरवांच्या या व्यवहाराबद्दल संजयने धृतराष्ट्रकडे तक्रार केली होती.

कौरवांचे हेच सहिष्ण वागणे समोर चालून त्यांना महागात पडेल असे जाणून संकेतच त्यांनी दिले होते.

शेवटी संजयची भीती खरी ठरली आणि महाभारत सारख्या महाभयंकर युद्धाला कोणीही थांबवू शकले नाही. या धर्म आणि अधर्माच्या युद्धात लाखो सैनिकांसह अनेक वीर योध्यांना आपला जीव गमवावा लागला.

अशी मिळाली संजयला दिव्यदृष्टी…

संजय

महाभारत युद्ध सुरु होत आतानाच धृतराष्ट्र हे आपल्या अंधपणामुळे ते पाहणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी महर्षी वेदव्यास यांना यावर उपाय सांगण्यासाठी बोलावले. महर्षी वेदव्यास यांनी महाराज धृतराष्ट्र यांना युद्ध पाहण्यासाठी दिव्यदृष्टी देऊ शकतो असे सांगितले.

परंतु आपल्या पुत्रांच्या अधर्मी वागण्यामुळे त्याची पराजय निश्चित आहे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी स्वतः दिव्यदृष्टी घेतली नाही. परंतु महर्षी हे जाणून होते की, युद्धभूमीतील समाचार ऐकन्यासाठी महाराज नक्कीच उत्सुक असतील.

संजय
त्यामुळे त्यांनी महाराज धृतराष्ट्र यांचा जवळचा हितकरी संजय यास दिव्यदृष्टी दिली आणि महाराजांना युद्धदरम्यान वेळोवेळी तेथील माहिती देण्यास सांगितली. दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे संजय न फक्त रणभूमीवर होत असलेल्या घटना स्पष्टपणे पाहू शकत होता तर त्यासोबतच समोरच्याच्या मनातील गोष्टी सुद्धा तो जाणून घेऊ शकत होता.

संजय

जेव्हा पितामह भीष्म युद्धात अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन जमिनीवर पडले होते. तेव्हा धृतराष्ट्रने संजयला युद्धाचे अन्य हाल विचारले. तेव्हा संजयने युद्धात असलेल्या दोन्ही पक्षांची युद्धात झालेल्या हानीचे वर्णन केले. सोबतच श्रीकृष्ण यांच्याद्वारे देण्यात आलेल्या उपदेशाची सुद्धा माहिती संजयने धृतराष्ट्रला दिली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  या मंदिराचे हे रहस्य ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here