आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

मांसाहार करणे पाप आहे का पुण्य? काय सांगते शास्त्र..

जगभरात वेगेवेगळ्या ठिकाणी तेथील खानपाण्याची एक विशिष्ट अशी ओळख असते. आपल्या जेवणात आपण काय खायचे आणि काय नाही. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असला तरीसुद्धा अनेक वेळा आपण यावर विचार करतोच की लोकांनी काय खायला हवे आणि काय नाही.

तसे पाहता सध्या शाकाहारी आणि मांसाहरी असे दोन प्रकारचे जेवण करणारे लोक असतात. शाकाहारी लोक हे कधीही मांसाहार करत नाहीत ते दुसऱ्या बाजूला असलेले मांसाहारी लोक हे दोन्हीही प्रकारचे अन्न ग्रहण करतात.

मांसाहार

एका बाजूला मांसाहारी लोक हे शाकाहरी लोकांना फळभाज्या खाणारे म्हणतात तर दुसऱ्या बाजूला शाकाहारी लोक मांसाहरी लोकांना प्राण्यांवर अन्याय करून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत मानतात. हिंदू धर्मातील अनेक पावन ग्रंथामध्ये सुद्धा याविषयी अनेक ठिकानी लिहून ठेवले आहे, की माणसानी शाकाहरी असावे,की मांसाहारी.

 

जाणून घेऊया या लेखात सविस्तर….

हिंदू धर्मात मांस खान्यावर बंदी आहे का नाही यावर अनके लोकांच्या मनात संभ्रम आहेत. याचे कारण आहे काही लोकांच्या मनात असलेली वेदांची शक्ती. ज्यात हिंदूंनी मांसाहार, पशुबळी हे पाप असल्याचे म्हटले गेले आहे.परंतु हे अर्धसत्य आहे असच अनेक लोकांचे मत आहे.

वेद आणि पूरान हिंदू धर्मातील मुख्य धर्मग्रंथ आहेत. वेदामध्ये पशुहत्या पाप म्हणून संबोधल्या गेली आहे. आणि हिंदूंनी मास खाण्यास सक्त मनाई केली गेली आहे.

मांसाहार

यजुर्वेदात म्हटले गेले आहे की, मनुष्याने संसारातील सर्व घटकांना आपल्या सारखे मानले पाहिजे.अर्थात ते जसे आपले हीत जाणतात तसेच दुसऱ्या प्राणिमात्रांचे सुद्धा हीत पाहावे.

अथर्ववेदात म्हटले गेले आहे की, हिंदू धर्मातील मनुष्याने गहू, ज्वारी, तांदूळ, दाल अश्या खाद्यपदार्थांचा भोजनात उपयोग करा. हेच तुमच्यासाठी उत्तम असा आहार आहे.

गीतामध्ये मास खाणे अथवा न खाणे याचा उल्लेख जरी नसला तरी तेथे जेवणाला 3 प्रकारात विभागन्याय आले आहे. ते 3 प्रकार म्हणजे सत्व, रज आणि तम.

मांसाहार

भागवतगितेनुसार जो मनुष्य सात्विक अन्न ग्रहण करतो त्याचे विचार सुद्धा सात्विक असतात. तर मास आणि मदिरा सारख्या गोष्टी तांशीक भोजन म्हणून संभोधल्या गेल्या आहेत. याप्रकारचे अन्न ग्रहण करणारे लोक नेहमी कुकर्मी, रोगी आणि आळशी असतात असं म्हटले गेले आहे.

सात्विक आहात हा मनाला शांती आणि बुद्धीचा विकास होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहात आहे  तर भागवतगीतामध्ये सुद्धा एका ठिकाणी गाय आपली मातासमान असल्याचा उल्लेख केला गेला आहे, आणि गायीसोबतच अन्य 4पायी प्राण्यांचं आपण रक्षण केले पाहिजे.

भगवान श्रीकृष्णाने सुद्धा म्हटले होते की जसा आपल्याला स्वतःचा जीव प्रिय असतो तासच अन्य पशुपक्षांना सुद्धा त्यांचा जीव प्रिय असतो.आपल्याकडे सात्विक भोजनाची व्यवस्था असताना सुद्धा केवळ क्षणिक सुखासाठी कोणत्याही जीवांना मारून त्यांचे मास खाणे हे मनुष्यास शोभा देत नाही.

तर आता हे ज्यांच्या त्यांच्या इच्छेवर आहे की ते कोणते अन्न खाणे पसंद करतात.

एका बाजूला पुराणात असलेले संदर्भ तर दुसऱ्या बाजूला आणि विज्ञानयुगात सुद्धा केल्या गेलेल्या सर्वेनुसार मांसाहारी जेवणापेक्षा शाकाहारी जेवन हे मनुष्याच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतो. शाकाहरी अन्न हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवन्यास मदत करते तसेच शाकाहारी भोजन केल्याने आपले आयुष्य सुद्धा वाढते.

परंतु काही लोकांच्या मते काही धर्मात मांसाहार हे बरोबर असल्याचे म्हटले गेले आहे. परंतु हे सर्व भ्रम
त्या ग्रंथातील मंत्र आणि श्लोकांचा वेगळा अर्थ काढून समज पसरण्यात आल्याचे अनेक अभ्यासकांचे म्हणने आहे.

मांसाहार

हिंदू धर्मात सुद्धा पूर्वीच्या काळी पशुबळी देण्याची रीत होती जी आजसुद्धा काही ठिकाणी सुरु आहेच. परंतु कोणत्याही ग्रंथामध्ये मांसाहार अथवा पशुबळी हे मनुष्यासाठी योग्य असल्याचे म्हटले गेले नाहीये. हे सर्व समज फक्त काही लोकांनी श्लोकांचे वेगळे आणि चुकीचे समज लावून पसरवले गेले आहेत.

शेवटी मांसाहार करायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु सत्य तर हेच सत्य आहे की हिंदू पुराणांमध्ये कुठेही मांसाहार करण्यास अथवा मांसाहारास योग्य मानले गेले नाहीये.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  या मंदिराचे हे रहस्य ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here