आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

महाभारतातील दोन्ही बाजूच्या विशाल सैन्यांना या राजाने भोजन पुरवले होते…!


महाभारत एक असे महायुद्ध ज्यात जवळपास संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वच राज्यांनी भाग घेतला होता. काही राज्य हे कौरवांकडून लढले तर काही राज्य पांडवांकडून. दोन्ही बाजूंचे सर्व योद्धे आणि सैनिक मिळून जवळपास 50 लाखापेक्षाही जास्त  सैनिकांनी भाग घेतला होता.

एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या विशाल सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था कशी केली जायची हा सुद्धा एक प्रश्चच होता. शिवाय दररोज हजारो सैनिक युद्धात वीरगतीला प्राप्त होत असत मग अश्या वेळी भोजन बनवनारांना अचूक अंदाज कसा येत असे की आज नेमके किती लोकांसाठी भोजन बनवायचे आहे?

महाभारत

new google

आज जाणून घेऊया याच बाबतीत.

महाभारताला भारतातील प्रथम विश्वयुद्ध सजल्या जाते. एवढे मोठे युद्ध यापूर्वी कधीही झाले नव्हते. आणि त्यात एवढ्या राज्यांनी एकाच युद्धात कधीही सहभाग नोंदवला नव्हता.परंतु एक असेही राज्य होते जे युद्धात सहभागी असून सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नाही. ते राज्य म्हणजे ” दक्षिणचे उडिप्पी राज्य”

महाभारताच्या एका कथेनुसार जेव्हा उडिप्पी राज्याचे राजा आपल्या सैनेसोबत युद्धात सहभागी होण्यासाठी पोहचले तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु उडिप्पीचा राजा महत्वकांक्षी व दूरदर्शी होता. त्यांनी श्री कृष्णाला विचारले की हे प्रभू, दोन्ही बाजूचे योद्धे आमच्या सैनेला त्यांच्याबाजूने घेण्यास उत्सुक आहेत, परंतु कधी हा विचार केला गेला की, दोन्ही बाजूने असलेल्या एवढ्या मोठ्या सैनेच्या भोजनाची व्यवस्था कशी केली जाईल.

महाभारत

यावर श्रीकृष्ण यांनी म्हटले, महाराज तुम्ही एकदम  बरोबर बोलत आहात. आपल्या बोलण्यावरून मला जाणवतेय की आपल्याजवळ या प्रश्नासाठी नक्कीच काहीतरी मार्ग आहे.त्यावर उडिप्पी चे राजा म्हणाले की हे वासुदेव खरे तर हे आहे की भावा-भावामधील या युद्धाला मी बरोबर समजत नाही, त्यामुळे या युद्धात सहभागी होण्याची माझी इच्छाच नाही. परंतु हे युद्ध आता थांबवले सुद्धा जाऊ शकत नाही.

त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मी आणि माझी सैना येथे युद्धभूमीत असलेल्या सर्व योध्यांची व सैनिकांची भोजनाची व्यवस्था करणार आहोत.

यावर श्रीकृष्णाने हसत हसत उत्तर दिले की आपन ही जबाबदारी घेतलीत हे निश्चितच योग्य आहे. एवढ्या मोठ्या विशाल सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था आपल्या सारखा परिपक्व व कुशल राजा पाहत असेल, तर आम्ही त्याबातित नक्कीच निश्चिंत राहू.

महाभारत

आणि अश्या पद्धतीने उडप्पीच्या महाराजाने सैनिकांच्या भोजनाचा भार उचलला. पहिल्या दिवशी त्यांनी सर्वच सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. भोजन बनवण्यासाठी त्यांची कुशलता एवढी होती की अन्नाचा एक दाना सुद्धा वाया जात नव्हता.
परंतु जसे कसे दिवस गेले तसें अनेक योद्धे आणि सैनिक मृत्युमुखी पडले, परंतु तरी सुद्धा उडिप्पी नरेश अचूक रीतीने अन्न बनवायचे जे वाचलेल्या सर्व सैनीकांना व्यवस्थित पुरून अन्नाचा एक कणसुद्धा वाया जात नसे.

कोणालाही हे समजत नव्हते की त्यांना कसे समजत असे की आज सायंकाळपर्यत किती सैनिक मृत्यूमुखी पडणार आहेत. आणि किती वाचणार आहेत.तरी सुद्धा अचूक महाराज तेवढ्याच सैनिकांचे भोजन बनवायचे. एवढ्या मोठ्या सैनेच्या भोजनाची व्यवस्था करणे हेच एक मोठे आच्छर्य होते. जे उडिप्पीचे महाराज मोठ्या कुशलतेने सांभाळत होते.

शेवटी 18व्या दिवशी युद्ध समाप्त झाले आणि पांडवांचा विजय झाला. आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी युधिष्ठिरने उडिप्पी महाराजांना विचारलेच की आपण कश्या प्रकारे सर्व सैनिकांच्या भोजनाची एवढ्या कुशलतेने अन्नाचा एकही कण  वाया न घालवता केलीत. मी या सर्वामागचे रहस्य जाणून घेण्यास उत्सुक आहे.

त्यावर उडिप्पीच्या राजाने सांगितले की महाराज मी दररोज श्रीकृष्ण यांच्या शिबिरात शेंगा मोजून नेऊन ठेवत असे आणि श्रीकृष्ण रोज शेंगा खातअसत. रोज रात्री श्रीकृष्ण जेवढ्या शेंगा खायचे आणि जेवढ्या बाकी असायच्या त्यावरूनच मला अंदाजा येत असे की आज युद्धात किती सैनिक मारले जातील आणि किती वाचतील.

म्हणजे श्री कृष्णांनी जर 50 शेंगा खाल्या असतील तर दुसऱ्या दिवशी युद्धात त्याच्या 100 पटीने म्हणजे 50000 सैनिक मारले जायचे. मग मी त्यानुसार उरलेल्या सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करायची तयारी करत असे. तेव्हा हा सुद्धा चमत्कार भगवान श्रीकृष्णाचाच आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  या मंदिराचे हे रहस्य ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here