आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

महाभारतातील हा योद्धा आपल्या एका बाणाने संपूर्ण युध्द समाप्त करू शकत होता…!


महाभारतामध्ये एकापेक्षा एक महान आणि पराक्रमी योद्धे होते. परंतु त्याग आणि विरतेचा उल्लेख होताच महाभारतातील कर्णाची आठवण येते. महाभारतामध्ये कर्साणासारखाच आणखी एक महान आणि त्यागी योद्धा होता ज्याला खूप कमी लोक ओळखतात ज्याचे नाव आहे बर्बरिक आज जाणून घेऊया बर्बरिक याच्या महानतेबद्दल आणि त्यागाबद्दल.

महाभारत
महाभारत-बर्बरिक

बार्बरिक हा भीमपुत्र घटोत्कच आणि नाग कन्या अहिलावती यांचा मुलगा होता. काही ठिकाणी असे म्हटले जाते की त्यांचा जन्म मुर राक्षसाची कन्या कामकंटकटा हिच्या पोटातून झाला होता. बर्बारीकाला जन्मापासूनच बर्बरिक आकाराचे कुरळे केस होते, म्हणून त्याला बर्बरीक असे नाव देण्यात आले होते.

बर्बरिक हा माता दुर्गाचा उपासक होता. कृष्णाच्या सल्ल्यानुसार त्याने गुप्त क्षेत्र तीर्थस्थळ येथे मां दुर्गाची पूजा केली होती. बर्बरिकने आपल्या उपासनेत अडथळा आणणार्‍या पलासी आणि इतर राक्षसांचा वध केला होता. एकदा त्याचा सामना त्याचे आजोबा भीम याच्याशीही झाला होता.

बर्बरिकची विद्या प्राप्ति:

लहानपणापासूनच बर्बरीक खूप शूर आणि एक महान योद्धा होता. त्याने युद्ध कला आपल्या आईकडून शिकली होती. तसेच कठोर तपश्चर्या करून भगवान शिव यांना प्रसन्न केले आणि तीन अभेद्य बाण वरदान म्हणून प्राप्त केले. या तीन अद्भुत बाणांमुळेच बर्बारीकला तीन ‘बाणधारी’ असे नाव मिळाले होते. लहान वयातच बर्बरिक ने अग्नीदेवाला प्रसन्न करून एक दिव्य धनुष्यबाण मिळवला होता त्या धनुष्याच्या बळावर तो तिन्ही लोकांवर विजय प्राप्त करू शकत होता.

कुरुक्षेत्रच्या महायुद्धात सामील होण्याची इच्छा:

कौरव आणि पांडव यांच्यात महाभारतचे युद्ध अटळ झाले होते. हि बातमी जेंव्हा बर्बरिकला मिळाली तेव्हा त्याच्या मनात महाभारताच्या युद्धामध्ये सामील होण्याची इच्छा जागृत झाली होती. युद्धासाठी जाण्याच्या पहिले तो त्याच्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आईकडे आला तेंव्हा त्याने त्याच्या आईला हरलेल्या पक्षाकडून युध्द करण्याचे वचन दिले. आईचा आशीर्वाद घेऊन बर्बरिक आपल्या निळ्या रंगाच्या घोड्यावर स्वार होऊन आणि तीन बाणधारी धनुष्य घेऊन कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या दिशेने निघाला होता.

भगवान श्रीकृष्णाची भेट:

बर्बरिक जेंव्हा कुरुक्षेत्राकडे जात होता तेंव्हा रस्त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण ब्राह्मण वेश धारण करून त्याला भेटतात. त्याचा परिचय जाणून घेण्यासाठी कृष्णाने त्याची विचारपूस केली. बर्बरिक केवळ तीन बाण घेऊन युध्द करण्यासाठी निघाला आहे हे जाणून कृष्णाने त्याची खूप टिंगल उडवली होती. बर्बरिक हे बघून कृष्णानाला सांगतो कि त्याचे तीन बाण तिन्ही लोकांना पराभूत करण्यासाठी पर्याप्त आहेत. हे एकूण कृष्णाने त्याला आव्हान दिले कि त्याच्या एका बाणाने पिंपळाच्या झाडाच्या सर्व पानांना भेदून दाखवावे. जसे कि आपल्या सर्वांना माहित आहे कि कृष्ण हे एक चतुर कुटनीतीकार होते. त्यांनी एक पान आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते परंतु बर्बरीकाच्या बाणाने सर्व पानांना छेद करून कृष्णाच्या पायाला परिक्रमा घालण्यास सुरु केले. यावरून कृष्णाला बर्बरिक ची महानता समजली होती.

श्रीकृष्णाची कुटनीती:

महाभारत
महाभारतातील महान त्यागी बर्बरिक

बाल बर्बरिकच्या युध्द कौशल्यावर प्रसन्न होऊन कृष्णाने त्याला विचारले कि तो युद्धामध्ये कोणाच्या बाजूने लढणार आहे यावर बर्बरिक ने त्याच्या आईला दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. जो निर्बल असेल त्याच्याच बाजूने तो लढणार आहे. युद्धामध्ये कौरावाची हार होणार हे कृष्णाला माहित होते. परंतु बर्बारीकने जर कौरावाची बाजू घेतली तर परिणाम त्यांच्याच बाजूने होणार हेही त्यांना माहित होते. यावर उपाय म्हणून कृष्णाने परत आपल्या कुटनीतीचा सहारा घेतला.

ब्राह्मण वेशात असल्यामुळे त्यांनी बर्बारीककडून दान देण्याची इच्छा व्यक्त केली तेंव्हा वीर बर्बरिकने कृष्णाला वचन दिले की त्यांची इच्छा तो नक्कीच पूर्ण करेल. कृष्णाने त्याला त्याचे शिश दान म्हणून मागितले. यावर बर्बारीकने त्यांना त्यांच्या खऱ्या रुपामध्ये येण्यास सांगितले. तेंव्हा कृष्णाने त्याला आपल्या विराट रुपात दर्शन दिले होते.

कृष्णाने त्याचे शिश रणभूमीची पूजा करण्यासाठी दान म्हणून घेतले आणि त्याला युद्धातील सर्वात वीर म्हणून उपाधी दिली. परंतु बर्बरीकची इच्छा होती कि आपण युध्द आपल्या डोळ्याने बघावे, म्हणून कृष्णाने त्याच्या डोक्याला अमृत अर्पण करून एका उंच ठिकाणी ठेवले जेणेकरून तो संपूर्ण महाभारत युद्ध पाहू शकेल.

महाभारत युद्धात सर्वश्रेष्ठ कोण?

महाभारताचे युध्द संपल्यावर पांडवांमध्ये आपापसातच तणाव वाढला होता. सर्वजन स्वताला युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ मानत होते परंतु कृष्णाने त्यांना परामर्श दिला कि बर्बरिक संपूर्ण युध्द आपल्या डोळ्याने पाहत आला आहे त्यालाच विचारावे कि कोण सर्वश्रेष्ठ आहे. यावर बर्बरीकाच्या डोक्याने उत्तर दिले, कृष्ण हेच युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वात मोठे पात्र आहे आहेत. त्यांचे शिक्षण, त्यांची उपस्थिती, त्यांची युद्धनीती हे कुरुक्षेत्रामध्ये निर्णायक होते.

वरदान प्राप्ति:

महाभारत
महाभारतातील वरदानामुळे आजचे बाबा खाटू शामजी

भगवान कृष्ण वीर बर्बरीकच्या महान त्यागामुळे प्रसन्न होते म्हणून त्यांनी बर्बरीकला असे वरदान दिले की कलियुगात त्याला ‘श्याम’ या नावाने ओळखले जाईल. म्हणूनच आज ” हारे हुये का सहारा बाबा शाम हमारा” अशी म्हण आहे. राजस्थान मधील खाटू नगरीमध्ये त्याचे शीश दफन करण्यात आले. खाटू श्याम जी यांचे मुख्य मंदिर राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटूनगरी येथे आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… महाभारतातील सर्वांत शक्तिशाली योद्धे जे अत्यंत शक्तिशाली होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here