आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आवळा खाण्याचे हे फायदे जाणून आच्छर्यचकित व्हाल..


मोठ्या प्रमाणात विटामीन-सी असलेला आवळा प्रत्येक ऋतूमध्ये शरीरासाठी लाभदायक असतो. आवळा हा डोळे,त्वचा आणि केसांसाठी तर फायदेमंद आहेच परंतु आवळ्याचे आणखी काही असेही फायदे आहेत जे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे.  परंतु बऱ्याच जनांना आवळ्याचे हे फायदे माहिती नसतील.

आवळा

अनेक ठिकानी आवळ्याचा आपल्या आहारात उपयोग रायते, चटणी च्या रूपाने केला जातो. परंतु याचे आणखी वेगळ्या प्रकारे सेवन करणे हे आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे.

चला तर मग या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया आवळा खाण्याच्या विविध आरोग्यदायी फायद्यांविषयी.

 1. ज्या लोकांना डायबेटीजचा त्रास आहे अश्या लोकांसाठी आवळा हा अत्यंत फायदेमंद आहे. डायबेटीज च्या पेशंटला जर दररोज आवळ्याचा रस मधासोबत मिसळून दिला तर त्यांना डायबेटीज च्या त्रासापासून आराम मिळू शकतो.
 2. एसिडीटी झाल्यानंतर सुद्धा आवळा फार उपयोगी पडतो. आवळ्याचे पावडर साखरेसोबत मिसळून खाल्याने अथवा पाण्यात टाकून पिल्याने एसिडीटीपासून तुमची सुटका होते. शिवाय आवळ्याचे ज्यूस पिल्याने तुमच्या पोटाचे सर्व त्रास कमी होतील.
 3. आवळा
 4. पथरीच्या समस्यांवर आवळा चांगला उपाय म्हणून समोर येत आहे. पथरी झाल्यानंतर ४० दिवसापर्यंत वाळवलेल्या आवळ्याचे पावडर करून त्या पावडरला दररोज मुळीच्या रसात मिसळून खाल्यास मोठा फायदा होतो.
 5. रक्तात होमीग्लोबिनची कमतरता असल्यास दररोज आवळ्याच्या रसाचे सेवन करणे लाभदायी ठरते. हे शरीरात लाल रक्त कोशिकांच्या निर्मितीत सहाय्य करते. आणि शरीरात रक्ताची कमतरता भासू देत नाही.
 6. डोळ्यांसाठी आवळा आमृतासारखे काम करतो. आवळा हा डोळ्याची पाहण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतो. त्यासाठी दररोज एक चमचा आवळ्याचे पावडर आणि मध मिसळून पिल्यास डोळ्याचे साधारण रोग तसेच मोतीबिंदू सारखे रोग सुद्धा नष्ट होतात. आणि डोळ्यांची पाहण्याची शक्ती वाढते.आवळा
 7. तापीपासून सुटका होण्यासाठी आवळ्याचा रस मदत करतो. आवळ्याचा रस निट ढवळून त्याचे सेवन केल्यास तापीपासून आराम मिळतो. शिवाय दातांचे दुखने यावर सुद्धा आवळ्याचा रस फायदेमंद आहे. थोडासा रस आणि कापूर मिसळून हिरड्यांवर लावल्यास होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो.
 8. शरीरात गर्मी वाढल्यानंतर आवळा सर्वांत चांगला उपाय आहे. आवळ्याच्या रसाचे सेवन अथवा आवळ्याच्या खाण्याने शरीरात थंडपना निर्माण होतो. कारण आवळ्यात थंड गुधर्म असतो. उल्टी होत असल्यास आवळ्याचा रस दोन तीन वेळा घेतल्यास उल्टी होणे बंद होते.
 9. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट लगेच विसरण्याचा त्रास असेल तर आवळा त्यावर फायदेशीर आहे. आपला आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मोठ्या प्रमानात मदत करतो. त्यासाठी सकाळी सकाळी आवळा पावडर गायीच्या दुधात मिसळून रोज सेवन करा. त्याचा लाभ अवश्य होईल. शिवाय तुम्ही मोकळ्या वेळेत आवळा तोंडात धरून चघळत  बसलात तरी सुद्धा फायदेमंद आहे.आवळा
 10. आवळ्याचा सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे चेहऱ्यावरील डाग घालवण्यास आवळा फायदेशीर आहे. डाग काढून चेहरा सुंदर आणि तेजोमय बनवण्यास आवळा मोठी मदत करतो. आवळ्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग- चट्टे नाहीसे होऊन तुमचा चेहरा साफ आणि सुंदर होण्यास मदत होते.
 11. आवळ्याचा आणखी एक फायदा तो म्हणजे केसांसाठी. केसांना काळे ,दाट आणि चमकदार बनवण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो. आवळ्याच्या पावडर ने केस धुतल्याने अथवा आवळ्याचे सेवन केल्याने
  केसांच्या समस्यांपासून मुक्तता होते.

तर मित्रानो हे होते आवळ्याचे काही न माहिती असलेले फायदे जे तुम्हाला नेहमीच कधीतरी कामाला येतील. सर्वच शहरात अथवा खेड्यापाड्यांत सहज मिळणारा हा आवळा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजल्या जातो. आवळ्याचे गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.

जर तुम्हाला  हि माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि वाचत राहा युवाकट्टा!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here