आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

तलवार म्हणजे केवळ मुठ आणि पाते एव्हढेच असा काही लोकांचा समाज आहे. परंतु तलवार बनवण्याच्या कलेचा इतिहास खूप मोठा आणि रोचक आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

जगातील सर्वात सुंदर आणि खतरनाक मानल्या जाणाऱ्या तलवारीचा इतिहास. वाचा सविस्तर…!

इतिहासामध्ये अनेक खतरनाक तलवारीचा उल्लेख आढळतो. मग त्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार, महाराणा प्रताप यांची तलवार असो किंवा टिपू सुलतान ची तलवार. परंतु या तलवारीपेक्षाही विध्वंसक मानल्या जाणारी एक तलवार होती. जी खास रीतीने बनवल्या जायची ती म्हणजे दमास्कत तलवार.

दमास्कत तलवारीला श शरीफ उल इदरीसी असेही म्हटल्या जायचे.

तलवार

या खतरनाक तलवारीची विध्वंसकता विसाव्या शतकातील युरोपवर झालेल्या अक्रमानामधून समजल्या जाऊ शकते. या आक्रमणात सिरियाच्या सुलतान सलाद्दीनने आपल्या तलवारीने रिकोच्या सैन्याची त्यांच्या घोड्यासह अक्षरशः चिरफाड करून टाकली होती. ही तलवार इतकी तीक्ष्ण आणि धारदार होती की शत्रूच्या शिरस्त्रानाला भेदून त्यांचे शीर धडापासून अलग करत असे.

या तलवारीचे एक खास वैशिष्ठ्या होते ही तलवार पूर्ण काटकोनात दुमडली जाऊ शकत होती. आणि परत आपल्या मूळ आकारामध्ये वापस येवू शकत होती. तलवारीच्या या वैशिस्थ्यामुळे अनेक पाश्चिमात्य धातूशास्त्रज्ञ या तलवारीवर वर्षानुवर्ष शोध करत होते परंतु आजपर्यंत या तलवारीचे रहस्य कोणीही उलगडू शकले नाही.

हि तलवार बनवण्यासाठी पोलादाबरोबर ०.१० ते ०.१५ प्रमाणात कार्बन चा उपयोग केला जायचा. परंतु कार्बनच्या प्रमाणात थोडीशी चूक झाल्यास या तलवारीचा दर्जा खराब होत असे. या तलवारीमध्ये कार्बन व्यतिरिक्त निकेल, सिलिकॉन, व्हॅनिडियम आणि मॅग्नेशियम सारख्या धातूचा देखील वापर केला जायचा.

तलवार

इतिहासामध्ये आजपर्यंत या धारदार तलवारीने अनेक लोकांचा जीव घेऊन अनेक घरे नष्ट केली आहेत.  या तलवारीला सर्वात सुंदर आणि शक्तिशाली तलवार म्हटले आहे. या तलवारीचा उपयोग जपानचे सामुराई पण करतात
जपानी लोक या तलवारीला कटाना देखील म्हणतात. जपानमध्ये सामुराई तलवार आजही कोमिया वंशातील लोक बनवतात. या तलवारीला कधीही जंग लागत नाही आणि सदैव धारदार राहते.

दमास्कस धातूला वूत्ज असेही म्हणतात. वूत्ज हे नाव कन्नड शब्द वूकुणु पासून आला आहे. वूत्ज धातू बनवण्याची सुरुवात भारतातूनच झाली आहे. त्यानंतर हि टेक्निक भारतात येऊन बसलेल्या याहुदींनी शिकली आणि आपल्या देशात म्हणजेच सिरीयामध्ये याचा प्रचार केला आणि जगाला दमास्कस नावाने याची ओळख करवून दिली.

दमास्कस सिरीयाची राजधानी असुन तेथे ही तलवार अगदी प्राचीन काळापासूनच बनवली जात आहे . पूर्वी भारतातुन लोखंडाचे गोळे दमास्कस ला पाठवले जात होते आणि तेथे उत्तमोत्तम तलवारीच्या पात्यांची निर्मिती केली जात असे. भारतात देखिल हि तलवार बनवली जात होती आणि आजही बनवली जाते.

तलवार

अशा उच्च दर्जाच्या तलवारीस आवरण म्हणून उंबर व पांगिराच्या लाकडापासून बनविलेले म्यान तयार केले जायचे. या म्यानासाठी सोन्याचांदीचे जरीकाम केलेल्या मलमलीच्या कापडाचे, रेशीम वा चामड्याचे आवरण चढविले जात असे.तलवार हि देवी देवतांच्या काळापासूनच शस्त्र म्हणून वापरण्यात येत आहे.

याच प्रमाणे काही स्थानिक प्रांतांमध्ये समशेर, तेगा, कत्ता, हे तलवारीचे नावे शौर्याचे प्रतिक मानल्या जायचे. काही तलवारी तर आजही अनेक देशांच्या झेंड्यावर आजही पाहायला मिळते.

मराठा तलवार आणि फिरंग या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजंची भवानी तलवार हि एक फिरंग आहे. फिरंग तलवारीचे पाते हे सरळ असते आणि ती हलकी असते. याउलट मराठा तलवारीचे पाते हे थोडे वाकडे असते.

प्राचीन काळी आजच्या सारखे आधुनिक शस्त्र आणि मिसाईल अस्तित्वात नव्हत्या त्यामुळे तलवार हेच त्याकाळचे जास्त परिणामकारक शस्त्र मानल्या जायचे. या तलवारी बनवण्यासाठी अनेक महिने हातानी मेहनत करावी लागत असे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… या मंदिराचे हे रहस्य ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here