आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

‘नाइट’ बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खडतर प्रवासाबद्दल. वाचा सविस्तर…!

इतिहासामध्ये एक ‘नाइट’ किंवा ‘वॉरियर’ ही पदवी मिळविणे अत्यंत सन्माननीय बाब मानल्या जात असे. परंतु ‘नाइट’ हे शीर्षक मिळवणे इतके सोपे नव्हते, त्यासाठी खूप मेहनत करावी लागत असे. एकेकाळी ही पदवी केवळ राजा किंवा अन्य महत्वाच्या वर्गातील लोकांपुरती मर्यादित होती. परंतु कालांतराने ‘नाइट’हि पदवी सामान्य लोकांना पण दिली जात होती , जे खरोखरच यासाठी पात्र होते.

 

‘नाइट’ हि पदवी मिळवण्यासाठी लहानपणापासूनच शिस्तबद्ध राहून मेहनत करावी लागे. यासाठी लहान वयात मुलांना स्वताला सिध्द करून दाखवण्यासाठी, एका महान योध्यामध्ये असणारे सर्व गुण अर्जित करून घ्यावे लागत असे.

०१ ) प्रशिक्षण:

नाइट

१३ व्या शतकात युरोपमध्ये सामान्यत: ‘नाईट्स’ किंवा ‘योद्धा वंशाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मुलांना शिकवले जात असे. फ्रान्स आणि जर्मनीसोबतच संपूर्ण युरोपमध्ये एका नाइटचा मुलगाच नाइट बनू शकत होता. मध्ययुगात  साधारणतः योद्धा बनण्याचे प्रशिक्षण राजकुमारांना किंवा योद्ध्यांच्या मुलांनाच दिले जायचे.

परंतु कालांतराने परिवर्तन होऊन सामान्य लोकांना आणि त्यांच्या मुलानाही युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. स्वताला नाइट म्हणून सिध्द करण्यासाठी घोडस्वारी, तलवारबाजी तसेच युद्धामध्ये वापरले जाणारे सर्व शस्त्र कटार, भाला, तीरकमान हे चालवण्यामध्ये पारंगत व्हावे लागत असे.

योद्धा म्हणून तयार केली जाणारे मुलं वयाच्या सातव्या वर्षापर्यंत राजवाड्यातील महिलांच्या देखरेखीखाली राहत होती. यानंतर त्यांना एका वेगळ्या घरात म्हणजे ‘हाऊस ऑफ लॉर्ड किंवा नाईट’ मध्ये दाखल व्हावे लागे. याठिकाणी या मुलांना पेज म्हणून संबोधल्या जायचे. याच कालावधी मध्ये त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेले शिक्षण दिले जायचे. या मुलांना शिकारी पासून ते धर्म कर्म तसेच वाचण्याचे आणि लिहिण्याचेही प्रशिक्षण दिले जात होते.

०२ ) ‘स्क्वायर’ (esquire):

नाइट

७ व्या वर्षापासून ते १३ व्या वर्षापर्यंतच्या मुलांना पेज म्हणत तर १४ व्या वर्षात पदार्पण करताच त्यांना (esquire)म्हणून पुढे पाठवले जात असे. ‘स्क्वायर’ हा शब्द फ्रेंच शब्द इक्वेयर पासून आला आहे. ज्याचा अर्थ ‘कवच वाहक’ असा आहे.
पहिल्या टप्यात ‘स्क्वायर’ मुलांना शस्त्र हाताळणी आणि घोडस्वारी व्यतिरिक्त त्यांना अनेक रचनात्मक गुणही शिकून घ्यावे लागत.

तसेच दुसर्‍या टप्प्यात त्यांना पुढील शिक्षण देण्यात यायचे. यामध्ये त्यांना धार्मिक गुरूंकडून एक पवित्र तलवार दिल्या जायची आणि त्यांच्याकडून शपत घेतली जात असे कि ते या तलवारीचा उपयोग केवळ धर्मरक्षणासाठीच करतील. यामध्ये स्क्वेअर ऑफ बॉडी, स्क्वेअर ऑफ चेंबर, द कॅविव्हिंग स्क्वेअर, वाईन स्क्वेअर, आर्म्स स्क्वेअर, यांचा समावेश होता.

०३ ) युध्दकले सोबतच अन्य गोष्टींची शिकवण:

फक्त युद्धाचे कौशल्य शिकवण्याव्यतिरिक्त त्यांना आणखी कला सुद्धा शिकवण्यात येत ज्यामध्ये, संगीत, नृत्य , फ्रेंच आणि लॅटिन भाषा वाचण्याचे आणि लिहिलण्याचे तसेच कविता बोलण्याचे शिक्षण दिले जायचे. त्याचबरोबर चांगल्या सवयींचा अवलंब करण्यावरही भर देण्यात येत असे.

त्यांना खासकरुन स्त्रियांसमवेत चांगला व्यवहार ठेवण्याचेही शिकवले जायचे यासाठी ते महिलांसोबत बुद्धिबळांचा खेळ खेळत असत आणि शिकार करण्यासाठी  जात असत. प्रशिक्षणादरम्यान स्क्वायरला भाला आणि तलवारीने सराव करावा लागत असे . ह्या तलवारी रणांगणात वापरल्या जाणार्‍या तलवारींपेक्षा भारी आणि धोकादायक बनवाल्या जायच्या जेणेकरून युद्धामध्ये लढताना योद्धाला त्याचे युध्द हे जास्त त्रासदायक वाटू नये.

०४ )’नाइट’ उपाधी:

नाइट

हि उपाधी त्यांना १८ ते २१ वर्ष वयादरम्यान मिळत असे. स्क्वेअरला ‘नाईट’ लॉर्ड किंवा त्यांचा नाइट बनवले जायचे. जो योद्धा होऊ शकत नाही तो चर्चमध्ये काम करायचा. नाईट हि उपाधी त्याकाळची तिसरी आणि शेवटची होती. एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करून त्यादिवशी त्यांना हि पदवी दिल्या जायची.

या कार्यक्रमामध्ये त्यांना विशिष्ठ प्रकारचे कपडे दिल्या जायचे. यानंतर, स्क्वायर राजासमोर किंवा ‘नाइट’समोर  गुडघे टेकून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत असे. त्यानंतर नाइट त्याच्या गालांचे चुंबन घेत त्यांचा आदर कबुल करत. याच बरोबर एका स्क्वायर चे रुपांतर नाईट मध्ये होत असे आणि तो आपल्या राजाच्या सेवेमध्ये सामील होत असे. एका निरागस लहान मुलापासून ‘नाइट’ बनण्यासाठी एवढी मेहनत करावी लागत होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… हि आहे इतिहासातील सर्वात विध्वंसक तलवार..!

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here