आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
रेड कार्पेटवर चालणे हि खूप मानाची आणि प्रतिष्ठेची बाब मानल्या जाते. रेड कार्पेट हे खास प्रसंगीच आणि खास लोकांसाठीच टाकले जाते. कधी आपल्या मनात असा प्रश्न अवश्य आला असेल कि या रेड कार्पेटची सुरुवात कधीपासून आणि कशासाठी झाली असेल? जाणून घेऊया याबद्दलचा इतिहास सविस्तर…!
तसे तर रेड कार्पेटची परंपरा ही बाहेर देशातून सुरु झाली होती.

परंतु आजच्या वेळी हँडमेड रेड कार्पेट उत्पादनामध्ये भारत अव्वल स्थानी आहे. भारतात बनवल्या जाणाऱ्या रेड कार्पेटचे ७० ते ८० टक्के उत्पादन हे बाहेर देशात निर्यात केले जाते. आपल्या देशात सहज उपलब्ध होत असल्यामुळे बऱ्याच कार्यक्रमांमध्ये रेड कार्पेटचा उपयोग केल्या जातो.
असे म्हटल्या जाते कि रेड कार्पेटचा वापर हा सामान्य जनतेसाठी नाही तर विशेष अतीथींसाठी केला जात होता. इतिहासामध्ये सर्वप्रथम रेड कार्पेटचा उल्लेख हा एक जुन्या युनानी नाटकात अगामेमनॉन मध्ये केलेला आढळतो. हि गौतम बुद्धांच्या काळची गोष्ठ आहे.
या नाटकामध्ये असे दाखवण्यात आले होते कि, ग्रीक राजा अगामेमनॉन हा आपल्या पत्नीला सोडून युद्ध करण्यासाठी जातो. हे युद्ध अनेक दिवस चालले होते त्यामुळे राजा आणि राणी हे दोघेही एकमेका सोबत प्रामाणिक राहत नाहीत.
ज्यावेळी राजा हे युध्द जिंकून आपल्या देशात वापस येतो त्यावेळी एक अन्य राणी आपल्या सोबत घेऊन येतो, असे असले तरीही राणी क्लाइटेनेस्ट्रा आपल्या विजयी पतीच्या स्वागतासाठी लाल रंगाची कालीन जमिनीवर टाकते. राजाची त्या कार्पेटवर चालण्याची बिलकुल इच्छा नसते कारण
ग्रीक माण्यतेनुसार केवळ देवांनाच रेड कार्पेटवर चालण्याचा अधिकार होता.
परंतु राणीच्या आग्रहाखातीर राजा त्या कार्पेटवर चालत येतो. त्यानंतर रेड कार्पेट हे ग्रीस मधून होत जगातील अन्य देशांमध्ये प्रचलित झाले होते.
रेड कार्पेट अधिकृतरीत्या पहिल्यांदा १८२१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मॉरोय यांच्या स्वागतासाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर १९०२ साली न्यूयॉर्कमधील न्यू एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाश्यांसाठी रेड कार्पेटचा वापर करण्यात आला. १९२० च्या नंतर तर हॉलीवूड आणि इतर फॅशन इव्हेंटमध्ये रेड कार्पेटहे सामान्य झाले होते.
भारतात पहिल्यांदा रेड कार्पेटचा कधी वापर करण्यात आला याचा कुठेही विशेष उल्लेख आढळत नाही. परंतु असे म्हटल्या जाते कि याचा वापर भारतात सर्वप्रथम १९११ मध्ये तत्कालीन व्हायसराय लॉर्ड हार्डिंगे यांनी किंग जॉर्ज व्ही यांच्या स्वागतासाठी दिल्लीच्या दरबारामध्ये केला होता.

हा दरबार लाल किल्ल्यामध्ये भरला होता आणि त्या वेळी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. लाल किल्ल्यात त्यावेळी खूप झाडे झुडपे होती त्याची सफाई करण्यात आली होती आणि किंग जॉर्ज व्हि सोबत राणी मेरीसाठी पण रेड कार्पेट वापरण्यात आले होते. आजच्या वेळी हे रेड कार्पेट परदेशी पाहुण्यांसाठी, राष्ट्रपती भवन, लोकसभा आणि राज्यसभेतहि वापरले जाते.
तसेच भारतामध्ये तर आता रेड कार्पेट हे बॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच पुरस्कार सोहळ्यांमध्येही कलाकारांसाठी वापरले जाते. एकेकाळी फक्त उच्चभ्रू लोकच वापरू शकणारे रेड कार्पेट हे अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… हि आहे इतिहासातील सर्वात विध्वंसक तलवार..!