आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

अर्नब गोस्वामी : एका वृत्तपत्राच्या पत्रकारापासून ते भारतातील अव्वल न्यूज चॅनेलचा मालक…!

अर्नब गोस्वामी हा एक असा टीव्ही अँकर आहे जो आपल्या डिबेट करण्याच्या कलेने चांगल्या चांगल्यांची बोलती बंद करतो. अर्नब गोस्वामीच्या एका प्रसिध्द डायलॉगने (Nation Wants to Know) भारतीय न्यूज मिडीयामध्ये धुमाकूळ घातला आहे. आपल्या डिबेट मध्ये सर्वांची बोलती बंद करणाऱ्या आणि आपल्या कामगिरीने सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या अर्नब गोस्वामी यांच्या एका वृत्तपत्राच्या पत्रकारापासून ते भारतातील अव्वल न्यूज चॅनेलचे मालक बनण्याचा प्रवास वाचा सविस्तर…!

अर्नब गोस्वामीचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी आसाम राज्याची राजधानी असलेल्या गुवाहटी शहरामध्ये झाला. त्यांचे वडील मानोरंजन गोस्वामी हे एक रिटायर्ड कर्नल आहेत. कर्नल गोस्वामी हे भाजपचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांनी १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून भाग घेउन कॉंग्रेसचे उमेदवार भुवनेश्वर कलिता यांचा पराभव केला होता.

new google

अर्नब गोस्वामीचे आजोबा रजनीकांत गोस्वामी हे कॉंग्रेस नेता तसेच एक प्रसिध्द वकील होते. तसेच त्यांचे काका सिद्धार्थ भट्टाचार्य हे गुवाहाटी पूर्वचे भाजप तर्फे आमदार होते. तसे पहिले तर अर्नबाच्या पूर्ण परिवाराचा राजकारणाशी जवळचा संबंध राहिला आहे.

कदाचित यामुळेच त्यांची बोलण्याची शैली हि बाकी न्यूज अँकरपेक्षा अलग आहे.

शैक्षणिक जीवन:

अर्णबचे वडील आर्मी ऑफिसर होते त्यामुळे अर्णबला वेगवेगळ्या शहरात जावं लागलं आणि त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. अर्नबने आपली बैचलर ची डिग्री हि सोशियोलॉजी मध्ये हिंदू कॉलेज मधून घेतली आहे. हे कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटीशी संलग्न आहे. या पदवीमध्ये त्यांना खास सन्मानही मिळाला आहे.

त्यानंतर अर्णबने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मध्ये येणाऱ्या सेंट अँटनीज स्कूलमधून सोशल अ‍ॅन्थ्रोपॉलॉजीमध्ये मास्टर्स ची पदवी मिळवली. इंग्लंडमधील या कॉलेजमुलळेच त्यांना जीवनात एक नवीन दृष्टीकोन मिळाला आणि गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याची क्षमता मिळाली.

करिअर:

अर्नब गोस्वामी

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्नब ने सर्वप्रथम १९९५ मध्ये द टेलीग्राफ या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. या वृतपत्रात जवळपास एक वर्ष काम केल्यावर त्यांनी राजीनामा देऊन टीव्ही न्यूज NDTV 24*7 मध्ये सामील झाले. येथे त्यांनी डेली न्यूजशो मध्ये अँकरिंग करण्यास सुरुवात केली तसेच यासोबतच ते DD मेट्रो वर प्रसारित होणाऱ्या News to night ची पण अँकरिंग करू लागले.

आपल्या चांगल्या कामगिरीमुळे अर्नबला NDTV मध्ये वरिष्ठ संपादक करण्यात आले. चॅनेलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या सर्व कंटेंट ची जबाबदारी आता त्यांच्यावरच आली होती म्हणून त्यांनी डीडी मेट्रो चे काम बंद करून पूर्ण वेळ NDTV 24*7 साठी काम करण्यास सुरवात केली. अर्नबने आता NDTV चा प्राइम शो न्यूज नाईट होस्ट करण्यास सुरुवात केली.

२००४ मध्ये या शोमुळे त्यांना Asia’s best news anchor हा एशियन टेलीव्हिजनचा पुरस्कार मिळाला होता.

अर्नब गोस्वामी

२००६ मध्ये अर्णब गोस्वामी यांनी NDTV ची नोकरी सोडली आणि Times now मध्ये Editor in chief आणि एक अँकर म्हणून रुजू झाले.

Times now मध्ये अर्नबने रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या लाइव न्यूज प्रोग्राम News Hours ला होस्ट करण्यास सुरुवात केली. या प्रोग्राममध्ये जगातील अनेक विख्यात लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता. याव्यतिरिक्त अर्नबने Frankly speaking with Arnab या खास मुलाखत कार्यक्रमामध्ये होस्टिंग केली होती.

या कार्यक्रमात अर्नब गोस्वामी यांनी बेनझीर भुट्टो, हमीद करझाई, दलाई लामा, हिलरी क्लिंटन आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या जगातीलअनेक प्रसिध्द व्यक्तींची मुलाखत घेतली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या लाइव न्यूज अँकरिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते स्क्रिप्टशिवाय असे प्रश्न विचारतात कि उत्तर देणाराही क्षणभर गोंधळून जातो आणि विचार करतो कि याचे उत्तर काय देऊ?

प्रश्न विचारताना झळकणारे त्यांचे अग्रेशन हे पण त्यांची लोकप्रियता वाढण्याचे कारण आहे. त्यांच्या न्यूज प्रेजेंटेशन स्टाइलने अनेक लोकांना वेड लावले आहे.

अर्णब गोस्वामीच्या लोकप्रियतेची कल्पना यावरून करता येते कि, त्यांचा एखादा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड होताच काही तासांत हा कोट्यावधी लोकांकडून पहिल्या जातो. तसेच त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या न्यूज प्रोग्रामची टीआरपी अन्य न्यूज प्रोग्रामांपेक्षा खूपच जास्त असते.

स्वप्नपूर्ती:  

अर्नब गोस्वामी

१ नोव्हेंबर २०१६ ला अर्नब गोस्वामी यांनी Times now ची नोकरी सोडली आहे. याचे कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले कि त्यांना कॉर्पोरेट हाऊसच्या सहकार्याने त्यांचे स्वतःचे न्यूज चॅनेल स्थापित करायचे आहे. त्यांचे स्वप्न आहे कि भारतामध्ये CNN आणि BBC सारखे एखादे ग्लोबल न्यूज चॅनेल असावे ज्यामुळे जगभरात भारतीय प्रसारमाध्यमांची एक विशिष्ठ ओळख निर्माण होईल.

६ मे २०१७ रोजी अर्नब गोस्वामीने स्वताचे न्यूज चैनल काढले आहे ज्याचे नाव आहे रिपब्लिक टीव्ही (Republic midea networks).

free to air असणारे हे चैनल भारतातील मोस्ट वॉन्टेड इंग्लिश न्यूज चैनल आहे. काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही या हिंदी चैनलने टीआरपी मध्ये आज तक सारख्या चैनलला मागे टाकले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here