आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

मेघनाथ या शक्तीमुळे देवांचे राजा इंद्रदेवांना पराजित करू शकला होता…!

हिंदू धर्मात रामायणाला एक पवित्र ग्रंथ मानले गेले आहे. रामायणात राम, लक्ष्मण सीता, हनुमान, रावन, कुंभकर्ण, बिभीषण यांसारख्या अन्य महान व्यक्तीचा उल्लेख आहे. जे सर्वजण आपापल्या शक्तीमुळे प्रसिद्ध होते.

यांच्याव्यतिरिक्त रामायणात असा एक योद्धा होतो जो आपल्यातील आफाट शक्तीमुळे संपूर्ण देवीदेवतांसमोर युद्धात वरचढ ठरला होता.  तो योद्धा म्हणजे स्वतः लंकेश रावणाचा पुत्र मेघनाथ . मेघनाथ रावणाचा जेष्ठ पुत्र होता. आपल्या पित्याप्रमाणेच तो शक्तिशाली होता.

मेघनाथने इंद्राला हरवून तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता. त्यामुळेच त्याचे नाव इंद्रजित असे पडले होते.

मेघनाथ

परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की मेघनाथने देवेंद्रासोबत युद्ध का केले होते? आणि ते युद्ध किती भयानक होते?आणि  खरोखर देवांचे राजा इंद्राना पराजित करण्याची शक्ती मेघनाथमध्ये होती का? आज जाणून घेऊयासविस्तर…

हे तर सर्वांनाच माहिती आहे की, रावणाने आपल्या शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता. रावण शक्तिशाली तर होताच शिवाय तो एक महाज्ञानी सुद्धा होता.

रावणाने तिन्ही लोकांवर विजय मिळवल्यानंतर मंदोदरीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसांनी रावणाच्या मनात ही इच्छा आली की,त्याला मंदोदरी कडून एक असा मुलगा हवा जो त्याच्यापेक्षाही साहसी, पराक्रमी आणि वीर असावा.

त्यासाठीच रावणाने जेव्हा मंदोदरी आपल्या पुत्राला जन्म देण्याच्या वेळी पुत्राच्या कुंडलीतील सर्व ग्रहांना 11 व्या स्थानी आणून बसवले.  परंतु रावणाच्या नीतीला जाणून घेतलेले शनिदेव 11 व्या स्थानाऐवजी 12व्या स्थानी विराजमान झाले.  ज्यामुळे रावणाला त्याच्या इच्छेनुसार पुत्र प्राप्त नाही झाला.

मेघनाथ

जेव्हा रावण आणि मंदोदरी यांच्या जेष्ठ पुत्राचा जन्म झाला तेव्हा त्याचा रडण्याचा आवाज हा विजेच्या आवाजापेक्षाही जोरात होता. यामुळेच रावणाने आपल्या पुत्राचे नाव मेघनाद ठेवले.

राक्षस गुरु शुक्राचार्य यांच्याकडून शिक्षण आणि शस्त्रशक्ती प्राप्त करून घेतल्यानंतर मेघनाथने  महादेवाची आराधना करण्यास सुरवात केली.

अनेक वर्षाच्या कठीण तपश्चर्येनंतर महादेव प्रसन्न झाले. आणि वरदान म्हणून मेघनाथला आपली अमोघ शक्ती प्रदान केली.

लंकानगरीत परतल्यानंत रमेघनाथने ही गोष्ट लंकेश रावणाला सांगितली आणि आपल्या मिळालेल्या शक्तीचा वापर करण्यासाठी मी देवलोकांवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे असे सांगितले.

आपल्या पुत्राच्या तोंडे असे विरतापूर्ण वाक्य ऐकून रावणाने मेघनाथला आशीर्वाद देऊन युद्धास पाठवले. मेघनाथ आशीर्वाद घेऊन देवलोकांवर आक्रमण करण्यास निघून गेला.

देवलोक पाहोचतात मेघनाथने सर्वप्रथम इंद्राच्या सभेवर आक्रमण केले. ज्यामुळे सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व देव देवता घाबरून पळत सुटले. तेव्हा मेघनाथ  इंद्रांना म्हटला मी तुझ्यासोबत युद्ध करू इच्छितो, जर तू कायर नसशील तर येऊन माझ्यासोबत युद्ध कर.

तेव्हा देवेंद्र मेघनाथला म्हणाले की मेघनाथ तुझी ही युद्धाची इच्छा बरोबर नाही. असं नको व्हायला की या युद्धात  तुझ्यासोबतच तुझ्या घरच्यांचा सुद्धा विनाश यामुळे होईल..

मेघनाथ

त्यानंतर मेघनाथ आणि इंद्रामध्ये एक भीषण युद्ध सुरु झाले. जे युद्ध खुप वेळ सुरु होते. खूप वेळ होऊनही कोणीही पराजित होत नसल्यामुळे मेघनाथने शेवटी महादेवांनी दिलेल्या अमोघ शक्तीचा उपयोग केला. आणि इंद्रदेव त्याच्यापूढे हात जॊडून उभे राहिले.

जर इंद्रदेवांना वाटले असते तर ते त्या अमोघ शक्तीला सुद्धा उत्तर देऊ शकले असते. परंतु असे करून ते महादेवांचा अपमान करू इच्छित नव्हते.

अश्या पद्धतीने मेघनाथने अमोघ शक्ती चालवून इंद्रदेवाना बंदी बनवले. जेव्हा तो इंद्रदेवांना घेऊन लंकेकडे जात होता तेवढ्यात तेथे ब्रह्मदेव प्रगट झाले. आणि त्यांनी मेघनाथला तिन्ही लोकांचा विजेता संभोधून इंद्राला मुक्त करण्याची विनती केली.

एक दिव्य रथाचे वरदान घेऊन मेघनाथने इंद्रदेवांणा मुक्त केले. या रथात बसून युद्ध केल्यानंतर कोणताही शक्तीशक्ती योद्धा इंद्रजितला पराजित करू शकत नव्हता…

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here