आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
वॉयनिक मैनुस्क्रिप्ट: जगातील सर्वात रहस्यमय पुस्तक…!
हे जग अगणिक रहस्याने भरलेले आहे. यातील काही रहस्य सोडविण्यात मानवाला यश आले आहे. परंतु आजही जगात अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचे निराकरण करणे जवळजवळ अशक्य आहे. असेच एक रहस्य आहे २४० पानांचे एक प्राचीन पुस्तक “वॉयनिक मैनुस्क्रिप्ट”.

वॉयनिक मैनुस्क्रिप्ट या पुस्तकाबद्दल असेही म्हणले जाते कि, आजपर्यंत या पुस्तकाला कोणीही वाचू शकले नाही. इतिहासकारांच्या मते हे रहस्यमय पुस्तक ६०० वर्षांपूर्वीचे आहे. कार्बन डेटिंग केल्या नंतर हे पुस्तक १५ व्या शतकात लिहिले गेल्याचे समजले आहे.
वॉयनिक मैनुस्क्रिप्ट हे पुस्तक हाताने लिहिलेले आहे परंतु यामध्ये काय लिहिले आहे आणि कोणत्या भाषेमध्ये लिहिले आहे हे आजपर्यंत कोणालाच समजले नाही. हे पुस्तक एक नउलगडलेल्या पहेली सारखे आहे. म्हणूनच याला ‘वॉयनिक मैनुस्क्रिप्ट’ हे नाव दिले आहे.

वॉयनिक मैनुस्क्रिप्ट या पुस्तकामध्ये मानावांपासून झाडाझुडुपांची अनेक चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. यामध्ये सर्वात विचित्र गोष्ठ हि आहे कि, या पुस्तकात अशा काही झाडांची चित्रे आहेत जे झाड या जगात अस्तित्वातच नाही.
या पुस्नातकाचे नाव ‘वॉयनिक मैनुस्क्रिप्ट’ हे इटलीच्या विलफ्रीड वॉयनिक या पुस्तक विक्रेत्याच्या नावावरून ठेवले आहे. कारण याच पुस्तक विक्रेत्याने हे रहस्यमयी पुस्तक १९१२ मध्ये एका ठिकाणाहून खरेदी केले होते.

असे म्हटल्या जाते कि या पुस्तकामध्ये अनेक पाने होती परंतु काही पाने खराब होऊन आता यामध्ये केवळ २४० पानेच शिल्लक राहिले आहेत.
वॉयनिक मैनुस्क्रिप्ट या पुस्तकात बायोलॉजी, एस्ट्रोनॉमी, कॉस्मोलॉजी, झाडं झुडुपांची माहिती, आयुर्वेद, असे वेगवेगळे भाग पाहण्यास मिळतात.

या पुस्तकाबद्दल जास्त काही समजले नाहीये परंतु यामध्ये काही शब्द लॅटीन आणि जर्मन भाषेत असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
काही लोकांच्या मते या पुस्तकाला यातील रहस्य लपवण्या करिता एका विशिष्ठ शैलीमध्ये लिहिण्यात आले आहे. आता यामध्ये कोणते रहस्य दडलेले आहे हे तर या पुस्तकाला लिहिणाऱ्यालाच माहित असेल.

येणाऱ्या काळात जर या पुस्तकाला कोणी वाचू शकले तर याचे रहस्य नक्कीच जगासमोर येईल, परंतु तोपर्यंत हे पुस्तक एक ‘पहेली’ म्हणूनच राहणार आहे.===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!