आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
महाभारत युद्धातील ५ योद्धे, ज्यांचा कपट करून वध केला गेला..!
महाभारताच्या युद्धाला धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्ध मानल्या जाते. या युद्धात लाखो सैनिक आणि अनेक वीर योद्ध्यांना वीरमरण आले होते. कुरुक्षेत्र मध्ये लढल्या गेलेल्या या युद्धाची भयानकता या गोष्टीवरून कळते की, महाभारत युद्धामुळे आज कुरूक्षेत्रची माती लाल आहे. या युद्धात सहभागी असलेले अनेक असे महारथी ज्यांना मारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती तरी सुद्धा ते मारल्या गेले.
आज जाणून घेऊया कि कश्या पद्धतीने पांडवांनी युद्ध जिंकण्यासाठी श्रीकृष्ण यांच्या लीलेनुसार कपट करून अश्या योध्यांचा वध केला, ज्यांना मारणे कोणासाठीही जवळपास शक्य नव्हते.
भीष्म पितामह:
कपट करून मारण्यात आलेल्या योध्यांपैकी सर्वांत पहिले नाव आहे ते म्हणजे पितामह भीष्म. कौरव आणि पांडवांचे पितामह भीष्म महाभारत युद्धात भाग घेणारे सर्वांत पराक्रमी योद्धा होते. असं म्हटल्या जाते कि १८ दिवस चाललेल्या या महाभारताच्या युद्धात भीष्म पितामह तब्बल १० दिवस पांडवांच्या विजयामध्ये अडथळा बनून राहिले होते.
जेव्ह्या पितामह भीष्म ला कोणत्याही प्रकारे अर्जुन पराजित करू शकत नव्हता तेव्हा श्री श्री कृष्णाच्या सांगण्यानुसार पांडवानी श्रीखंडीला ढाल बनवून युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्म यांचावर बाणांचा वर्षाव केला. नंतर भीष्म यांनी युद्धाच्या शेवटी स्वतः: प्राणत्याग केला होता.
द्रोणाचार्य:
कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांना हरवणे असंभव होते. असं म्हटले जाते कि, द्रोणाचार्यांना फक्त त्यांचा शोक हि मारू शकत होता. पितामह भीष्म यांच्या नंतर गुरु द्रोणाचार्य यांनी कौरव सेनेचे नेतृत्व केले. सेनापती बनल्यानंतर द्रोणाचार्य पांडव आणि विजयाच्या मध्ये उभे होते.
तेव्हा पांडवानी पुन्हा एकदा श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून कपट केले. श्री कृष्णाने भीमाला सांगितले कि ,तू अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मार,आणि युद्धभूमीत अश्वत्थामा मारला गेला असं सांग.
द्रोणाचार्य यांच्या पुत्राचे नाव सुद्धा अश्वत्थामा होते.अश्वत्थामा मारल्या गेला असं एकटाच गुरु द्रोणाचार्य शस्त्र टाकून जमिनीवर बसले. याचदरम्यान धृष्टद्युम्नने गुरु द्रोणाचार्य यांचे मस्तक धडावेगळे केले.
जयद्रथ:
अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याला मारणार्यांपैकी एक असलेला दुर्योधांचा मेहुणा जयद्रथ सुद्धा सहभागी होता. जयद्रथला आपल्या पुत्राच्या मृत्यूचे कारण समजून अर्जुनाने शपथ घेतली होती कि, जर सायंकाळपर्यंत जयद्रथचा वध नाही करू शकलो तर स्वतः जळत्या अग्नीत आत्मदहन करेल.
सायंकाळ होत आली होती, तरीसुद्धा जेव्हा श्रीकृष्णांना अर्जुनचे जयद्रथला मारणे शक्य वाटत नवते तेव्हा, श्रीकृष्णाने आपल्या मायेचा उपयोग करून सूर्य झाकला. ज्यामुळे चारी बाजूला अंधकार पसरला.
ते पाहून जयद्रथ समजला कि, सायंकाळ झाली आहे आणि तो स्वतः अर्जुनाच्या समोर आला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मायेणे पुन्हा एकदा युद्धभूमीत उजेड आला. आणि कृष्णाचा इशारा मिळताच अर्जुनाने जयद्रथचा वध केला.
अंगराज कर्ण:
अंगराज कर्णाला युद्धात पराजित करणे अर्जुनासाठी शक्य नव्हते. जेव्हा कर्णाच्या रथाचे चक युद्धभूमीत फासले तेव्हा श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच वेळी निशस्त्र असलेल्या कर्णावर बन चालवला आणि कर्णाचा वध केला.
श्रीकृष्ण हे चांगल्या प्रकारे जाणून होते कि कर्णाला मारणे सर्जुनासाठी सोपे नव्हते. कर्णाला दिल्या गेलेल्या श्रापामुळे त्याच्या रथाचे चाक युद्धभूमीत फसले आणि तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला आदेश दिला.
दुर्योधन:
महाभारत युद्धातील कौरव सेनेचा सर्वांत शेवटचा योद्धा म्हणजे दुर्योधन. महाभारत युद्धाच्या शेवटच्या दिवशी भीम आणि दुर्योधनात गधायुद्ध झाले. या युद्धात कंबरेच्या वरती वर करण्याचा नियम होता परंतु भीमाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून दुर्योधनाच्या कमरेच्या खाली वर केले आणि दुर्योधनाचा कपटाने वध केला.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… इंटरनेटबद्दलचे 5 रहस्य जे आजपर्यंत कोणीही उलगडू शकले नाही..!