आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कंगना राणावतने केलेली काही विवादित विधाने. वाचा सविस्तर…!

आजच्या वेळी अभिनेत्री कंगना राणावतची गणना ही बॉलीवूडमधील मोठ्या स्टार्समध्ये केली जाते. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो परंतु आपल्या साकारलेल्या भूमिकांनी लोकप्रियता मिळवणारी कंगना हि तिच्या सोशल मिडीयामध्ये दिलेल्या विधानांमुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली असते.

नेहमी निर्भिडपणे बोलणारी कंगना राणावत अनेक वेळा तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भवऱ्यात अडकलेली आहे. कंगनाने अशी अनेक विधाने केली आहेत ज्यामुळे केवळ नवीन वादविवाद सुरू झाले नाहीत तर बर्‍याच प्रसंगी या अभिनेत्रीला ट्रोलही केले गेले आहे.

०१ ) मुंबई हि पाकव्याप्त काश्मीर झाले आहे 

 कंगना राणावत

कंगना राणावतचे हे विधान बर्‍याच काळापर्यंत सर्वांच्या लक्षात राहणार आहे. तिच्या या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल एक नवीन शाब्दिक युध्द सुरु झाले आहे. एकीकडे कंगना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर रोजच नवनवीन टीका करत आहे तर दुसरीकडे बॉलीवूड मधील काही लोक तिलाच आरसा दाखवत आहेत. कंगणाचे विवादित विधान हे होते.

” शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली असून त्यांनी मला परत मुंबईत येऊ नये असं म्हटलं आहे. अगोदर मुंबईच्या रस्त्यांनी स्वातंत्र्याच्या घोषणा ऐकायला मिळत परंतु आता तर उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. हि मुंबई आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का दिसते?”

 

०२ ) कंगनाने पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणाऱ्या भारतीय कलाकारांना फटकारले होते.

 कंगना राणावत
कंगना राणावत

कंगना राणावत आपल्या ट्वीटच्या माध्यमातून नेहमी देशभक्तीच्या गोष्ठी करत असते, काही वेळेस तर कंगना फारच उघडपणे बोलून जाते. काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर एक विधान केले होते जे नंतर खूपच व्हायरल झाले होते. कंगणाचे ट्वीट –

“शबाना आझमी सारखेच लोक cultural exchange च्या गोष्ठी करतात. हे तेच लोकं आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्या लोकांचे समर्थन करतात. यांनी पाकिस्तानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन का केले हे मला समजत नाही. कारण एकीकडे उरी मध्ये झालेल्या आतंकवादी हल्यामुळे भारतात पाकिस्तानी कलाकारांना बॅन केले आहे. हि इंडस्ट्री देशद्रोहि लोकांनी भरलेली आहे हे लोक केवळ भारताच्या शत्रूंचे मनोबल वाढवतात.”

कंगनाच्या या विधानामुळे मोठा विवाद निर्माण झाला होता. यामुळे देशद्रोही कोण आहे आणि कोण नाही याचा निर्णय कोण घेणार याबद्दल अनेक डिबेट करण्यात आले होते.

०३ ) तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर ह्या बी ग्रेड अभिनेत्री आहेत.

कंगना राणावतने प्रत्येक वेळी बॉलीवूड मधील काही लोकांना विरोध केला आहे आणि कित्तेक वेळी त्यांना ट्रोलहि केले आहे. कधी ती नेपोटिज्म मुळे करण जोहरवर निशाना साधते तर कधी दुसऱ्या कलाकारांच्या मौन धारणेवर हल्ला चढवते. तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांच्या बाबतीतही असेच काही घडले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर नेपोटिज्मवर सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. या वेळी कंगना एका मुलाखती दरम्यान तापसी आणि स्वराला बी ग्रेड म्हटली होती. कंगणाचे हे विधान खूप व्हायरल झाले होते. यावर पलटवार करत तापसीने ट्वीट केले होते कि, ” असं वाटतंय कि ग्रेड सिस्टीम आता परत सुरु झाली आहे.”

०४ ) बॉलीवूड आणि ड्रग्स

 कंगना राणावत

ड्रग्सचा विवाद पण सुशांत सिंहच्या मृत्यू नंतरच सुरु झाला आहे आणि या विवादावर कंगनाने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तिने आपल्या ट्वीटमध्ये बॉलीवूड मध्ये ९९ टक्के लोक हे ड्रग वापरत असल्याचे म्हणले आहे. या लोकांची तपासणी केल्यास सगळेच जेलमध्ये जातील असे पण तिने म्हटले होते. कंगणाचे हेच विधान आता तिला बॉलीवूड मध्ये वाळीत टाकण्याचे काम करत आहे. सर्वजन तिला आता बॉलीवूड सोडून राजनीतीमध्ये उतरण्याचा सल्ला देत आहेत.

०५ ) बॉलीवूड मध्ये असलेले नेपोटिज्म

नेपोटिज्म हा कंगनाचा आवडीचा मुद्दा राहिलेला आहे. करण जोहरच्या शो मध्ये सुरु झालेला हा मुद्दा आजही ट्रेंडीगमध्ये आहे. कंगनाने अनेक कलाकारांवर नेपोटिज्मचा आरोप लावला आहे, तिने महेश भट्ट वर मारहान करण्याचा तसेच ‘स्टारकिड्स’ वर ‘आउटसाइडर्स’ ला जाणून बुजून परेशान करण्याचा आरोप लावला आहे. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तिच्या निशाण्यावर असते तेंव्हा मुद्दा नेपोटिज्म हाच असतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… या 3 गोष्टींसाठी तुम्ही “दिल बेचारा” पहायलाच हवा…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here