आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

 राम आणि रावणाची विविध रूपे…!

गोस्वामी तुलसीदास यांनी आपल्या अभिजात ग्रंथाची रचना करताना सुरुवातीलाच जाहीर केले होते कि, केवळ माझाच ग्रंथ हा योग्य आणि प्रामाणिक नाही, भगवान श्रीराम यांचे चरित्र हे शंभर कोटींपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ जितकी लोकं तितकि त्यांची आस्था आणि तितकेच श्रीराम यांचे रूपे.

राम

प्रत्येकाची रामाबद्दलची आणि रावनाबद्दलची धारणा हि वेगवेगळी असू शकते, त्यामुळे त्यांची धारणा चुकीची आहे हे म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्ही रावणाला कोणत्या दृष्ठीकोनाने बघता हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे.
श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम होते. मर्यादांचे पालन करण्यासाठी त्यांनी एक चक्रवर्ती राजाच्या सिंहासनाचा पण त्याग केला होता. भगवान श्रीराम यांचे जीवनचरित्र वर्णन करणे हे फार मोठे कार्य नाही कारण, श्रीराम हे आजही प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

 

आजचा आपला मुख्य विषय आहे लंकापती रावण. तोच रावण जो विश्रवा आणि कैकसी यांचा पुत्र होता आणि महर्षी पुलत्स्य यांचा पौत्र म्हणजेच नातू होता. रावण हा शक्तिशाली राजा होता त्याच्या साम्राज्यामध्ये दिग्गज, दिग्पाल, देव, असुर, किन्नर, नाग, ग्रह हे सर्वजन हात जोडून त्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तयार असत.

रावणाने आपल्या बहिणीवर अत्याचार झाला आहे असे समजून सूड घेण्यासाठी जगतजननी सीतेचे बलपूर्वक अपहरण केले होते. नारायण विष्णूचे अवतार असलेल्या रामचंद्रांनी युद्धामध्ये रावणाचा आणि त्याच्या संपूर्ण वंशाचा संहार करून समाजासाठी नवचेतना निर्माण केली आणि समाजासाठी नवीन आदर्श निर्माण केला जो युगानुयुगे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील.

एक दृष्टांत ज्याबद्दल काही लोकांना वाईट वाटू शकते:

राम

दक्षिण भारतातील महान ऋषी आणि कवी महर्षी कम्बन किंवा कम्ब यांनी आपल्या माहितीच्या आधारे एका रामचरित ग्रंथाची रचना केली होती, या रचनेचे नाव “इरामावतारम्” हे आहे. या रचनेमध्ये रोचक अंदाजामध्ये काही आक्षेपार्ह गोष्ठींचे वर्णन केलेले आहे. तसेच यामध्ये दशानन रावणाच्या विचित्र मागणीचे अद्भुत वर्णन केले आहे. हे वर्णन युक्तिवादाच्या आधारे अगदी खरे आहे याची आपल्याला खात्री पण होते. त्यांनी केलेले वर्णन हे खालीलप्रमाणे आहे…

“रावण हा विर आणि अहंकारी होता परंतु काही ठराविक वेळेसाठी तो मानवतावादी पण होता.

 

रावणाला जेंव्हा समजते कि, रामाने समुद्रावर सेतू बांधून त्याची सर्वात मोठी अडचण आता दूर केली आहे तेंव्हा रावण विचलित होऊन आपल्या दाही मुंडक्यांशी संवाद करतो. याचेच वर्णन गोस्वामी तुलसीदास त्यांच्या रामचरितमानस या ग्रंथामध्ये अशा प्रकारे करतात.

“बांध्‍यो बननिधि नीरनिधि जलधि सिंधु बारीस। सत्‍य तोयनिधि कंपति उदधि पयोधि नदीस।।”

रामाने सेतू बांधल्यानंतर रावण भविष्यात होणाऱ्या युद्धाची तयारी जोमाने करण्यास सुरु करतो. परंतु या काळातच आणखी एक घटना घडली जी रावणाच्या विचित्र जीवनाबद्दल वर्णन करते. रावणाच्या लंकेमध्ये महाबली ऋक्षराज जामवंत यांचे आगमन होते. (येथे जामवंत यांना महाबली म्हणायचा आशय हा निरर्थक नाहीये कारण, एक तर जामवंत हे आकार आणि शक्तीने कुंभकर्णा समान होते). त्यांच्या बलसामर्थ्याबद्दल बोलताना जामवंत वानरांना आपल्या युवा अवस्थेबद्दल सांगतात,

जरठ भयउँ अब कहइ रिछेसा। नहिं तन रहा प्रथम बल लेसा।। जबहिं त्रिबिक्रम भए खरारी। तब मैं तरुन रहेउँ बल भारी।।

बलि बाँधत प्रभु बाढेउ सो तनु बरनि न जाई। उभय धरी महँ दीन्ही सात प्रदच्छिन धाइ।।

भावार्थानुसार जामवंत म्हणतात : जेंव्हा मी माझ्या युवा अवस्थेत होतो तेंव्हा अतिशय बलवान होतो, आता वय वाढले असल्याने माझ्यामध्ये तेव्हढे सामर्थ्य राहिले नाहीये. भगवान नारायण यांनी राजा बळीच्या साम्राज्याला आपल्या तीन पावलांनी मोजण्यासाठी जेंव्हा वामन अवतार घेतला होता  तेंव्हा मी तरुण अवस्थेत होतो आणि भगवान वामन पूर्ण ब्रह्मांडाला आपल्या पावलांनी मोजत होते तेंव्हा मी एका क्षणातच त्यांच्या सात परिक्रमा पूर्ण केल्या होत्या.

हेच जामवंत युद्धाच्या पहिले लंकेमध्ये आले होते. सर्व लंकावाशीयांनी महाबली हनुमान यांचा पराक्रम अगोदरच पहिला होता याचा फायदा जामवंत यांना झाला, कारण लंकेच्या लोकांनी कशाला आपदा ओढावून द्यायची म्हणून रावणाच्या सभेकडे न थांबवता जाऊ दिले. जामवंत आरामात रावणाच्या सभेमध्ये पोहचले.

राम

जामवंत रावणाला आपला संदेश ऐकवण्याच्या पहिलेच रावणाने त्यांना आसन ग्रहण करण्यास विनंती केली. रावनाणे हनुमानाबरोबर केलेला दुर्व्यवहार हा जामवंत यांना माहित होता म्हणून त्यांनी आसन ग्रहण केले नाही. त्यावेळी रावणाने जामवंत यांना योग्य राजनीतिक उदाहरण दिले आणि त्यांना म्हटले कि, “तुम्ही माझ्या वडिलाचे म्हणजेच पुलस्त्य ऋषी यांचे मानस भाऊ आहात त्यामुळे आपणास आसन स्वीकारावे लागेल आणि तेंव्हाच मी त्या विषयावर चर्चा करेल ज्यासंबंधी तुम्ही येथे आला आहात.”

 

जामवंताने पण निवेदन कर्त्याच्या कर्तव्याला समजून आसन स्वीकार केले आणि रावणाला तो विषय सांगीतला ज्यासाठी ते आले होते, “हे दशानन, दशरथ नंदन श्रीराम यांनी समुद्रतटावर भगवान शिव यांची विधिवत पूजा अर्चना करण्याचा प्रण घेतला आहे. त्या कार्यासाठी त्यांना योग्य आचार्यांची आवशकता आहे आणि त्यांच्यानुसार आचार्य पण योग्य श्रेणीचा पाहिजे याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे. यावेळी याठिकाणी मला केवळ तुम्हीच योग्य कर्मकांडी आचार्य दिसतात यामुळे आपण या अचार्यात्वाचा स्वीकार करावा आणि शिव यांची पूजा सफल करावी”

रावणाने जामवंत यांना सरळ विचारले कि हि पूजा लंका विजयासाठी केली जात आहे का? त्यावर जामवंत यांनी सांगितले कि,होय हि पूजा लंका विजयासाठीच केली जात आहे, महादेव हे श्रीराम यांना अतिप्रिय आहेत त्यामुळे सेतू बांधण्यापूर्वी त्यांच्या पूजेचे आयोजन होत आहे आणि तुम्हाला त्यामध्ये आचार्य म्हणून सहभागी ह्वयाचे आहे.

राम

जामवंत यांचे एकूण रावण विचार करू लागला कि, जर राम हा सर्व गोष्ठींमध्ये पात्र ठरला तर मग मला साक्षात ईश्वराचे आचार्य होण्याचा सन्मान प्राप्त होईल. रावणाला हि गोष्ठ पण आठवली कि, महर्षी वशिष्ठ यांनी स्वतः एका शर्तेवर रघुकुलाचे कुलगुरू होण्याचे स्वीकार केले होते जेंव्हा ब्रह्माजींनी त्यांना आश्वासन दिले होते कि स्वतः नारायण याच कुळामध्ये जन्म घेणार आहेत. हे सर्व विचार करून रावणाने रामाचे आमंत्रण स्वीकार केले. त्यासोबतच त्याने जामवंत यांना पूजेच्या सर्व आवशक वस्तू जमा करण्यास सांगितले.

 

 

शिव अराधनेच्या दिवशी लंकाधिपती रावण पुष्पक विमानाने अगदि वेळेवर सागर पार पोहचला होता. याठिकाणी भाऊ बिभीषण आणि वानरराज सुग्रीव यांची उपेक्षा झाली तरीही श्रीराम आणि सर्व वानरांनी रावणाला आचार्याचा सन्मान देऊन त्याचे स्वागत केले. रावणाने अचार्यातत्व स्वीकार करून जेंव्हा रामाला “दीर्घायु भव:, लंका विजयी भव:” हा आशीर्वाद दिला तेंव्हा सर्वजन आश्चर्य चकित झाले होते आणि रावणाचे पुढील शब्द ऐकण्यास उत्सुक झाले होते.

रावणाने रामाला विचारले ” हे राम विवाहित व्यक्तीच्या धर्मानुसार कोणतेही धार्मिक कार्य करताना त्याची अर्धांगिनी सोबत असणे जरुरी असते. म्हणून तुमची धर्मपत्नी याठिकाणी उपस्थित असायला हवी” यावर रामाने अति विनम्र भावनेने विचारले कि आचार्य जर मी याचा प्रबंध नाही करू शकलो तर दुसरा काही पर्याय आहे का? यावर रावणाने वेदांचे उदाहरण देत समजावले कि हे एकाच परिस्थितीमध्ये होऊ शकते जेंव्हा पत्नी जिवंत नसेल अथवा ब्रह्मचर्य  स्वीकार केले असेल. राम हे करू शकत नव्हता म्हणून रावणाने आपल्याच पुष्पक विमानाने सीतेला पूजा पूर्ण होईपर्यंत वापस आणले होते.

राम

शेवटी शिवलिंग स्थापन करून पूजा विधिवत संपन्न झाली तेंव्हा रामाने दक्षिणेबद्दल विचारले तेंव्हा रावण त्यांना म्हणाला कि राम सोन्याच्या लंकेचे आधिपत्य असलेल्या रावणाला तुम्ही काय दक्षिणा देऊ शकता यावर रामाने वचन दिले कि जे काही पण रावण दक्षिणा म्हणून मागतील त्यांना दिले जाईल. रावणाने रामाकडे एकच इच्छा व्यक्त केली कि जेंव्हा त्याचे प्राण जात असतील तेंव्हा प्रभू श्रीराम त्याच्या समोर असावेत. असेच घडले रामाने रावणाचा वध केला व लक्ष्मणाला रावणाकडून राजनीती, वेद, तत्वज्ञान यांची शिक्षा घेण्यास सांगितले.

 

 

या प्रसंगांबद्दल आम्ही यासाठी सांगत नाहीत कि आम्हाला रावणाचे महिमामंडन किंवा गुणगान करायाचे आहे, परंतु आम्ही या कथेचा एक सकारात्मक पक्ष दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कि तुमच्यामध्ये योग्यता असेल आणि तुमच्यावर जबाबदारी पार पडण्याची वेळ आली तर ती तुम्ही प्रत्येक वेळी कशी पार पाडावी.

हे पण सत्य आहे कि रावण कितीही विद्वान आणि ज्ञानी असला तरीही, त्याने आपल्या दुष्कर्मांमुळे जीवन भर कमावलेल्या सद्गुणांचा नाश केला होता. रावण अहंकारी आणि पापी असला तरीही त्याच्यामध्ये असे काही गुण होते ज्यांच्याबद्दल स्वतः श्रीरामांनी उल्लेख केला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: बाबरीखाली राम मंदिर आहे असा शोध या मुस्लीम व्यक्तीने लावला होता. वाचा सविस्तर…!

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here