आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
सरस्वती नदीच्या अस्तित्वाची कहाणी…!
उत्तर प्रदेशातील देवी देवतांची नगरी म्हणून ओळखल्या जानारे ऐतिहासिक शहर अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे असे मानल्या जाते. त्रिवेणी म्हणजे तीन नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती, गंगा आणि यमुना ह्या दोन नद्या एकत्र होत असताना सर्वांना पाहायला मिळते परंतु सरस्वती नदीबद्दल बरेच संभ्रम आहेत.
काही लोकांच्या मते सरस्वती नदी हि अदृश्यपणे वाहत इथपर्यंत येऊन गंगा आणि यमुनेसोबत मिळते आणि त्रिवेणी संगम तयार होतो. तसेच काही लोकांच्या मते सरस्वती नदीचे काहीच अस्तित्वच नाहीये आणि हा केवळ एक पौराणिक गैरसमज आहे. आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया सरस्वती नदिबद्दलच्या काही रहस्यमय गोष्ठींबद्दल…
हा एक संशोधनाचा विषय आहे कि खरच सरस्वती हि नदि प्रयागराज येथे वाहत येते का? आणि जर वाहत नाही तर मग त्रिवेणी संगम का म्हणतात? प्राचीन हिंदू माण्यतेनुसार आणि धार्मिक ग्रंथांनुसार सरस्वती नदी हि अस्तित्वात होती आणि या नदीला सिंधू नदीसमानच पवित्र मानल्या जायचे. ऋग्वेदातही सरस्वती नदीचा उल्लेख आढळून येतो. महाभारतातही सरस्वती नदीचा उल्लेख आहे आणि तिला लुप्त झालेली नदी म्हटल्या गेले आहे.
ज्या ठिकाणी हि नदी विलुप्त झाली होती त्या ठिकाणाचा उल्लेख विनाशना किंवा उपमज्जना या नावाने करण्यात आला आहे.
महाभारत काळात या नदीला प्लक्षवती नदी, वेदस्मृति, वेदवती इत्यादी नावाने ओळखल्या जायचे. असेही म्हटल्या जाते कि याच नदीच्या किनाऱ्यावर ब्रह्मावर्त आणि कुरुक्षेत्र हि ऐतिहासिक ठिकाणे होती आज या ठिकाणी जलाशये आहेत.
महाभारतामध्ये असाही उल्लेख आहे कि बलरामाने द्वारका ते मथुरा पर्यंतची यात्रा याच नदीने केली होती. तसेच युद्धानंतर यादवांचे पार्थिव अवशेष सरस्वती नदीतच विसर्जित केले होते. याचा अर्थ त्यावेळी या नदीमध्ये एव्हढा जलप्रवाह होता कि तिच्या प्रवाहामध्ये यात्रा केली जाऊ शकत होती. ऋग्वेदात सरस्वती नदी हि यमुनेच्या पूर्वेला आणि सतलजच्या पश्चिमेला वाहत होती असे म्हटल्या गेले आहे. असाहि अंदाज वर्तवण्यात येतो कि, पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत बदल झाल्यामुळे सरस्वती नदी भूमिगत झाली होती.
४००० वर्षांपूर्वी विलुप्त झालेली सरस्वती नदीफ्रेंच-प्रोटो इतिहासकार माइकल डैनिनो यांनी सरस्वती नदीची उत्पती आणि लुप्त होण्यामागच्या कारणांवर खूप विस्तृत अभ्यास केला आहे. या इतिहासकाराच्या मते ऋग्वेदातील सातव्या मंडळाच्या अनुसार सरस्वती नदी हि एकेकाळी खूप मोठी नदी होती. हि नदी पर्वतांवरून वाहत खालच्या बाजूस येत होती.
डॅनिनो यांनी ‘द लॉस्ट रिव्हर’ या संशोधनात म्हटले आहे की त्यांना घागर या पावसाळी नदीबद्दल काही पुरावे सापडले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणाहून माहिती एकत्र केली आणि नदीच्या मुळ प्रवाहांबद्दल शोध लावला. ऋग्वेदातील भौगोलिक क्रमानुसार ही नदी यमुना आणि सतलज या नद्यांच्या दरम्यान होती आणि तीचा प्रवाह हा पूर्वेकडून पश्चिमेस वाहत होता.
नदीचा तळ हा हडप्पाकालीन जमिनी बरोबरचा होता, या नदीचे पात्र हे इ.स. पूर्व ४००० पासून कोरडे पडायला सुरुवात झाली होती. त्याच काळात मोठ्या प्रमाणात भौगोलिक बदल देखील झाले होते. २००० वर्षांपूर्वी झालेल्या या बदलांमुळे उत्तर-पश्चिम दिशेने वाहनाऱ्या नद्यांपैकी एक सरस्वती नदी हि विलुप्त झाली होती.

राजस्थानच्या एका अधिकाऱ्याने या नदीच्या परिसरातील विविध विहिरींच्या पाण्याची रासायनिक चाचणी घेतल्यानंतर असे आढळले की सर्व पाण्याचे रसायन एकसारखेच आहे. परंतु या नदीच्या जवळपासच्या प्रदेशाच्या काही फूट अंतरावर असलेल्या विहिरींच्या पाण्याचे रासायनिक विश्लेषण हे त्यापेक्षा अलग होते. केंद्रीय जल मंडळाच्या शास्त्रज्ञांना हरियाणा, पंजाब तसेच राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात सरस्वती नदी अस्तित्त्वात होती याचे ठोस पुरावे मिळाला आहे.
त्याच वेळी एकीकडे सरस्वती नदी हि विलुप्त झाली आणि दुसरीकडे दृषद्वती नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली (दृषद्वती नदी हि आज यमुना म्हणून ओळखल्या जाते) हा इतिहास ४००० वर्ष जुना आहे असे मानल्या जाते. भूकंप आल्यामुळे जमीन हि वर आली आणि यासोबतच सरस्वती नदीचे निम्मे पाणी हे यमुना नदीमध्ये वाहून गेले. यामुळेच यामुनेमध्ये सरस्वतीचा जलप्रवाह वाहत आहे असे मानल्या जाऊ लागले. याच कारणामुळे प्रयागराज येथील संगमाला त्रिवेणी संगम म्हणल्या जाऊ लागले.
हिंदू धर्मातील सर्वात जास्त तीर्थ क्षेत्रे हि नद्यांच्या काठावर वसलेले आहेत. त्यामध्ये पण तीन नद्यांचा संगम होणारे स्थान हे अधिक महत्वपूर्ण मानले जाते. ज्याप्रकारे ग्रहांमध्ये सूर्य आणि ताऱ्यांमध्ये चंद्रमा आहे तसेच तीर्थांमध्ये संगमाला प्रमुख मानले जाते. दर बारा वर्षांनी याठिकाणी कुंभमेळा पण आयोजित केला जातो. त्रिवेणी संगमावर भरणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये देश विदेशातून करोडो भाविक सहभागी होतात. कुंभमेळा हा जातिवाद, अस्पृशतः, सांप्रदायिकता यांच्या विरुध्द सहिष्णुतेचे जिवंत उदाहरण आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा: बाबरीखाली राम मंदिर आहे असा शोध या मुस्लीम व्यक्तीने लावला होता. वाचा सविस्तर…!