आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जगातील सर्वात छोटे साम्राज्य

इटलीच्या सर्दीनियाच्या किनाऱ्यापासून जवळ असलेल्या ओलबियाच्या समुद्रधुनीत एक तावोलाराचे साम्राज्य आहे. हे साम्राज्य एक छोट्याशा बेटावर असून या बेटाच्या एका बाजूला इटलीचा समुद्र किनारा असून दुसरीकडे निमुळता सागरी किनारा आहे. या साम्राज्यात फक्त ११ लोकांचे वास्तव्य असून येथील राजा या ११ लोकांवर शासन करतो. ग्यूसीपे बार्टीलोनी हा या साम्राज्याचा पहिला राजा असून त्या बेटावर त्याचा परिवाराचे गेल्या २०० वर्षांपासून शासन आहे.

साम्राज्य

१८०७ मध्ये बार्टीलोनी हा जिनिव्हिज प्रवासी, या बेटावर त्याचा जीव वाचवत येऊन पोहचला. त्याच्या सोबत त्याच्या दोन बायका आणि मुले होती. त्याच्यावर दोन लग्न केल्याचा गुन्हा सरकारने दाखल केल्यामुळे पळ काढण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता, त्याकाळी दोन लग्न केल्याची मोठी शिक्षा युरोपात दिली जात होती. त्याने त्या बेटावर आल्यावर स्वतःला त्या बेटाचा सम्राट घोषित केले. १८३६ मध्ये सार्दिनीयाचा राजा कार्लो अल्बर्टोने या बेटावर शिकार करताना बार्टीलोनीची मदत घेतली आणि त्याच्या साम्राज्याला मान्यता दिली. तेव्हापासून बार्टीलोनी यांचा परिवार या बेटावर वास्तव्यास आहे, आता या परिवाराने त्या बेटावर आता एक हॉटेल उभारले असून तिथे पर्यटक येत राहतात.

ज्यावेळी १८०७ मध्ये ग्यूसीपे बार्टीलोनी या बेटावर आला त्यावेळी त्याला या बेटावर एक वेगळ्या प्रकारच्या बकऱ्यांची प्रजाती आढळली, या बकऱ्यांचे दात विशिष्ट प्रकारचे समुद्री गवत खाऊन सोनेरी झाले होते, ग्यूसीपे ने ह्या बकऱ्यांची शिकार करून ते सार्दिनीयाच्या राजदरबारात सादर केले, ते बघून सार्दिनीयाचा राजा शिकारीसाठी तावोलारामध्ये आला आणि त्याने तिथे अनेक बकरे मारले, त्यावेळी ग्यूसीपेचा मुलगा पावलोने त्याची सेवा केली म्हणून राजाने त्याला त्या बेटाचा राजा घोषित केले.

साम्राज्य

पावलो बार्टीलोनीला जरी राजा घोषित करण्यात आले होते तरी सार्दिनीयाच्या प्रशासनाने त्याच्याकडून हा भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पावलोने त्यांना सर्दीनियाचा सम्राटानेच त्याला या भागाचा राजा घोषित केल्याची बतावणी केली, त्याने यासाठी सार्दिनीयाच्या राज्याची भेट घेतली, राज्याने त्याच्या साम्राज्याला मान्यता दिली आणि तो त्या भूभागाचा मालक बनला. जेव्हा तो पुन्हा बेटावर परतला त्यावेळी त्याने राजाने दिलेले शस्त्रास्त्र भिंतीवर टांगले आणि आपणच या भूभागाचे सम्राट आहोत अशा घोषणा देऊ लागला.

१९०० साली इंग्लंडची साम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाने जगभरातील राजे महाराजे यांचे चित्र जमवून त्याचे एक दालन उभारण्याची तयारी सुरू केली त्यावेळी जगभरातुन लंडनच्या राज दालनात आपली प्रतिमा असावी म्हणून असंख्य चित्र आणि फोटो पाठवण्यात आले, यापैकी एक फोटो हा पावलो बार्टीलोनीचा आणि त्याचा परिवाराचा होता, आजही बंकिंगहम पॅलेसमध्ये हा फोटो लावण्यात आला असून तावोलारा या जगातील सर्वात लहान साम्राज्याचा सत्ताधीश असा उल्लेख त्याठिकाणी करण्यात आला आहे.

साम्राज्य

१९३४ साली इटलीने बार्टीलोनीच्या साम्राज्याचे सार्वभौमत्व नष्ट करून त्याला आपल्या मुख्य भूमीचा भाग बनवले आणि पुढे १९६२ साली अमेरिका प्रणित नाटोचे लष्करी तळ या बेटाच्या आर्ध्या भागावर उभारण्यात आले आणि आर्ध्या भागावर निवासी वस्तीला मान्यता देण्यात आली, आता या बेटावरची फक्त ५० एकर जमीन बार्टीलोनीच्या वंशजांच्या ताब्यात आहे, तरी देखील ते स्वतःला स्वायत्त राजघराणे म्हणवून घेतात. सध्या तिथे एक आलिशान हॉटेल असून त्या भूभागाचा मालक असलेला राजा टॉनिनो त्या भागाचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. जर तो हे करण्यात यशस्वी झाला तर जगातील सर्वात छोटे साम्राज्य हा बिरुद तावोलारा अभिमानाने मिरवेल!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: मृत्यूचे बेट म्हणून ओळखल्या जातेय हे बेट..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here