आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

खरा संन्यास धर्म काय असतो हे स्वामी विवेकानंद यांना एका वैश्येने शिकवले होते..!


स्वामी विवेकानंद हे नाव माहिती नसेल असा व्यक्ती भारतात तसा दुर्मिळच ! आजही स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी जीवनकार्य भारतीयांसाठी आदर्श आहेत. स्वामी विवेकानंदानी विश्वभरात हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना योद्धा संन्यासी ही उपमा देण्यात आली होती.

आजही अनेक तरुणांचे स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान आहेत, त्यांच्या जयंतीला भारतात राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. ‘उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत संघर्ष करा जोवर यश प्राप्त होत नाही’ हा विवेकानंदानी दिलेला संदेश आजही तरुणांना स्फुरण चढवतो.

स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर संन्यासी धर्माचे कठोर पालन केले. त्यांनी संन्यासी म्हणूनच भारतातच नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यात कीर्ती मिळवली, असंख्य लोक त्यांचे अनुयायी झाले, अगदी अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली उद्योगपती जी डी रॉकफेलर हा स्वतः स्वामी विवेकानंदांचा अनुयायी बनला होता आणि त्यांच्या निर्देशानुसार त्याने आपल्या संपत्तीचा काही हिस्सा गरिबांना दान केला होता.

अशे हे स्वामी विवेकानंद ज्यांनी जगभरात लोकांच्या हृदयावर आपल्या विद्वत्तेमुळे विजय प्राप्त केला, एकदा एका वैश्येकडून पराभूत झाले होते! होय तुम्ही वाचताय ते खरं आहे, या विश्व विजेत्या संन्याश्याला एका वैश्येने पराभूत केले होते. त्याची कहाणी आपण जाणून घेऊ..

गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा स्वामी विवेकानंद जयपूर जवळच्या एका छोट्या राज्यात पाहुणे म्हणून राहत होते. जेव्हा स्वामीजी परत जायला निघाले तेव्हा तिथल्या राजाने त्यांच्यासाठी मोठ्या निरोप समारंभाचे आयोजन केले. या निरोप समारंभात गायनासाठी राजाने काशीहून एका प्रसिद्ध वैश्येला आमंत्रित केले होते.

जेव्हा स्वामी विवेकानंदाना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी राजाच्या समारोहात सहभागी होण्यास नकार दिला कारण त्यांच्या संन्यास धर्मात वैश्येच्या आसपास जाणे देखील त्यांनी वर्जित केले होते. त्यांनि आपल्या पुस्तकात एक आठवण लिहली होती ज्यात त्यांनी वैश्या वस्तीतून प्रवास टाळण्यासाठी १ मैल लांबचा रस्ता घेऊन जायचे, असा उल्लेख केला होता. एवढ्या व्रतस्थ संन्याशाला तेव्हा वैश्येचे गाणे ऐकावे लागेल, हे कदापि मान्य होणारे नव्हते.

 

स्वामी विवेकानंद

 

आपल्याला ज्या महान व्यक्तीसाठी गाणे गायला बोलावले त्या व्यक्तीला आपण वैश्या असल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्यास अडचण होते आहे हे समजल्यावर ती गायिका दुःखी झाली आणि तिने त्या दुःखात ‘प्रभुजी मेरे अवगुण चित न धरो..’ हे गीत गायला सुरुवात केली.

ह्या गीताचा भावार्थ असा होता की परिसाच्या स्पर्शाने लोहाराच्या घरच्या लोखंडाचे पण सोनं होते आणि देवाच्या घरच्या लोखंडाचे पण सोने होते, परीस कधी भेदभाव करत नाही, जर त्याने भेदभाव केला असता तर त्याचा गुणांची किंमत तरी काय राहिली असती?

स्वामी विवेकानंद

हे गीत ऐकताच विवेकानंदाना आत्मभान झाले आणि ते तडक आवाजाच्या दिशेने चालत त्या सभागृहात आले जिथे ती गायिका गाणे म्हणत होती. स्वामी विवेकानंद आपल्या आठवणीत लिहले आहे की जेव्हा ते त्या दालनात पोहचले आणि त्यांनि त्या वैश्येकडे पाहिले तेव्हा त्यांना त्यांची चूक उमगली, त्यांच्या मनात त्या वैश्ये विषयी कुठलीच भावना नव्हती.

त्यांना त्या दिवशी ते संपूर्ण संन्यासत्वाचा पाठ त्या वैश्येने दिला होता. जर व्यक्ती संपूर्ण संन्यासी असेल तर त्यांना कुठल्याही स्त्री विषयी कुठलीच भावना नसेल, हेच संन्यासत्वाचे मर्म आहे. विवेकानंदानी स्वतःला पूर्ण संन्यासी सिद्ध ही केले होते आणि त्यानंतर त्यांनी कधीच कुठल्याही मानवाचा विटाळ बाळगला नाही.

त्या घटनेनंतर विवेकानंद वैश्या वस्तीना देखील भेट देत होते, एकदा परदेश प्रवासा दरम्यान त्यांनी इजिप्तची राजधानी कैरो येथील वैश्या वस्तीतून प्रवास केला होता आणि त्या वैश्याना मातेची उपमा दिली होती. ज्यावेळी ते भारतात परतले तेव्हा त्यांनी बंगालच्या कुप्रसिद्ध सोनागाची ह्या वैश्या वस्तीला भेट दिली होती, त्यावेळी तिथल्या महिलांनी त्यांचे स्वागत केले होते व स्वामी विवेकानंदानी त्या महिलांचे पाय पडले होते.

जयपूरच्या त्या प्रसंगानंतर विवेकानंदाना संन्यासी जीवनाचा मर्म कळाला होता, यात त्या काशीच्या गायिका वैश्येने मोठे योगदान दिले होते. त्यानंतरच स्वामी विवेकानंदानी स्वतःला पूर्ण संन्यासी पुरुष म्हणून सिद्ध केले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : गुन्हेगारी जगतातील सर्वांत खतरनाक महिला किलर विषयी वाचा सविस्तर …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here