आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

उपवासाला आवडीने खाल्ला जाणारा शाबूदाणा खरचं शाकाहारी आहे का?


 

हिंदू धर्मात व्रत, उपवास यांना काही अधिकच महत्व दिले जाते. जसे कि आपल्या सर्वांनाच माहित आहे कि, आपल्या घरातील महिला व्रताच्या दिवशी निर्जला उपवास किंवा अल्पोपहार उपवास करतात. निर्जला उपवासात काहीही खाल्ले जात नाही.

परंतु सामान्यतः उपवासाला ठराविक खाद्य पदार्थ खाल्ले जातात जसे कि फळ, दुध इत्यादी. उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साबुदाणा हा सर्वत्र ओळखीचा आहे. साबुदाण्यापासून उपवासाला खाल्ले जाणारे अनेक पदार्थ बनवल्या जातात जसे कि साबुदाणा खिचडी, शाबूदाणा खीर, शाबूदाणा पापड.

शाबूदाणा

अनेकजण शाबुदाण्याला उपवासात खाल्ला जाणारा शुध्द खाद्यपदार्थ म्हणून ओळखतात. परंतु अनेक लोकांना याबद्दल माहिती नाहीये कि हा शाबूदाणा कशा प्रकारे बनवल्या जातो. चला साबूदाना कसा बनवल्या जातो याबद्दल थोडी माहिती घेऊया त्यानंतर तुम्ही स्वताच ठरवा कि, साबुदाण्याला शाकाहारी म्हणणे कितपत योग्य आहे?

तामिळनाडू राज्यातील सालेम येथून कोयंबटूरला जाताना आपल्याला शाबूदाणा उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या पाहायला मिळतात. या फॅक्टरीच्या जवळ जाताच एव्हढा दुर्गंध येतो कि नाक झाकून घ्यावे लागते. इथे गेल्यावरच  आपल्याला साबुदाण्याबद्दलची वास्तविकता पाहायला मिळते.

शाबूदाणा

आवडीने खाल्ला जाणारा शाबूदाणा हा नैसर्गिकरीत्या प्राप्त होत नाही तर सागो पाम नावाच्या वनस्पतीच्या मुळांपासून कृतीमरित्या बनवले जाते. सागो पाम हि वनस्पती मुख्यतः केरळमध्ये जास्त प्रमाणात मिळते. केरळ मध्ये याला कप्पा असेही म्हणतात. कंपनीचे मालक मोठ्या प्रमाणात सागो पामची मुळे खरेदी करतात आणि त्याचा लगदा काढून २५ ते ४० फुटांच्या खड्यांमध्ये नासण्यासाठी टाकल्या जातो. अनेक महिने हा लगदा त्या ठिकाणीच नासत राहतो.

हे खड्डे खुल्या जागी असतात त्यामुळे हजारो टन सडक्या लगद्यामध्ये अनेक किडे मरून पडतात. हे सर्व त्या कामगारांसाठी सामान्य गोष्ठ आहे. हे कामगार त्या खड्यांमध्ये सतत पाणी टाकत असतात त्यामुळे या सडक्या मिश्रणात पांढरे कीटक तयार होतात. हे सर्व काम पाच ते सहा महिने चालू असते. त्यानंतर या किडे पडलेल्या लगद्याला मशिनीच्या सहाय्याने लहान आकार देऊन त्यांना गुळगुळीत बनवले जाते.

 

ह्या सर्व प्रक्रिया केल्यावर लगद्यातून मिळणाऱ्या स्टार्चला उन्हामध्ये वाळवले जाते. त्यानंतर चाळनीच्या मदतीने साबुदाण्याला हवा तो आकार दिला जातो, नारळाच्या तेलामध्ये किंचित भाजले जाते आणि गरम वाऱ्याच्या सहायाने वाळवले जाते. ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शाबूदाण्याचा प्रत्येक दाना हा पांढरा शुभ्र आणि चमकदार दिसतो. आकार, चमक आणि रंग यांच्यानुसार अलग अलग करून हा शाबूदाणा आपल्या पर्यंत पोहचतो आणि तो आपण आवडीने खातो.

तुम्ही लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन साबुदाण्याला शाकाहारी समजू नये. कारण हि प्रोसेस कोणीही सांगत नाही परंतु आहे १०० टक्के खरी.

या गोष्ठीची माहिती मिळाल्यावर अनेक लोकांनी आता साबुदाणा खाणे बंद केले आहे. हे सर्व माहित झाल्यावर साबुदाणा खावावे कि नाही हा तुमचा निर्णय आहे.

शाबूदाणा

साबुदाण्याचे पदार्थ हे उपवसामध्ये वापरले जातात, परंतु साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया माहित झाल्यावर तुम्हाला हा प्रश्न जरूर पडला असेल कि, शाबूदाणा हा खरच फलाहारी आहे कि मांसाहारी? शाबूदाणा खाल्याने व्रत उपवास तर तुटत नाही ना?

सामान्यतः साबुदाणा हा पूर्णतः नैसर्गिक आणि वनस्पतिक आहे. कारण हा सागो पाम या झाडाच्या खोडापासून आणि मुळांपासून बनवल्या जातो. परंतु याची बनवण्याची प्रक्रिया जाणून घेतल्यास साबुदाणा हा मांसाहारी पण असू शकतो असे म्हणने चुकीचे नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला पकडणारा आयपीयस अधिकारी...!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here