आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

सोशल मिडियामुळे होणारे दुष्परिणाम वाचा सविस्तर…!

आजच्या वेळी असा व्यक्ती आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो, जो इंटरनेट किंवा मोबाईल-लॅपटॉपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत नाही. एक सर्वसामान्य व्यक्तीपण आज सोशल मिडीयावर दिवसभर सक्रीय असतो. अशा लोकांची सोशल मिडीयावरील मित्रांची संख्या बघितली तर डोके चक्रावते, ज्या माणसाला त्याच्या गल्लीतील लोकं बराबर ओळखत नाहीत त्याने इथे हजारो मित्र बनवून ठेवलेले असतात. (हे सर्व मित्र आभासी आणि वर्चुअल असतात हा भाग वेगळा आहे)

मित्र अभाशी असोत किंवा वास्तविक, मैत्री कोणाशीही का असेना परंतु आपल्या ओळखींचा आणि संबंधाचा व्याप्त वाढत आहे हे महत्वाचे आहे.

 सोशल मीडिया

या सर्व गोष्ठींचे श्रेय जाते ते या सोशल मिडीयालाच, यानेच अगदी सर्वसामान्य व्यक्तीलाही सोशलाइज केलेले आहे. यामुळे आपण केवळ आपल्या आजूबाजूच्या लोकांशीच नाही तर देश विदेशातील लोकांसोबत जोडले गेलो आहोत. परंतु यामुळे आपल्याला जास्त आनंदित होण्याची गरज नाही कारण या सोशल मिडियाचे काही दुष्परिणामही आहेत आज आपण याबद्दलच बोलणार आहोत..!

सोशल मिडीयामुळे ब्रेकअपचे वाढते प्रमाण:

सोशल मिडीयाने सामान्य व्यक्तीला सोशलाइज अवश्य केले आहे, परंतु यामुळे परिवारातील लोकांमध्ये आपापसात तणाव वाढत आहे. स्पष्टपणे सांगायचे म्हणजे सोशल मीडियामुळे कुटुंबाची तूटातुट होत आहे. एकीकडे आपण फेसबुक आणि व्हाटसएपच्या माध्यमाने नवनवीन मित्र शोधत आहोत तर दुसरीकडे यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रेकअप होत आहेत.

हा सोशल मिडीयाचाच प्रभाव आहे कि लोकं आता सिंगल स्टेटस कडे आकर्षित होत आहेत. सोशल मीडियामुळे पती पत्नीनि एक दुसऱ्यावर संशय करण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे विशेषतः त्या लोकांमध्ये जास्त घडते ज्यांचे घराबाहेर लोकांसोबत कामकाजाबद्दलचे संबंध आहेत.

मोबाईल चॅटिंगमुळे नात्यांमध्ये दुरावा येत आहे:

 सोशल मीडिया

एकीकडे मोबाईल चॅटिंगमुळे आपल्याला अनेक सोई सुविधा मिळाल्या आहेत, डेटिंगची एक आगळीवेगळी आणि उत्साहवर्धक अनुभूती मिळाली आहे, आणि दुसरीकडे या मोबाइल चॅटिंगमुळेच नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. जी चॅटिंग अनोळखी लोकांबरोबर नाते तयार करते तीच चॅटिंग आता वास्तवतः खरे असलेले नाते तोडत आहे.

घटस्पोटाचे वाढते प्रमाण:

आपण जर २०१८-१९ आणि २०१७-१८ या वर्षातील घटस्फोटाशी संबंधित डेटाकडे काळजीपूर्वक पाहिले आणि त्यांची कारणे वाचली तर आश्चर्यकारक कटूसत्य समोर येते ते म्हणजे, घटस्फोटाच्या जवळजवळ ४० टक्के प्रकरनाला सोशल मीडियाच कारणीभूत आहे.

 सोशल मीडिया

एका कौटुंबिक न्यायालयाने मागील ३ वर्षातील त्या सर्व प्रकरणांना एकत्र करून त्यावर एक अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये हे तथ्य समोर आले आहे कि, एसएमएस, फेसबुक, व्हाटसएप, ट्वीटर यांच्यामुळे घटस्पोट संबंधित प्रकरणाची ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रेम-विवाह पण आता पहिल्यापेक्षा खूप कमी वेळेतच असफल होत आहेत कारण यामध्ये सोशल मिडीयामुळे एकमेकावर असलेला विश्वास कमी वेळेतच तुटत आहे.

सामाजिकता संपत आहे:

सामान्यत: असे म्हटले जाते की सोशल मीडियाच्या वर्चस्वामुळे लोकांच्या सामाजिकतेचे नुकसान झाले आहे. जर संपूर्ण कुटुंबाला एखाद्या गोष्टीसाठी एकत्र जमवायचे असेल तर आज हे खूप कठीण काम बनले आहे. कारण लोक संपूर्ण जगाशी तर नेहमीच जोडलेले असतात, परंतु सोशल मीडियामुळे त्यांना एकत्र बसून बोलण्यास वेळ मिळत नाही. लोक आता एकमेकांशी पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात ‘हाय हॅलो’ करतात, परंतु समोरासमोर न भेटता केवळ सोशल मीडियावर क्लिक करूनच.

संबंध कमकुवत का होत आहेत:

 सोशल मीडिया

जो सोशल मिडिया संबंध मजबूत करण्यासाठी ओळखला जातो, तोच आता मजबूत असलेल्या संबंधांना अशा प्रकारे कमकुवत का बनवत आहे? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोशल मिडिया लोकांना आपल्यामध्ये या प्रकारे गुरफटून टाकत आहे कि लोकांना आपल्या प्रियजनांसोबत घालवण्यासाठी वेळच मिळत नाही.

वेगवान आणि प्रतिस्पर्धी जीवनशैलीत आपले काम काज आणि सामाजिक जीवन यांच्या दबावाखाली आपण सोशल मीडियामध्ये सतत इतके सक्रिय असतो की आपल्याकडे वास्तविक जीवनासाठी वेळ नसतो.हे सर्व दुष्परिणाम पाहूनच पाश्चात्य देशातील लोक ऑनलाइन जीवनशैलीची भीती बाळगू लागले आहेत आणि पुन्हा ऑफलाइन जीवनशैलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : भारतातून थेट लंडनला जाणाऱ्या बसबद्दल वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here