आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जगातील पहिला स्मार्टफोन, हि होती त्याची खास वैशिष्टे!

विज्ञानाच्या या युगात आज बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे हजारो स्मार्टफोन आहेत. एका पेक्षा एक एक सरस स्मार्टफोन काढून ते ग्राहकांपर्यंत पोहचवणे  हे सद्यघडीच्या मोबाइल कंपनीचे ध्येय आहेत. अश्यातच आपल्या प्रतीस्पर्ध्यापेक्षा नेहमी सरस राहण्यासाठी कंपन्या खूप मेहनत घेतात.

स्मार्टफोन वापरण्याची सुरवात फार जास्त जुनी नाहीये. आपल्या लहानपणी आपण फिचरफोन (बटन असलेला फोन)
हा पहिलाच असेल. त्यावेळी जवळपास सर्वाकडे हाच फोन होता. या काही काळामध्ये टच स्क्रीनफोन ग्राहकांच्या खूप पसंदिसं पडत आहेत.

स्मार्टफोन

सध्या स्मार्टफोन हा सर्वांसाठी काळाची गरज बनला आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? कि जगातील सर्वांत पहिला स्मार्टफोन कधी आला होता व कोणी बनवला होता? आज या लेखात जाणून घेऊया जगातील पहिल्या स्मार्टफोनविषयी…

आजच्या एकापेक्षा एक सरस अश्या स्मार्टफोनचा पाया हा १९९२ साली भरण्यात आला होता. जेव्हा आईबीएम ने एक वेगळा प्रयोग करून पहिला स्मार्टफोन जगासमोर आणला.

१९८३ मध्ये मोटोरोला कंपनीने सर्वांना आच्छर्यचकित करत पहिला मोबाइल फोन “डायनाटेक ८०००क्स” निर्माण केला होता. पर्सनल डिजिटल असिस्टंट समोर आल्यानंतर मोबाइल टेक्नॉलॉजी दिवस प्रती दिवस स्मार्ट होत गेली.

(हे पण अवश्य वाचा : नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्याला सोशल मिडिया कारणीभूत आहे का?)स्मार्टफोन

त्या वेळी AT&T टेक्नॉलॉजी जगभरातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठित कंपनी होती.

२४ नोव्हेंबर१९९२ मध्ये इंटरनेशनल बिजनेस मशीन कॉरपोरेशन (आईबीएम) ने अमेरिकेमध्ये जगभरातील पहिला स्मार्टफोन काढून इतिहास रचला होता. त्या स्मार्टफोनचे नाव होते “एंगलर”

१९९४ मध्ये आयबीएम ने पहला कमर्शियल फोन आणला.त्याचे नाव होते “साइमन पर्सनल कम्प्युनिकेटर हा जगातील पहिला कमर्शियल स्मार्टफोन होता.

1992 साली बनवलेला हा स्मार्टफोन आईबीएम आणि अमेरिकेतील फोन निर्मिती करणारी कंपनी बेलसेल्फ यांच्याकडून बनवण्यात आला होता. १९९४ साली हा स्मार्टफोन अंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध केला गेला होता. परंतु वजनाने जास्त असल्यामुळे हा फोन जास्त दिवस बाजारात तग धरू शकला नाही.

स्मार्टफोन

साइमन फोन करण्यासाठी तर उपयोगी यायचाच शिवाय फैक्स आणि इमेल पाठवण्याची आणि मिळवण्याची सुविधा सुद्धा यात दिली होती. त्याशिवाय यात कैलकुलेटर, नोटपैडआणि टच डिस्प्ले यांसारख्या सुविधा देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा हा स्मार्टफोन बाजारात जास्त काळ टिकू शकला नव्हता.

आईबीएम ने बनवलेल्या टचस्क्रीन स्मार्टफोनच्या डिझाईन आणि लुकबद्दल बोलायचं झालं तर हा फोन आजच्या स्मार्टफोन
पेक्षा एकदम वेगळा होता. या स्मार्टफोनचे वजन जवळपास ५०० किलोग्राम एवढे होते.आणि या फोनची लांबी २३ सेंटीमीटर होती.

जवळपास ५० हजार स्मार्टफोन विकल्यानंतर फेब्रुवारी १९९५ मध्ये याचे प्रोडक्शन बंद केले गेले होते.

स्मार्टफोन,

आजच्या युगात स्मार्टफोन माणसाच्या जीवनातील एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. कोणीही स्मार्टफोन शिवाय राहू शकत नाहीये.परंतु येत्या काळात कितीही एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन बाजारात आले तरी सुद्धा पहिला स्मार्टफोन बनवण्याचा मान हा आईबीएम लाच असेल.

आयरिश टाइम्स अनुसार या फोन ला साइमन नाव यामुळे देण्यात आले होते कि,हा फोन खूप साधारण होता. आणि हा त्या काळच्या गरजेनुसार  जवळपास सर्वच कामे करू शकत होता जे एका स्मार्टफोन कडून अपेक्षित होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला पकडणारा आयपीयस अधिकारी...!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here