आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा :फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अवैध्य दारू विक्रीसाठी अनेक लोकांनी  वेगवेगळे मार्ग आणि  युक्त्या वापरतांना आपण पहिले आहे परंतु आज  जे आम्ही  तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल. कोणी एवढा खटाटोप दारू विक्री करण्यसाठी करू शकतो.

टायटल वाचून तुम्हाला आच्छर्य वाटलेच असेल. परंतु हे सत्य आहे या गोष्टीमागची जेव्हा पोलिसांना सत्यता समजली तेव्हा ते सुद्धा चक्रावून गेले.

अवैध दारूविक्रीसाठी कोण, कशी आणि काय आयडिया वापरेल हे सांगणे सध्याच्या घडीला कठीणच होऊन बसलंय. असंच काहीस घडलंय  झाशी मध्ये. येथील एका हातपंपातून चक्क पाण्याऐवजी गावठी दारू वर येत आहे.

झाशीत पोलिसांना पाण्याऐवजी दारू येणारा हातपंप सापडला आहे. पोलीस आणो अधिकाऱ्यांना हा हातपंप आनी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टीची सत्यता समजण्यासाठी ड्रोन आणि जेसीबीची मदत घ्यावी लागली आहे.
हजारो लिटर गावठी दारूचा साठा पोलिसांना या कारवाईत सापडला आहे.

हातपंप

झाशीमध्ये देशी दारू बनवनाऱ्यानी दारूचा साठा जमिनीखाली पुरून त्याला हातपंपासी जोडले होते. आणि या हातपंपाचा उपयोग दारूचा पुरवठा करण्यासाठी केला जात होता. सर्रास हातपंप चालवल्यास पाण्याऐवजी दारू वर येत होती.

या हातपंपाच्या माध्यमातून अवैध्य दारूचा धंदा मागील अनेक दिवसांपासून चालवण्यात येत होता.

हातपंपा

जिल्हाधिकारी आंद्रा बामसी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसापासून या ठिकानी दारूचे अवैध्य धंदे सुरु होते. त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 1245 लिटर अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासन कोणत्याही परिस्थितीत अवैध्य दारू विक्री चालू देणार नाही. अवैध्य दारू विक्री ही सरकारसाठी डोकेदुखी होत चालली आहे. परंतु यापुढे कोणत्याही परिस्थितीत अश्या घटना होणार नाहीत याच्याकडे प्रशासन पूर्णपणे लक्ष देईल.

हातपंपा

दारूविक्रीसाठी वापरलेली ही आयडिया पाहून प्रशासनासोबत, पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. एकंदरीत दारू निघणाऱ्या या हातपंपाची चर्चा सगळीकडे जोराने सुरु झाली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here