आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कंगना ,संजय राऊत आणि राजकीय नाट्य…!

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील सुरु असलेल्या घराणेशाहीवर जोरदार टीका झाली.
यात मुख्यतः कंगना राणावत हिने आवाज उठवला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर सुरु झालेले हे प्रकरण आता थेट शिवसेना विरुद्ध कंगना राणावत असं झाले आहे.

पाहूया एकंदरीत या सगळ्या घडामोडीला राजकीय रुप कसे देण्यात आले ते.

काही दिवसापूर्वी कंगना ने मुंबईल पाक व्याप्त काश्मीर (POK) असं म्हंटल होत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या विरोधात आवाज उठवला होता. बघता बघता हा वाद एवढा वाढला की सध्या संपूर्ण देशभर याचीच चर्चा होत आहे.

संजय राऊत यांनी कंगनाला हिम्मत असेल तर मुंबईत येऊन दाखव, असं ठणकावले होते. कंगनाने त्याला उत्तर देत हिम्मत असेल तर थांबवून दाखवा, मी मुबंईत येतेय. असं ट्विट केलं होते.

कंगना आणि संजय राऊत यांचा हा वाद चालू असतानाच मुंबई महानगरपालिकेने कंगनाचे ऑफिस अनधिकृत बांधकाम आहे, असं सांगून तोडले. यावर संतप्त झालेल्या कंगनाने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच निशाण्यावर घेतले आहे.

उद्धव ठाकरे यांना उद्देशून कंगनाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला.

कंगना

महाराष्ट्रात या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय. काही जणांच्या मते कंगनाला शिवसेना जाणीवपूर्वक टार्गेट करते आहे. तर एकीकडे भाजपा शिवसेनेला टार्गेट करत आहे.

एकंदरीत संपूर्ण वातावरण पाहता या मागच्या राजकारणाचा अंदाज येत आहे. कंगना आणि संजय राऊत यांच्यातील या वाद भडकण्यामागे नक्कीच काहीतरी राजकारण शिजतंय एवढं नक्की.

कंगना हिने महाराष्ट्रात राष्ट्र्पती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. एक साधारण वाद एवढ्या विकोपाला जाईल असं वाटलं नव्हतं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व नाट्यावर म्हटले कि , हे जे काही होत आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे.

परंतु सर्वांना प्रश्न हा पडलाय कि बॉलीवूड मधील एक कलाकार ज्या अंदाजाने  महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांना निशाण्यावर घेत आहे, त्याच्या मागे आहे तरी नक्की काय?

शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला जवळून पहिल्यानंतर हे नक्कीच लक्षात येते कि कंगनाला बीजेपीचे खूप मोठ्या प्रमानात समर्थन आहे. जर असे नसले असते तर हे शक्यच नव्हते कि कंगना ज्या राज्यात कमावतेय त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकेरी भाषेत बोलेल.

कंगना

कंगना ने जे केले आहे त्यावर भलेही शिवसेना तिच्यावर वेयक्तिक  रित्या  काही न करेल परंतु मिडिया आणि सरकारी माध्यमातून शिवसेना कंगनाला कचाट्यात सापडण्यासाठी नक्की प्रयत्नशील असेल.

कंगणाचे ऑफिस तोडल्याची निंदा एका बाजूला भाजपा करतेय तर दुसऱ्या बाजूने कॉंग्रेस सुद्धा कंगणाचे समर्थन करताना दिसतेय. कॉंग्रेस नेता संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटले आहे कि,कंगणाचे ऑफिस अनधिकृत होते का ते तोडण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत?

बदल्याच्या राजकारणच आयुष्य फार छोटे असते, असं सुद्धा होऊ शकते कि, एक ऑफिस तोडण्याच्या मागे लागून शिवसेनेच्या पतनाला सुरवात होईल.

एकंदरीत पाहता हे राजकीय नाट्य किती दिवस चालेल आणि कोणाला यातून काय फायदा होईल ते सांगणे सध्यातरी अवघड आहे.परंतु एक गोष्ट नक्की कि,कंगना जर तिला मिळत असलेल्या  राजकीय पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेवर भारी पडली तर मात्र कंगनाचा या निम्मित्ताने राजकारणात एन्ट्रीचा मुहूर्त लागू शकेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here