आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सतीश मानेशिंदे सर्वात महागडे ‘सेलिब्रेटी लॉयर’…!

कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेले सतीश मानेशिंदे हे आज भारतातील एक ‘हाय प्रोफाईल क्रिमिनल लॉयर’ म्हणून ओळखल्या जातात. सतीश मानेशिंदे यांनी अनेक राजनेता, चित्रपट कलाकार आणि काही प्रसिध्द व्यक्तींसाठी खटले लढले आहेत. सतीश मानेशिंदे यांनी अनेक बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये वकिली केली आहे. यामुळे लोकं त्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे विचार मांडत असले तरीही सतीश मानेशिंदे हे आज एक सर्वात महागडे ‘सेलिब्रेटी लॉयर’ बनले आहेत.

सतीश मानेशिंदे यांनी त्यांची एलएलबीची पदवी हि ‘कर्नाटका युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथून मिळवली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वकिलीमध्ये करिअर बनवण्यासाठी १९८३ मध्ये मुंबईला आले. येथूनच त्यांचा सर्वात महागडे वकील बनण्याचा प्रवास सुरु झाला होता. त्यांनी प्रसिध्द वकील रामजेठ मलानी यांच्या सोबत जुनिअर लॉयर म्हणून तब्बल दहा वर्षांपर्यंत इंटर्नशिप केली होती.

रामजेठ मलानी हे त्याकाळी भारतातील सर्वात महागडे वकील होते त्यांची फीस २५ लाख पर अपिरेंस एव्हढी होती. रामजेठ मलानी यांनी देशातील मोठ मोठ्या नेत्यांचे प्रकरने न्यायालयात निकाली लावले होते. मलानी यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे हत्या प्रकरण, लालूप्रसाद यादव, बीएस येदयुराप्पा, जयललीथा, हर्षद मेहता स्टोक मार्केट घोटाळा, लालकृष्ण अडवाणी, आसाराम बापू यांसारखे अनेक बहुचर्चित प्रकरने हाताळली होती.

रामजेठ मलानी यांच्या सोबत काम करत राहिल्यामुळेच सतीश मानेशिंदे हे त्यांच्या कामामध्ये अधिकच एक्स्पर्ट झाले होते. यामुळे आता त्यांच्या ओळखी मोठमोठे नेते आणि व्यावासाहिक यांच्यासोबत होत होत्या. नंतर सतीश मानशिंदे यांनी मलानी यांना सोडून आपल्या स्वतंत्र केसेस हाताळन्यास सुरुवात केली होती.

सतीश मानेशिंदे

सतीश मानेशिंदे यांच्या जीवनात सर्वात मोठा बदल झाला तो बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेता संजय दत्त याची १९९३ मधील बॉम्बस्फोट केस त्यांना मिळाल्या नंतर. हे प्रकरण हाताळल्यामुळे त्यांचे करिअर हे यशाच्या शिखरावर पोहचले होते आणि ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. सर्वांनाच माहित आहे या प्रकरणामध्ये संजय दत्तला शिक्षा पण झाली होती. या केसनंतर सतीश मानेशिंदे यांना मोठमोठ्या सेलिब्रिटी कडून अटेंशन मिळू लागले. यानंतर त्यांनी अभिनेता सलमान खान याचीही केस हाताळली होती.

यासोबतच सतीश मानेशिंदे यांनी मोठमोठ्या राजानेत्यांची मोठमोठी प्रकरने हाताळली आहेत जशे कि, मुंबई पोलीस इन्स्पेक्टर दया नायक यांची केस, शोबन मेहता मॅच फिक्सिंग केस, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची पत्नी सुजाता निकलजे हिची केस, बिंदू दारा सिंग याची बेटिंग केस, एव्हढेच नाही तर त्यांनी राखी सावंतची सुसाईड अबेटमेंटची केस सुद्धा हाताळली होती.

सतीश मानशिंदे यांच्याबद्दल असेही म्हटले जाते कि त्यांची बोलण्याची शैली हि सर्वांपेक्षा वेगळी आहे त्यासोबतच ते ज्याप्रमाणे साक्ष आणि पुरावे न्यायाधीशासमोर मांडतात हे त्यांच्या सफलतेचे सर्वात मोठे कारण आहे. कोर्टात त्यांचा बोलण्याचा अॅटीट्युड हा त्यांना सर्वात युनिक बनवतो.

सतीश मानेशिंदे

गेल्या काही दिवसांपासून सतीश मानेशिंदे परत चर्चेमध्ये आले आहेत कारण, सुशांत सिंग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीने त्यांना आपला वकील म्हणून नेमले आहे. सतीश मानशिंदे हे सामान्यतः हाय प्रोफाईल केसच घेतात हे त्यांच्या आजपर्यंतच्या केसेस बघितल्यावर कळते आणि यामुळेच ते भारतातील सर्वात महागडे सेलिब्रेटी वकील आहेत.

दहा वर्ष पहिले मानेशिंदे हे १० लाख रुपये फीस पर हेअरिंग साठी घेत होते. आजच्या वेळी त्यांची फीस किती आहे हे कोणालाही माहित नाही परंतु काही लोकांच्या मते त्यांची आजची फीस हे २० ते २५ लाख पर हेअरिंग एव्हढी असू शकते. त्यांची आजची संपती हि ६०० ते ७०० कोटी रुपये एव्हढी आहे असेही म्हटले जाते.

लोकांच्या मनात सतीश मानशिंदे यांच्याबद्दल अलग अलग विचार आहेत, काही लोकांच्या मते त्यांनी अनेक चुकीच्या केसेस आणि चुकीच्या माणसांसाठी काम केले आहे यामुळेच आज ते प्रसिध्द आहेत, तर काहींच्या मते हि त्यांच्या व्यवसाह्याशी निगडीत गोष्ठ आहे आणि प्रत्येक वकिलाला प्रत्येक प्रकारचे केस हाताळावे लागतात. यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे हे अवश्य कळवा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here