ट्रेडिंग बातम्यासाठी आम्हाला फॉलो करा | फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

 

मराठा आरक्षण टिकवणारच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन..!

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय दिला. या निर्णयावर चर्चा करून पुढील रणनीती ठरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठव घेतली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणारच यासाठी न्यायालयात ठामपणे बाजू मांडणार असा निर्धार करण्यात आला असून कोर्टातील  पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ४ वाजता मराठा संघटनांचे प्रतिनिधी, वकील मंडळी ,अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करणार आहेत.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाबाबत आलेल्या आदेशानंतर पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. राज्याचे अधिवक्ता अशुतोष कुंभकोणी ,विधी व न्याय विभागाचे  प्रधान सचिव राजेश ;लड्डा, सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळउपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील,विजय, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आदी यावळी उपस्थित होते.

मराठा आरक्षण

मराठा समाजाने षडयंत्र हाणून पडावे – अशोक चव्हाण.

काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा सामाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.सोशल मिडीयावर प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. मराठा समाजाने  संतापून  कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केले जात आहे. समाजाने हे षडयंत्र ओळखण्याची आणि हाणून पाडण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here