ट्रेडिंग बातम्यासाठी आम्हाला फॉलो करा | फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

…आणि चीनने चक्क पाकिस्तानी लोकांच्या किडन्या चोरल्या, वाचा काय आहे प्रकरण…!


मागील काही दिवसांपासून चीन आणि पाकिस्तान यांची जवळीक चांगलीच वाढली आहे. चीन हा कोणत्याही राष्ट्राचा मित्र असू शकत नाही हे सर्वांनाच माहित असताना, चीनचे समर्थन करणे हि पाकिस्तानची मजबुरी आहे. कारण चीनने आपल्या धाकड कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तानला दाबून ठेवले आहे. पाकिस्तानला जवळचा मित्र मानणाऱ्या चीनचे कपटी  कारस्तान काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले आहे.

 

चीन पाकिस्तानी नागरिकांच्या अवयवांची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले आहे. चीनच्या बाजारामध्ये पाकिस्तानी लोकांच्या किडन्या आणि लिवर धडल्ल्याने विक्री होत आहेत. इमरान सरकारच्या कंगालीचा अंदाज यावरून लावता येतो कि, दोन वेळेसच्या जेवणासाठी त्यांनी अक्षरशः देशातील गाढवं आणि घोड्यांचा पण सौदा केला आहे. परंतु यावेळी जे काही घडले याची कोणीही कल्पना करू शकत नाही.

 

चीन
चीनच्या अवयव तस्करीच्या रॅकेटचे शिकार झालेले पाकिस्तानी नागरिक

चीनकडून पाकिस्तानची अशामोड…

 

चीन आपल्याला या तंगीमधून बाहेर काढेल अशी पाकिस्तानची अशा होती. परंतु ड्रगनने त्यांना यावेळी असा धोका दिला आहे कि, याची कल्पना पाकिस्तानी पंतप्रधान इमरान यांनी स्वप्नातही केली नसेल. मदत करण्याएवजी चीन आता पाकिस्तानी नागरिकांच्या किडन्या काढून घेण्यामध्ये व्यस्त आहे. तुम्हाला यावर विस्वास बसत नसेल परंतु हि बातमी अगदी खरी आहे.

चीन

पाकिस्तानी लोकांना प्रथम लालच दाखवून चीनला पाठवल्या जाते, आणि येथे त्यांची किडनी काढून घेण्यात येते, या गोष्टीचा खळबळजनक खुलासा नेमकाच झाला आहे. आजपर्यंत अनेक पाकिस्तानी या अवयव तस्करीच्या रॅकेट चे शिकार झाले आहेत. खासकरून पाकिस्तानमधील गरीब मजदूर लोकांची किडनी चीनला पोहोचताच काढून घेतली जात आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील अनेक परिवार या वेळी एकाच किडनीवर जगत आहेत. यापैकी काही लोकांना तर त्यांची किडनी कधी गायब झाली हे आजपर्यंत कळलेच नाहीये.

 

चीनमध्ये मोठ्याप्रमाणात लोक हि किडनी आणि लीवरच्या आजाराने त्रस्त आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने अशा रुग्णाची आणखीच वाढ झाली आहे. गंभीर आजारांनी जखडलेल्या या लोकांना किडनी किंवा लिवर ट्रान्सप्लांटची तातडीने गरज भासत आहे. चीन मध्ये सामान्यतः किडनी डोनर मिळने खूप कठीण आहे, जर एखादा मिळाला तर याची किंमतही खूप जास्त असते.

 

चीन
चीनच्या अवयव तस्करीच्या रॅकेटचे शिकार झालेले पाकिस्तानी नागरिक

 

चीनला पाठींबा देण्याचा दुष्परिणाम पाकिस्तानची गरीब जनता भोगतेय..!

 

अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये सक्रीय असलेले मानवी अवयवांचे तस्कर हे गरीब आणि मजबूर लोकांचा फायदा घेत त्यांना मदत करण्याच्या नावाखाली प्रथम आपल्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी त्यांना चीनला पाठवतात. चीनच्या बाजारपेठेत मानवी अवयवांची किंमत, किडनी-४ लाख, लिवर- ५ लाख, डोळे-२ लाख एव्हढी आहे असेही उघडकीस येत आहे.

 

लाहौर मध्ये अशाच एका अवयव तस्करी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे, हे तस्कर गरीब लोकांना अनेक प्रलोभन देऊन चीनला पाठवायचे आणि चीनमध्ये यांचेच साथी डॉक्टर या लोकांची किडनी काढून घ्यायचे. शेकडो पाकिस्तानी नागरिक या टोळीचा शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी तस्करांची एक आंतरराष्ट्रीय गँग सक्रीय होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एकीकडे चीन पाकिस्तानला आपला जिगरी मित्र म्हणतो आणि दुसरीकडे पाकिस्तानी लोकांच्या किडन्या पण चोरी करतो. आपल्या देशातील जनतेवर केल्या जाणाऱ्या अन्यायाबाबत “पाकिस्तानचे कंगाल वजीर-ए-आजम” चुपचाप मुग गिळून गप्प बसण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीत, हि पाकिस्तानसाठी लाजिरवाणी गोष्ठ आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : UC ब्राउझरवरील बंदिनंतर भारतीयांची पसंद ठरतंय हे ब्राउझर..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here