ट्रेडिंग बातम्यासाठी आम्हाला फॉलो करा | फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

एकनाथ खडसे यांचा फडणवीसांवर थेट हल्ला, नेमके काय आहे हे प्रकरण वाचा सविस्तर…!

 

भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी परत एकदा फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षानोसून मी पक्षाचे सर्व कामे जबाबदारीने पार पाडली आहेत, यामुळे जोपर्यंत मला पक्षाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. पक्षनिष्ठ असल्याने मी पक्षाबद्दल काहीही बोललेलो नाही,
परंतु देवेंद्र फडणविसांकडूनच मला त्रास झाला हे मी त्यांचे नाव घेऊन सांगतो असा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

 

एकनाथ खडसे

 

एकनाथराव खडसे यांच्या जीवनावर आधारित “जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खडसे फार्महाऊसवर ऑनलाईन संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खडसे यांनी उपस्थित असलेल्या पक्षातील या सर्व नेत्यांच्या असताना आपल्यावर पक्षाकडून अन्याय होत आहे याबद्दल नाराजी व्यक्त केली.

 

आपले मनोगत व्यक्त करताना खडसे म्हणाले, माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मी हा अन्याय सहन करणार तसेच स्वस्थही बसणार नाही. पक्षाती नेते जोपर्यंत मला न्याय देत नाहीत तोपर्यंत मी भांडतच राहणार आहे असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री असताना फडणवीस अंजली दमानिया यांना वेळ देऊन भेटत होते, परंतु मला भेटत नव्हते याचे माझ्याजवळ पुरावे आहे असा आरोपही त्यांनी फडणविसांवर केला.

 

“आमचे मुख्यमंत्री हे ड्रायक्लीनर होते, पक्षातील कोणत्याही नेत्यावर आरोप झाले कि ते लगेच क्लीनचीट द्यायचे. परंतु निर्दोष असतानाही मला क्लीनचीट मिळाली नाही” असा घनाघातही खडसेंनी केला.

 

एकनाथ खडसेचं काही तरी अडकलं असेल…

 

एकनाथ खडसे

 

माझ्याबद्दल काही लोक असेही म्हणतात कि, “खडसेचं काही तरी अडकलं असेल म्हणूनच ते अन्याय होऊनही पक्ष सोडत नाहीत” परंतु अस काहीही नाहीये पक्षनिष्ठेमुळेच मी पक्ष सोडत नाहीये असेही ते म्हणाले. माझा पक्षावर जीव जडला आहे म्हणून मी हे सर्व सहन करतोय, माझ्याजवळही भरपूर पर्याय आहेत. देवेंद्र फडणविसांकडून मला खूप त्रास सहन करावा लागला हे मी त्यांचे नाव घेऊन सांगतो असा टोला त्यांनी लगावला. विरोधक करणाऱ्यांमध्ये हिम्मत असते, हि हिम्मत माझ्यात तुम्हीच निर्माण केली आणि हि हिम्मतच माझी खरी शक्ती आहे” असे खडसे यांनी सांगितले.

 

भाऊसाहेब हिरे, रोहीदासदा, मधुकरराव चौधरी या उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची नावे हि मुख्यमंत्री पदासाठी पुढे आली होती परंतु त्यांना संपवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले आणि नेमके हेच माझ्यासोबतही घडले, असा दावा यावेळी खडसेंनी केला. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. परंतु खान्देशला मात्र अशी एकही संधी मिळाली नाही हे येथील जनतेचे दुर्भाग्याच असा खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : मराठा आरक्षणा विषयी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here