ट्रेडिंग बातम्यासाठी आम्हाला फॉलो करा | फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

चंद्रकांत पाटलाने महाविकास आघाडी सरकारवर केला हा मोठा आरोप..

महायुती सरकारच्या काळात मराठा आरक्षण जाहीर झाले होते. आम्ही योग्य पद्धतीने बाजू मांडून आरक्षण दिले होते परंतु सद्य सरकारने मराठा आरक्षणाला कोर्टात पाठपुराव केला नाही.

एका  बाजूला  कंगना आणि शिवसेना वाद सुरु असताना मराठा आरक्षणाचा  प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. सरकारने मराठा आरक्षणाची  बाजू निट न्यायालयात  मांडली नाही. सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत

कॉंग्रेस नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण  मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी आरक्षणास पाठपुरावा केला नाही, असी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मागासवर्गीय आयोगाने 27 पानांचा अहवाल दिला होता. या अहवाला आधारे उच्च न्यायालयाने आरक्षणाला मान्यता दिली. मात्र आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडू शकले नाहीत. वकील दिशाहीन होते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत

आम्ही सरकारला सांगत होतो कि जरा गांभीर्याने मराठा आरक्षणाकडे लक्ष द्या ,परंतु अशोक चव्हाण यांना ते जमले नाही असा आरोप त्यांनी केला.

मराठा समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाला यात सुट देण्यात यावी.
उच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकरी मध्ये मराठा समाजाचे आरक्षण महाराष्ट्र सरकारने २०१८ च्या कायद्याच्या अमलबजावणी थांबवली आहे. सोबतच उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे कि ज्या मराठा उमेदवारांना याचा फायदा यापूर्वी झाला आहे त्यांच्या स्थीतीत कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here