आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीय राज्यघटनेशी संबंधित असलेल्या ह्या गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहित असल्या पाहिजे, वाचा सविस्तर…!

भारत देश हा एक स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र आहे. भारताचे प्रशासन हे राज्यघटनेमध्ये असलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे चालवल्या जाते. परंतु आपणास माहिती आहे का? की हि सशक्त राज्यघटना बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च आला होता. याव्यतिरिक्त त्यासाठी बर्‍याच लोकांनी आपला अनमोल वेळ आणि कष्ट खर्च केले होते?

 

आपल्या देशात सर्वात पहिले स्थान हे भारतीय संविधान म्हणजेच राज्यघटनेचे आहे. सरकार, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, पंतप्रधान हे सर्वजन राज्यघटनेच्या मार्गदर्शनानेच आपली कामे करतात तसेच यापैकी कोणतेही पद हे राज्यघटनेपेक्षा मोठे नसते.

भारतीय राज्यघटने

 

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत, लिखित राज्यघटना आणि अलिखित राज्यघटना. भारतीय राज्यघटना हि जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेला “प्रेम बिहारी नारायण रायजादा” यांनी आपल्या हाताने इटैलिक स्टाईलने लिहिले आहे. राज्यघटनेच्या प्रत्येक पानांवर शांतीनिकेतनच्या “बेवहार राममनोहर सिन्हा” आणि “नंदलाल बोस” या दोन कलाकारांनी आपल्या हातांनी सजावट केली आहे.

 

९ डिसेंबर, १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक भरली. त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, टी. टी. कृष्णम्माचारी, बी. जी. खेर, राधाकृष्णन, कन्हैयालाल मुन्शी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. आर. जयकर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सर फिरोजखान, हंसा मेहता, सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख यांचा समावेश होता.

 

११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती समोर उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्यामध्ये अनेक समित्या निर्माण करण्यात आल्या. त्यात मसुदा समिती ही महत्त्वाची समिती म्हणून ओळखली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.

भारतीय राज्यघटने

 

२९ ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली. समितीचे काम १६५ दिवस चालले. त्यावर विचारविनिमय झाला. १३ फेब्रुवारी १९४८ रोजी घटना समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. त्यावेळी ७६३५ दुरूस्त्या करण्यास सांगितल्या. त्यापैकी २९७३ दुरूस्त्या मान्य करण्यात आल्या. घटनानिर्मितीसाठी ६.३ कोटी रू. इतका खर्च करण्यात आला होता

 

भारतीय राज्यघटनेवर घटना समितीच्या २८४ सदस्यांच्या सह्यापण आहेत, यामध्ये १५ महिलांचा समावेश आहे. २४ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होण्याच्या दोन दिवस पहिले संसदेमध्ये राज्यघटनेवर सह्या करत असताना पाऊस पडत होता काही लोक याला अतिशय शुभ मानत होते. हि सभा घटना समितीची अंतिम सभा होती आणि याच दिवशी डॉ. राजेन्द्रप्रसाद यांना प्रथम राष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते.

 

सर्वप्रथम राज्यघटनेत २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परीशिष्ठे होती. यामध्ये फेरबदल करून आज आपल्या राज्यघटनेत २५ भाग, ४४८ कलमे आणि १२ परीशिष्ठे आहेत. राज्यघटनेच्या हिंदी संस्करनामध्ये एकूण ११७३६९ शब्द आहेत, यांना लिहिण्यासाठी ३५४ फौंटन पेनच्या निब्सचा वापर करण्यात आला होता. राज्यघटनेला लिहिण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला होता. राज्यघटनेच्या मूळ हिंदी आणि इंग्रजी प्रती ह्या संसद भवनातील लायब्ररी मध्ये एका खास हिलीयम बॉक्स मध्ये सुरक्षित आहेत.

भारतीय राज्यघटने

 

डॉ. भीमराव आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री पण होते यांना भारतीय संविधानाचे जनक असेही म्हणल्या जाते.

भारतीय राज्यघटनेतील काही गोष्टी ह्या दुसऱ्या देशांच्या राज्यघटनेवर आधारित आहेत असे कि,

  • पंच वार्षिक योजनेचा विचार हा सोवियत संघाकडून घेण्यात आला आहे.
  • सामाजिक, आर्थिक अधिकारांचा विचार हा आयर्लंड कडून घेण्यात आला आहे.
  • व्यापार आणि कॉमर्सच्या तरतुदी ह्या ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवर आधारित आहेत.
  • भारतीय राज्यघटनेत असलेल्या आणीबाणी संबंधित तरतूदी ह्या जर्मनीकडून घेण्यात आल्या आहेत.
  • भारतामध्ये ज्या कायद्यान्वये सर्वोच्य न्यायालय काम करते, तो कायदा जपानच्या राज्यघटनेतून घेण्यात आला आहे.
  • भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये असलेले Liberty, Equality आणि Faternity हे शब्द फ्रांस क्रांतीकडून प्रेरित आहेत.
  • फेडरल सिस्टम, संघ आणि राज्य यांचे संबंध असेच संघ – राज्य यांच्यातील अधिकाराची वाटणी हि कॅनडाच्या राज्यघटनेकडून प्रेरित आहे.
  • भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना (prembale) हि अमेरिकेच्या राज्यघटनेकडून प्रेरित आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेची सुरुवात पण “Wee the People” नेच होते.

भारतीय राज्यघटने

भारतीय राज्यघटना ही भारताच्या नागरिकांना ६ मुख्य अधिकार देते, हे अधिकार पण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून प्रेरित आहेत.

 

०१   समानतेचा अधिकार
०२   स्वातंत्र्याचा अधिकार
०३   शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार
०४   धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
०५   संस्कृती आणि शिक्षणा संबंधित अधिकार
०६   घटनात्मक उपचारांचा अधिकार

 

भारतीय राज्यघटनेला जगातील सर्वोत्तम राज्यघटना मानली जाते कारण यामध्ये आजपर्यंत केवळ १०२ फेरबदल झाले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावानेनुसार भारत एक “संघीय. समाजवाद, धर्मनिरपेक्ष, आणि लोकतांत्रिक गणराज्य” आहे. “समाजवाद” हा शब्द १९७६ ला ४२ व्या फेरबदलामध्ये जोडला गेला आहे. भारतीय राज्यघटने प्रती जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर ला “संविधान दिवस” साजरा केला जातो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : सतीश मानेशिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील, आता रियाची केस लढणार.!

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here