ट्रेडिंग बातम्यासाठी आम्हाला फॉलो करा | फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

राजकीय हिंसाचार, लोकशाही वरील सर्वात मोठे संकट.!

राजकीय हिंसाचार आपल्या देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, हिंसाचार हा आधुनिक राजनीतीचा एक भागच बनला आहे असे म्हणणे काही चुकीचे नाही. आपल्या देशात जातीय दंगलींपेक्षा राजकीय संघर्षात जास्त लोक मारले जात आहेत. भारतीयांना लोकशाहीवर अभिमान असला तरीही हे सत्य आहे कि, आपल्या व्यवस्थेत बऱ्याच मूलभूत समस्या उद्भवत आहेत, ज्यांचा वेळेतच काही तोडगा काढणे आवश्यक आहे.

 

राजकीय

 

राजकीय फायद्यासाठी काहीपण …..

आता ते दिवस संपले आहेत, जेंव्हा नेता लोक आपल्या विरोधकांचा पण सन्मान करायचे. एकमेकांचे सल्ले पण घ्यायचे आणि आपापसात मैत्रिपूर्ण संबंध ठेवायचे. आजच्या वेळी असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. आज राजकारणात असहिष्णुता झपाट्याने वाढत आहे. कोणी कोणाचे ऐकण्यास तयार नाही, आक्रमकता हा आता राजकीय नेत्यांचा स्वभावच बनला आहे. राजकीय कार्यकर्ते आता अगदी छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे सुरू करतात, सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात आणि एकमेकाला मारण्या मरण्यापर्यंत पोहचतात.

 

आपल्या देशात एक अशीही वेळ होती जेंव्हा, लोकं देशसेवेसाठी आपले करिअर सोडून राजनीतीमध्ये येत असत. आज तर राजनीती हि स्वताच एक करिअर बनली आहे हे आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. कमी वेळेत जास्त कमाई करण्याचा व्यवसाय म्हणून राजनीतीकडे बघितले जात आहे. जनप्रतिनिधी बनतच एका सामान्य व्यक्तीच्या खाजगी संपतीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागते, यामुळेच राजनीती मध्ये येण्यासाठी आणि त्यामध्ये आपले वर्चस्व टिकवण्यासाठी एक स्पर्धाच सुरु झाली आहे.

 

 राजकीय

 

सत्ता आपल्या हातामध्ये यावी यासाठी एखादा व्यक्ती किंवा एखादा राजकीय पक्ष कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो (याचे ताजे उदाहरण आपण महाराष्ट्राच्या राजनीती मध्ये पाहू शकतो). सत्तेच्या मोहापायी विरोधकांचे मनोबल तोडण्यासाठी हिंसाचाराचा सहारा पण सर्रास घेतला जात आहे. (असाच काही प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे)

 

प्रत्येक राजकीय पक्ष हा वर-वर राजानितीमधील गुन्हेगारीकरणाचा विरोध करत असतो, परंतु आज प्रत्येक पक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक पाहायला मिळतात. एव्हढेच नाही तर काही वेळेस मोठ मोठे राजनेता पण बेजबाबदारपणे अशा प्रकारचे विधानं करतात ज्यामुळे सांप्रदायिक तणाव निर्माण होतो. अशा नेत्यांना केवळ आणि केवळ त्यांचा हेतू साधून घ्यायचा असतो.

 

आजच्या नेत्यांमध्ये इतका आत्मविश्वास राहिला नाही कि, ते समाजातील व्यापक प्रश्नांवर राजकारण करतील. समाजाला एक दुसऱ्याशी जोडण्याचे सकारात्मक राजकारण आता आपल्या व्यवस्थेत एक दुर्मिळ गोष्ट बनली आहे. विकासाविषयी बोलताना पण हेच राजनेता, जाती धर्मांचा सहारा घेतात.

 

आता तर विधिमंडळा पासून ते अगदी संसदेच्या कार्यकाळातही हिंसाचार सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक सुशिक्षित नेता पण सहभागी असतात. यावरून समजले जाऊ शकते कि त्यांच्या या वर्तवणुकीचा पक्षातील कार्यकर्त्यांवर काय परिणाम होत असेल?

 

 राजकीय

 

निवडणूक आयोगासारख्या संस्थांनी या दिशेने बरेच काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आता निवडणूकिदरम्यान होणारा हिंसाचार रोखला गेला, बूथ लुटल्याच्या घटना जवळजवळ संपल्या आहेत. परंतु निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्याच्या प्रयत्नांचे सर्वच राजकीय पक्षांनी अक्षरशः धिंडवडे काढले आहे. राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही तर निवडणूक आयोग आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकणार नाही. आपल्या राजकीय व्यवस्थेत व्यापक सुधारणांची आवश्यकता आहे. यासाठी आपल्या संपूर्ण समाजाला एकत्र होऊन पुढे यावे लागेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : चंद्रकांत पाटलाने महाविकास आघाडी सरकारवर केला हा मोठा आरोप..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here