आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जाणुन घेऊया भारतातील महान इंजिनिअर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल..

भारतामध्ये अभियांत्रिकी दिवस म्हणजेच इंजिनिअर्स डे हा महान इंजिनिअर,भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिना दिवशी साजरा करण्यात येतो.

सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी मैसूर रियासत म्हणजेच सध्याचे कर्नाटक राज्यात एका तमिळ कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वैकटलक्षम्मा होते. त्यांचे वडील हे एक संस्कृत विद्वान होते.
सर विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या चिक्काबल्लापुर या जन्मगावी झाले.

 मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

पुढील उच्चमाध्यमिक हे बंगलोरच्या सेंट्रल कॉलेज मध्ये झाले. सन १८८१ मध्ये तेथून ते बी.ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले.स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,पुणे’ येथे घेतले व ते सन १८८३ मध्ये ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बॉम्बे (आत्ताचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.त्यांची तेथील कामगिरी बघून त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.
सर एम.विश्वेश्वरय्या हे फक्त एक महान भारतीय सिव्हिल इंजिनिअर म्हणून ओळखले जात नाहीत तर ते सन १९१२ ते १९१९ या काळात म्हैसूरचे १९ वे दिवाण म्हणून ही ओळळले जातात.

 मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

म्हैसूर येथे असताना त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना ‘नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एंपायर’ या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.सन १९०३ मध्ये त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलित पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसित केली. त्यांनी कावेरी नदीवर निर्मित केलेले कृष्णराजसागर धरण हे आशियातील सर्वात मोठे सरोवर म्हणून निर्माण झाले.

सर एम.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय ‘इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स’ या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर ‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स’ च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले.
सन १९५५ मध्ये भारतातील सर्वोच्च असणारा ‘भारतरत्न’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  या मंदिराचे हे रहस्य ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here