आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

=== 

ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणारी महिला उद्योजक..


आत्मविश्वास खचूण आज अनके तरुण- तरुणी उद्योग क्षेत्रात येण्यासाठी घाबरतात. परंतु या सर्वांसाठी प्रेरणा असाव्या अश्या एक महिला उद्योजकाने आपल्यासमोर आलेल्या अनेक संकटाना आत्मविश्वासाने तोंड देत, खचून न जाता आपल्यासोबतच आपल्या गावातील अनेक महिलांना उद्योगाच्या माध्यमातून “आत्मनिर्भर” बनवले आहे.

स्वतःच्या कुटुंबाची धुरा सांभाळत असताना  येणाऱ्या संकटांना खंबीरपणे मात देत गावातील अन्य महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या ह्या महिला उद्योजक आहेत महाराष्ट्रातील तेल्हारा, (जिल्हा अकोला) येथील सौ. दीपिका देशमुख.

महिला उद्योजक

दीपिका देशमुख ह्या सूर्योदय महिला उद्योगच्या माध्यमातून स्वतः तर उद्योजक बनल्याच परंतु त्यानी गावातील इतर महिलांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे केले. सूर्योदय महिला उद्योज आज आपल्या उत्पादनाची सेवा संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देत आहेत.

लॉकडाऊन काळात उपलब्ध करून दिले मास्क..

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनकाळात मास्कची गरज ओळखून सूर्योदयच्या महिला उद्योजकांनी घरगुती मास्क बनवून लोकांसाठी उपलब्ध केले. लॉकडाऊन काळात संकटात संधी शोधत तसेच सामाजिक भावना जपत सूर्योदय गृहऊद्योगाच्या माध्यमातून सर्वांसाठी स्वस्त व स्वास्थदायक मास्कची निर्मिती करण्यास सुरवात केली.

या काळात त्यांनी जवळपास ५० हजाराहून जास्त मास्कची निर्मिती करून विक्री केली.या सर्वांचा फायदा परिसरातील जवळपास १२० महिलांना झाला.

 

सूर्योदय महिला गृहउद्योग..

महिला उद्योजक

दीपिका देशमुख यांनी २०१७ साली सूर्योदय या संस्थेची स्थापना केली. जवळपास ३०० महिलांना सोबत घेउन त्यांनी गृहउद्योगाच्या कामाला सुरवात केली. विविध खाद्यपदार्थांसह त्यांनी सूर्योदय डेकोरेशन, फुलांचे दागिने, सिल्क थ्रेड ज्वेलरी यांसारख्या अन्य वस्तूंची निर्मिती करण्यास सुरवात केली.

सुरवातीपासूनच सूर्योदय महिला बचत गटाच्या उत्पादनांना चांगल्या क्वालिटीमुळे मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळू लागला.
आणि बघता बघता या महिलांनी आपली ओळख सूर्योदय उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरवली.

 महिला उद्योजक दीपिका देशमुख यांची ओळख:

महिला उद्योजक

महाराष्ट्रातील तेल्हारा जिल्हा अकोला येथील श्री प्रकाशराव माधवराव देशमुख यांच्या पत्नी सौ दीपिका देशमुख ह्या आज एक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. पतीच्या दुर्धर आजारामुळे त्यांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाची जबाबदारी त्यांच्यावर आली.दीपिका देशमुख ह्या सुरवातीला घरातील जबादार व्यक्तीची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाची जबाबदारी पार पाडत होत्या.

सायकल दुरुस्तीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैस्यावर  त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.
मोकळ्या वेळेत त्यांनी बसल्या बसल्या लाह्या व बतासे यांचे दागिने बनवले . हेच दागिने एका व्यक्तीला आवडले आणि त्यांनी ते खरेदी केले. यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी अन्य महिलांसमोर अश्या काही वस्तूंची विक्री व निर्मिती एका बचत गटाच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव मांडला आणि येथूनच सूर्योदय उद्योगाची मुहुर्थमेढ रोवली गेली.

जेव्हा २०१७ साली त्यांनी सूर्योदय बचत गटाच्गी स्थापना केली तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मेहनतीने सूर्योदय बचत गटाचे उत्पादने निर्मिती करण्यास सुरवात केली. यात त्यांना गटात सोबत असलेल्या अन्य महिलांची सुद्धा चांगली साथ मिळाली.

महिला उद्योजक

मास्क बनवण्याच्या व्यवसायासोबतच दिपीका यांनी सर्वोदय मार्फत रेडीमेड पार्सल पाणी पूरी विकण्यास सुरुवात केली. आज सर्वोदय बचत गटाच्या पाणी पुऱ्या संपुर्ण अकोल्या जिल्ह्यात फेमस झाल्या आहेत.

आज सर्वोदय महिला बचत गट मसाले, पापड, कुरडया, मास्क, रेडीमेड पाणी पूरी, इंस्टंच इडली पीठ, इंस्टंट ढोकळा पीठ ही उत्पादनं बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.

सौ. दीपिका देशमुख यांच्या नेतृत्वात सूर्योदय गृह उद्योग आज अनेक ठिकाणी आपल्या उत्पादनांची सेवा देत आहे.
सोबतच महिलांचा रोजगाराचा प्रश्नसुद्धा यामुळे सुटला आहे.दीपिका देशमुख यांना त्यांच्या या कार्याबद्दल कर्मयोगी महिलारत्न पुरस्कार, तसेच अनेक पुरस्कार देऊन ठिकठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे.

उद्योजक सौ. देशमुख देतात महिलांसाठी एक खास संदेश..

आपल्या उद्योजक जगतात आलेल्या अनुभवानुसार सौ. देशमुख ह्या महिलांना एक खास संदेश नेहमी देत असतात.
त्या म्हणतात कि, दहापैकी नऊ लोक आपल्या चांगल्या कामाला विरोध करतील.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्या एकाने जरी
आपल्याला प्रेरित केले तरीसुद्धा आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या जिद्दी व घेत असलेल्या मेहनतीपुढे
देवसुद्धा आपल्याला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही.

एकंदरीत पाहता महिला शक्तीने ठरवल्यास मोठ्यात मोठ्या संकटाचा सामना करून त्या आपल्या आत्मशक्तीच्या जोरावर जिद्द आणि चिकाटीमुळे एक यशश्वी उद्योजक घडू शकतात, याची प्रचीती सौ. दीपिका देशमुख आणि त्यांच्या सहकारी  महिलांनी  दाखवून दिलीय..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  या मंदिराचे हे रहस्य ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here