आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

केस

सर्वच महिलांना आपले केस हे अतिशय प्रिय असतात. आपले केस नेहमी सुंदर व मजबूत राहावे, यासाठी त्या वेगवेगळे उपाय त्यावर करत असतात.

आपले केस हे नेहमी मजबूत आणि सुंदर असावे  हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. यासाठी त्या अनेक उपाय करत असतात. परंतु कधीकधी अन्य केमिकल युक्त गोष्टींचा वापर केल्यामुळे केसांचा रंग व त्याच्या  मजबूतपणावर परिणाम होताना दिसून येतो.

 

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्यामुले तुमचे केस हे न तुटता नेहमी काळेभोर आणि सुंदर होतील. चला तर मग जाणून घेऊया  याबद्दल.

 केस

केसांना लांब, दाट ,आणि सुंदर बनवण्यासाठी आपण नेहमी तेल, शांपू, मेहंदी, अंडी शिकाकाई महागतील महाग केसांसाठी बनवण्यात आलेले उत्पादने  आणखी काही काही करतो. परंतु या सर्वांमुळे केस फक्त बाहेरून दिसायला सुंदर बनतात. आतमधून त्यांची मुळे हि बऱ्याच वेळा कमजोर राहतात.

केस का तुटून पडतात?

साधारणतः महिलांमध्ये आयरन आणि काल्शियमची कमतरता असल्यास त्याचे केस तुटतात तर पुरुषांच्या केस गळन्यामागचे कारण हे सेक्स होर्मोन च्या असंतुलनामुळे होते.

केस पांढरे  होण्याचे खरे कारण..

केस

केसांचा रंग काळा हा आपल्या शरीरातील मेलानिन पिगमेंटमुळे होत असतो. हे पिगमेंट त्वचेच्या आतमध्ये केसांच्या मुळात असते. जेव्हा मेलानिनची  मात्रा शरीरात कमी होते तेव्हा आपल्या केसांचा रंग थोडासा भुरकट काळा बनतो आणि जेव्हा आपल्या शरीरातील मेलानिनची मात्रा संपूर्णपणे संपते, तेव्हा आपल्या केसाचा रंग हा पूर्णपने पांढरा पडतो.

थोडक्यात ज्याच्या शरीरात मेलानिनची मात्रा जास्त असते त्यांचे केस हे दाट व काळे असतात.शरीरातील कमी झालेली मेलानीनची मात्रा हि योग्य आहार व वेळेवर झोप घेऊन वाढवली जाऊ शकते.

रिबॉंडिंग चे नुकसान

 

रिबॉंडिंग अथवा केस स्ट्रेटनरचा उपयोग कधीही करू नका. याच्या वापरामुळे केस निर्जीव होतात. रिबॉंडिंगमुळे खराब झालेले केस मेडिकल उपचाराने सुद्धा ठीक होत नाहीत. नवीन केस आल्यानंतरच यामध्ये सुधारणा होऊ शकते.

केस

आरोग्यदायी केसांसाठी आपल्या आहारात प्रोटीन, विटामिन केल्शियम आणि आयरन घ्यावे. लवकर झोपण्याची व लवकर उठण्याची स्वतःला सवय लावून घ्या.

सकाळी नास्ता जरूर ण विसरता करायचा आणि भरपूर प्रमाणात पाणी पीत राहा.
हिरव्या पालेभाज्या खाण्याएवजी मुले आजकाल जंक फूड, फास्ट फूड खाण्यास जास्त पसंदी देतात परंतु या मळे मुलांचे पोट खराब होऊन साधारण आजार तसेच केस पांढरे होण्याची संभावना सुद्धा उद्भवते.

आपल्या  व आपल्या मुलांच्या निरोगी केसांसाठी स्वतः आणि त्यांना  जंक फूड खाण्यापासून थांबवा योग्य उपाय आणि नियमित केसांची निगा  राखल्यास ते लवकर पांढरे होणार नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here