आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लेखक – महेश दळवी  (Government college of Engineering, Aurangabad)

इंजिनिअर्सना समजून घेताना….

साधारण ,एक वर्षापूर्वी अभियंता दिनाच्या दिवशी एका मित्राने ‘बेरोजगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असा मजकूर त्यांच्या सोशल मीडिया वर टाकला.मला त्याच्या विचारसरणीने विचार करायला भाग पाडलं. खरंच आम्ही अभियंते ईतके कमी आहोत का ? तुम्ही ज्या सोशल मीडिया वरती हे वाचत आहात, तो एका सॉफ्टवेअर इंजीनियर ने बनवलेला आहे.

तुमच्या हातात असणारा मोबाईल तो अर्थात एका इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर ने बनवलेलाआहे. तुम्ही ज्या घरात बसून हे वाचत आहात, त्या घराच्या कॉलमच्या आत असणारे स्टील ,ते घर , हे एका सिव्हिल इंजिनियर ने डिझाईन केलेले आहे. तुमच्या डोक्यावर गरगर फिरणारा पंखा इलेक्ट्रिकल इंजिनिअरची कमाल आहे.

तुम्ही ज्या बाईकवर बसून जाता ती एका मेकॅनिकल इंजिनिअरने बनवलेली आहे आणि त्यात येणारे पेट्रोल आमच्या केमिकल इंजिनिअरने रीफाईन केलेले आहे. आता कदाचित तुम्ही म्हणाल घर तर गवंडी पण बांधतो, एखादा चांगला मेकॅनिक, गाडी कंपनी पेक्षा चांगली बनवतो.

इंजिनिअर्स

आमच्या शहरातला मोबाईल शॉपी वाला पण मोबाईल नीट करून देतो. मुलाला जन्म आई देते ते आपल्या मुलाला जगात येण्याअगोदर पासून नऊ महिने ओळखत असते. बाहेरच्या जगात आल्यावर वडील नातेवाईक मित्र सहकारी परिवार त्याला घडवत असतो पण आईलाच फक्त त्या मुलाच्या सर्व गोष्टी ठाऊक असतात. तसेच इंजिनियर आपल्या प्रोजेक्टला मुलासारखा जगतो आणि त्याला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो. बाकीचे राहिलेले लोक मग नातेवाईक मित्रमंडळी यामध्ये मोडतात.

महाराष्ट्रातील पाच मजली इमारत कोसळली , विमानामध्ये बिघाड होऊन विमान कोसळले, चालू गाडीला आग लागली, पेट्रोल-डिझेल लीक झाल्याने अनेक सागरी प्राणी मेले या बातम्या ऐकल्यावर अर्थात सगळ्यांना वाईट वाटते. अर्थात संबंधित इंजिनियर हे यामापेक्षा कमी नाहीत पण पडलेली बिल्डिंग तुम्ही कुठले इंजिनियर कडून बनवून घेतली ,विमानामध्ये व गाडीमध्ये बिघाड झाला आहे हे सांगणारी यंत्रणा अर्थात कमी दर्जाची असू शकते.

जहाझासाठी किंवा पाईपलाईन साठी वापरलेले स्टील टेस्ट करून वापरले होते का ?? असे अनेक प्रश्न आहेत. भातावरून शीताची परीक्षा कधीही करू नये. सर्व इंजिनिअर सारखे नसतात. वर्षापासून तुम्ही राहत असलेली बिल्डींग अजूनही ताठ मानेने उभी आहे. तुमच्या जन्मापासून असलेली गाडी आज तुम्ही अभिमानाने वापरत आहात हे त्या इंजिनिअरचेच यश आहे . आज जेव्हा नातेवाईक आम्हाला विचारतात की काय करत आहात तेव्हा इंजिनियर आहे असं म्हटलं तर नाक मुरडतात तेव्हा काटा टोचल्यासारखं वाटतं.

इंजिनिअर्स

आज सर्वात जास्त एम.बी.ए. होल्डर इंजिनिअर आहेत. प्रशासकीय सेवेच्या क्षेत्रात पण इंजिनीयर कमी नाहीत.ज्या इस्रो आणि पोखरण वर चित्रपट काढले गेले तेही प्रख्यात इंजिनिअर्सच मुळेच. भारत हा शेतीप्रधान देश आहे पण शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारे साधन आम्ही बनवतो. डॉक्टर तर देवच आहेत पण या देवांची शस्त्रे आम्ही बनवून देतो. आज व्हेंटिलेटर ची कमतरता भासू नये म्हणून आमचे बंधू-भगिनी कमीत कमी खर्चात उत्तम व्हेंटिलेटर बनवत आहेत.

तुमच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून सतत अखंडित इंटरनेट पुरवठा करणारे इंजिनियर आहेत.जगण्याचा संदेश देणारे ‘थ्री इडियट्स’ आणि ‘छिछोरे’ चित्रपट इंजीनियरिंग लाईफवरच आहेत.आम्ही इंजिनिअर आहोत ,आम्ही जॉब मिळवूपण शकतो आणि देऊ पण शकतो म्हणून या वर्षीचा अभियंता दिवस ” बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा “असं म्हणत साजरा करण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here