आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सोन्याने बनलेलं जगातील पहिलं हॉटेल..

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या महामारी सोबत लढत आहे तर काही देश आपल्या विकासाच्या दृष्टीने मोठी पावले उचलत आहेत. जगामध्ये अशी कित्येक हॉटेल्स आहेत जी त्यांच्या अजब गजब निर्मिती साठी प्रसिद्ध आहेत.

असंच काही आश्चर्यकारक घडलं आहे ‘व्हिएतनामची’ राजधानी हनोईमध्ये. एक असं हॉटेल बनलं आहे की, त्याच्या प्रत्येक गोष्टीं बनवत असताना सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. एवढेच नाही तर हॉटेलचे दरवाजे,खिडक्या ,फर्निचर ,वॉशरूम, टॉयलेट अशा प्रत्येक गोष्टी बनवत असताना सोन्याचा वापर केला गेला आहे.

हॉटेल

हॉटेलमधील जेवणाची भांडी सुद्धा सोन्याने बनलेली आहेत. हॉटेलचे फोटो पाहून तुम्ही एकदम दंग होऊन जाल आणि विचार कराल की इतका खर्च आणि इतकं महागडं हॉटेल खरंच खूप विलोभनीय आहे.

व्हिएतनामची राजधानी असलेल्या हनोई शहरातील या हॉटेलचे नाव आहे ‘डोल्से गोल्डन लेक हॉटेल’.

हॉटेलच्या निर्मितीमध्ये जवळपास एक टन सोन्याचा वापर करण्यात आलेला आहे. गोल्ड प्लेटेड हॉटेल २५ मजल्यांचे बनलेले असून यामध्ये एकूण ४०० खोल्या आहेत तर हॉटेलच्या बाहेरच्या भिंतीवर एकूण ५४०० स्क्वेअर फुट गोल्ड प्लेटेड टाइल्स लावल्या गेल्या आहेत. हॉटेल बनवत असताना प्रत्येक लहान बाबी लक्ष्यात घेऊन हॉटेल आकर्षक बनवण्याचा जबरदस्त यशस्वी प्रयोग केला आहे.

हॉटेल

हॉटेलची लॉबी २४ कॅरेट सोन्याने बनलेली आहे व यासाठी जवळपास २०० मिलियन डॉलर इतका खर्च आलेला आहे. याचबरोबर हॉटेलच्या टेरेस वरती ‘इन्फिनिटी’ नावाचा स्विमिंग पूल बनवला आहे ज्यातून हनोई शहराचा संपूर्ण नजारा दिसू शकेल. टेरेसच्या भिंतींना वापरण्यात आलेल्या विटा याही गोल्ड प्लेटेड आहेत.

हॉटेल निर्मितीची सुरुवात २००९ साली सुरू झाली होती.अस मानलं जातं की सोना हा धातू मानसिक तणाव कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतो आणि याच तत्वाचा वापर करून सोन्याच्या प्लेटिंगचा वापर करण्यात आला आहे.

हॉटेल

हॉटेलला ‘दक्षिण पूर्व आशियाचे सर्वात मोठे लक्झरिअस होटेल’ हा किताब देण्यात आलेला आहे .डोल्से हनोई गोल्डन हॉटेलमध्ये एका सिंगल रूम मध्ये एक रात्र राहण्यासाठी जवळपास २० हजार रुपये मोजावे लागतात आणि डबल बेडरूम असलेल्या रूम मध्ये राहण्यासाठी जवळपास ७५ हजार रुपये लागतात. प्रेसिडेन्शिअल सुईटची किंमत ४.८५ लाख रुपये एका रात्रीसाठी आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here