आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हे आहे जगातील सर्वात भयानक जंगल येथे जाणारा कोणीही जिवंत परत येत नाही…

आपल्या या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी अनेक प्रकारच्या अजब गजब रहस्याने भरलेली आहेत.अनेक लोकांनी अश्या ठिकाणी जाऊन आपला जीव गमावला आहे. रहस्यानेभरलेल्या काही ठिकाणांचा अजून शास्त्रज्ञांना सुद्धा ठावठिकाणा लागलेला नाही.

 जंगल

आज आम्ही तुम्हाला दुनियेतल्या अशा ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहे जी अनेक प्रकारच्या न उलगडलेल्या रहस्याने भरलेली आहे. हे ठिकाण रोमानीतील’ ट्रान्सल्वेनिया ‘या प्रांतात आहे. याठिकाणी अशा काही गोष्टी घडल्या आहेत की आजही लोक तिथे जायला घाबरतात. तर आज आम्ही तुम्हाला ट्रान्सल्वेनियातील भयानक जंगलाबद्द्ल बोलत आहोत ज्याचं नाव आहे ‘होया बस्यु’. याला जगातील सगळ्यात अतिभयानक जंगला पैकी एक मानले जाते.

या जंगलातील झाडांनी एक वेगळ्याच प्रकारचा अनाकलनीय आकार धारण केला आहे. हि झाडे दिवसाच्या प्रकाशातही अत्यंत विचित्र आणि भीतीदायक अशी दिसतात. जंगलातील जवळपास सर्व झाडे ही वाकड्यातिकड्या स्वरूपात वाढलेली आहेत ज्याला पाहून कोणीपण सहज घाबरेल.

जंगल

‘होया बस्यु’ जंगल जवळपास ७०० एकर अंतरावरती पसरलेले आहे. असं म्हटलं जातं की जंगलात जाणारे लोक एका अनाकलनीय पद्धतीने बेपत्ता होतात.आजपर्यंत शेकडोपेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत ज्यांचा कोणत्याही प्रकारचा मागमूस नाही. जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांचा असं म्हणणं आहे की अंधार पडल्यावर जंगलातून निरनिराळ्या प्रकारचे भयानक आवाज ऐकायला येतात.

होया बस्यु या जंगलात होणाऱ्या अजब गजब रहस्यमय आणि अतिभयानक घटनांमुळे या जंगलाला ” ट्रान्सल्वेनियाचे बरमुडा ट्रँगल”असं म्हटलं जातं.

जंगल
हे जंगल जगासमोर केव्हा आले जेव्हा एक मेंढपाळ त्याच्या दोनशे मेंढ्या सोबत बेपत्ता झाला. १८६८ मध्ये एमिल बरनिया नावाच्या एका व्यक्तीने या जंगलाच्या जवळपास आकाशात एक अलौकिक शरीर पहिल्याचा दावा केला होता. दंतकथेनुसार १८७० मध्ये एका शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये गायब झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गायब झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षाने ती परत आली व काहीच दिवसात तिचा मृत्यू झाला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here