आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
असा असेल कलियुगाचा अंत, जाणून घ्या…..
हिंदू शास्त्रामध्ये चार युगा बद्दल सविस्तर असं वर्णन सांगितलेलं आहे .याच्याबद्दल बहुतांश लोकांना माहीतच असेल.शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार एकूण चार युगे आहेत.सतयुग, त्रेतायुग ,द्वापारयुग, कलियुग अशी त्यांची नावे आहेत. सध्या आपण ज्या युगामध्ये आहोत ते कलियुग आहे .
याच्या आधी तीन युगे होऊन गेली आहेत. बऱ्याच जणांना युग म्हणजे काय याची कल्पना नसेल तर युग म्हणजे ठरलेल्या काही वर्षांचा निर्धारित असा काळ.शास्त्रमध्ये कलियुगाबद्दल असं सांगण्यात आले आहे की या युगाचा काळा हा सर्वाधिक कमी असेल.
चला तर जाणून घेऊया याच्याशी निगडीत काही गोष्टी. वेगवेगळ्या देवतांचा जन्म हा वेगवेगळ्या युगांमध्ये झाला असं सांगण्यात आले आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगामध्ये तर श्रीकृष्णांचा जन्म हा द्वापारयुगात झाला.

कलियुगामध्ये अधर्म पसरायला सुरुवात झाली आहे माणसांनी एकमेकावर विश्वास ठेवायचा बंद केले आहे त्यांचा स्वतावर विश्वास राहिलेला नाही तर ते वेद आणि शास्त्र यावर कसा विश्वास ठेवतील. इथं आपलीच लोकं कपट नीतीने आपल्यावर वार करत आहेत. शास्त्रामध्ये अत्यंत बारीकीने याबद्दल लिहिलेले आहे.
पुराणानुसार अशी वेळ येईल जेव्हा मनुष्यांचे जीवन काळ खूप अल्प असेल. तारुण्यावस्था वेळेच्या आधी समाप्त होईल. येणाऱ्या काही काळामध्ये मनुष्याचे आयुष्य २० वर्षे इतके असू शकते.
शास्त्रामध्ये सत युगाचा काळ हा १७२८००० वर्ष इतका तर त्रेता युगाचा १२९६००० वर्षआणि द्वापार युगाचा ८६४०००वर्ष इतका असं सांगितले आहे. द्वापार युगाचा काळ हा त्रेतायुग पेक्षा ४ लाखाने कमी आहे. कलियुगाचा काळा हा द्वापाऱ्युगापेक्षा निम्मा असून तो ४३२००० वर्ष इतका आहे. सत युगापासून सर्व युगांचा काळा हा कमी कमी होत गेला आहे.
शास्त्रानुसार कलियुगामध्ये पाप आपल्या सर्वोच्च स्थानी असेल. जेव्हा हळूहळू माणसाचा व्यवहार सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध होत जाईल आणि मनुष्य एका वेळेला हिंसा करण्यामध्ये प्राण्यांपेक्षा पुढे निघून जाईल. प्राणी आपले भूक मिटवण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला मारतात मात्र माणूस कोणतेही कारण नसताना दुसऱ्या माणसाला मारायला लागेल.
देवांशी खरी श्रद्धा असणारे साधूंना भिकारी म्हटले जाईल व अपमानित होतील त्याविरुद्ध ढोंगी साधू सिंहासनावर बसलेले असतील. लोकांमध्ये एकमेकांच्या प्रति हिंसाचार वाढलेला असेल. महिलांचा स्वभावही बदलेला असेल. फक्त धनवान लोकांच्या सोबत महिला असतील.
माणसांचा स्वभाव गाढवासारखा होईल. प्रत्येक घरांमध्ये भांडण असेल कोणी सुद्धा एकमेकांमध्ये मिसळून राहणार नाही .कोणी एकमेकास खरे बोलणार नाही आणि सगळीकडे असत्याचा विजय असेल. कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन अन्याय आणि हिंसाचाराच्या साम्राज्याचा अंत करतील पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा: हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स