आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
ही होती भगवान विष्णू यांच्या दहा अवतारामागील कारणे….
या सृष्टी मध्ये त्रिदेव म्हणजेच तिन देवतांचा वास आहे . ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टीचे निर्माण केलं, महादेव जेकी संहारक आहेत आणि भगवान विष्णू. या तीन देवतांवर सृष्टिचक्र कायम आहे.
ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात ,विष्णू पृथ्वीचा अंत होईपर्यंत तिचे संरक्षण आणि शिवजी विनाश करता.
आज आपण जाणून घेणार आहोत की सृष्टीचे पालन हार भगवान विष्णू यांनी घेतलेल्या त्यांच्या दहा अवतारांबद्दल.
जेव्हा मानव प्रजाती आपल्या कर्मा पासून भटकून जेव्हा अधर्माच्या दिशेने वाटचाल करू लागेल तेव्हा भगवान विष्णू या धरतीवर अवतार घेतील.. श्रीमदभागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी या गोष्टीच वर्णन केले आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्!
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
म्हणजेच भगवान विष्णू म्हणतात,”जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माची हानी होऊन अधर्माचा फैलाव होईल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी मी वेगवेगळ्या युगामध्ये अवतार घेईन.”
धर्मग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार भगवान विष्णूंचे दहा अवतार आहेत.पहिले तीन सत्य युगामध्ये, चार त्रेतायुगामध्ये व दोन द्वापार युगामध्ये आणि अंतिम दोन सध्याच्या युगामध्ये म्हणजेच कलियुगामध्ये. भगवान विष्णू यांचा पहिला अवतार होता मत्स्य अवतार. ज्यामध्ये त्यांनी मनुष्य आणि सप्तऋषि यांना वाचवले.
कूर्म अवतार हा विष्णूचा दुसरा कासवाच्या रूपातील अवतार .हा अवतार प्राणी आणि मनुष्य यांचा मिळून बनलेला होता.
सृष्टीला वाचण्यासाठी तिसरा अवतार हा वराह म्हणजे डुकराच्या रूपातील अवतार.असुर हिरण्यकेशी ने पृथ्वी ला समुद्रात नेऊन लपवले होते.त्यांनी पृथ्वी ला समुद्रातुन शोधून तिच्या मूळ स्थितीत ठेवले.
नरसिम्हा हा भगवान विष्णूचा चौथा अवतार त्यांनी भक्त प्रल्हादासाठी घेतला.
राक्षस हिरण्यकश्यपला असे वरदान होते की त्याला कोणताही प्राणी, मनुष्य किंवा पक्षी याकडून मरण प्राप्त होणार नाही. त्याच्या राज्यामध्ये कोणीही जर भगवान विष्णूची आराधना करत असेल तर तो त्याला ठार मारत असे. नरसिंह अवतार यामध्ये विष्णूने सिंहाचे तोंड असणारे मानवी शरीर यामध्ये प्रकट झाले व त्यांनी राक्षस हिरण्यकश्यपला मांडीवर घेऊन पंजाने त्यांचे पोट फोडून त्याचा वध केला.
वामन हा भगवान विष्णूचा पाचवा अवतार. त्रेतायुगातील हा त्यांचा पहिला होता. भगवान विष्णूंचा हा पहिला अवतार होता जो की संपूर्ण मानवी शरीरामध्ये होता.
दहा अवतारांपैकी त्यांचा सहावा अवतार परशुराम हा होता. असं म्हटलं जात आहे की त्यांनी खूप वेळा क्षत्रियांचा नाश केला होता.
मर्यादापुरुषोत्तम रूपातील श्री राम अवतार हा त्यांचा सातवा अवतार . राम हे अयोध्येचे राजा दशरथ व त्यांची पहिली राणी कौशल्या यांचे पुत्र होते. यामध्ये त्यांनी रावणाचा वध केला .
सोळा कला अवगत असलेला पूर्ण अवतार म्हणजेच श्रीकृष्ण अवतार हा भगवान विष्णूचा आठवा अवतार .भागवत ग्रंथामध्ये कृष्णाच्या लीला बद्दल लिहिलेले आहे. गोपाळ,गोविंद, देवकीनंदन, मक्खन चोर अशी अनेक नावे त्यांची आहे. ते मथुरेमध्ये देवकी व वासुदेव यांचे पुत्र होते श्रीकृष्णांची महाभारतामध्ये खूप मोठी भूमिका होती. या युद्धामध्ये ते अर्जुनाचे सारथी होते.
दहाव्या अवतारांपैकी एक म्हणजेच बुद्ध अवतार. क्षमा शील व शांती या रोपातील हा त्यांचा अवतार होता .त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली .बौद्ध धर्म जगाच्या चार मोठ्या धर्मापैकी एक मानला जातो.
विष्णुचा दहावा अवतार त्याचं नाव आहे कल्की अवतार. असं म्हटलं जात आहे की हा भगवान विष्णूचा शेवटचा अवतार आहे . कल्की हे दुष्टांचा नाश करण्यासाठी कलियुगाच्या अंतावेळी प्रकट होतील. पृथ्वीवरून पाप आणि अधर्म यांचा विनाश होईल एका नवीन युगाची सुरुवात होईल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा: हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स