आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ह्या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…


श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या ह्या5 गोष्टी मनुष्यजीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्याच 5 गोष्टी मानव जातीच्या भविष्य ठरवू शकतात. या सांगितलेल्या गोष्टीवर आपण किती आणि कसे आचरण करतो यावर ते अवलंबून आहे.

गीता ज्ञानासोबतच मानव जातिसाठी नेहमी मार्गदर्शक बनलेली आहे. श्रीकृष्णाने गीतेमधून मनुष्याला वेळोवेळी मार्गदर्शक गोष्टी सांगितलेल्या आहेत.

आजच्या या लेखामध्ये आम्ही भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 5 अश्या अनमोल गोष्टींबाब तुम्हाला सांगणार आहोत, ज्यावर आचरण करून तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या संकटावर मात करून यशस्वी व्हाल.

1) कोणीही परिपूर्ण नाहीये.

गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जगभरातील कोणीही परिपूर्ण नाहीये. जसे कोणी जास्त ओझे उचलू शकत नाही तर कोणी लांब पळू शकत नाही. कोणताही व्यक्ती सर्व गोष्टीने परिपूर्ण असा नसतो.  काही गोष्टीत निर्बल असणे हे काहींना जन्मताच असते तर काही व्यक्तींना काही घटनांमधून अश्या गोष्टींना सामोरी जावे लागते.

परंतु काही लोक आपल्या निर्बलतेचा योग्य ठिकाणी उपयोग करून त्यावर मात करतात. साहजिकच आपल्यात असलेली कोणत्याही गोष्टीची कमतरता ही ईश्वराची देण असते. यामुळे  खचून न जाता तिचा योग्य वापर करून तुम्ही त्यावर मात केली पाहिजेत.

(हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!)

2)कोणतेही ज्ञान कसे प्राप्त करायचे?

ज्ञान प्राप्ती नेहमी समर्पणाने होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु समर्पणाचे खरे महत्व काय आहे याचा कधी विचार केलाय आपण? माणसाचे मन ज्ञान प्राप्त करण्यात अनेक अडचणी निर्माण करत असते. कधी कोणत्या विद्यार्थ्यांबाबत इर्ष्या निर्माण होते तर कधी शिकवलेल्या गोष्टी आठवणीत राहत नाहीत. अनेक कारणामुळे बऱ्याच जणांना ज्ञानप्राप्त करण्यात अडचण निर्माण होते.

श्रीकृष्ण

तर कधी गुरूने दिलेली शिक्षा मनात अहंकार निर्माण करते. आणि मनुष्य वेगळे विचत्र करण्याचा मनस्तिथीत असतो,आणि ज्ञान प्राप्ती पासून दूर जातो. समर्पण मनुष्याच्या अहंकारला दूर करून स्वभाव शांतआणि संयमी राहण्यास शिकवतो. खरे पाहता जगात ना ज्ञानाची कमी आहे ना ज्ञान देणाऱ्याची. गुरु दत्तात्रयांनी तर श्वानापासून ज्ञान प्राप्त केले होते.

अर्थात ज्ञान कोणतेही असो मग ते ब्रह्मज्ञान असो अथवा कोणत्या गुरुकुलातील ज्ञान ते प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरुप्रति श्रद्धा आणि समर्पण असने गरजेचे असते.

3) धर्म संकटाला ओळखा.

प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण एकदा तरी येतोच जेव्हा सर्व स्वप्न, सर्व आशा, आकांशा संपतात. जीवनाच्या सर्व योजना निकामी होतात. अशा वेळी एका बाजूला धर्म आणि दुसऱ्या बाजूला दुःख असते. यालाच धर्मसंकट असं म्हणतात.

जेव्हा धर्माचे वाहन संकट असले आणि धर्माचे त्याग हेच दुःख असले तर विचार करा . कधी कोणत्या सज्जन व्यक्तीसमोर सत्य बोलावे लागते तर कधी विपरीत परिस्थितीमध्ये मार्ग मिळतो. अनेक लोक अश्या क्षणांना ओळखू शकत नाहीत
खरे पाहता धर्म संकटाचा क्षण ईश्वराच्या जवळ जाण्याचा वेळ असतो.

4)सत्य ओळखा

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा अशी वेळ येतेच की जेव्हा त्याला अनेक वेळा लपवलेले खोटे, खरे बोलावे लागते. परंतु तोंडातुन सत्य निघत नाही.कसली तरी भीती मनाला घेरून ठेवते. जसे घडले होते तसें सांगणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु कधी कधी ते खरे सांगण्यात सुद्धा भीती वाटते. कदाचित कोणत्या दुसऱ्याच्या भावना दुःखवू नये म्हणून सुद्धा कधी कधी आपण ते लपवतो.

आपण कधी विचार केलाय का की, मनात भीती असताना सुद्धा कधी तरी आपण सत्य बोलून जातो त्यावेळी आपण एकदम निर्भय असतोत. सत्याची व्याख्या हीच तर आहे, न भिता अतिशय निर्भयपणे होणारे परिणाम माहिती असून सुद्धा जो कोणी आपल्या आयुष्यातील घटना मांडतो तो सत्य बोलत असतो. कारण निर्भयता हे आत्माचे  सामायांक आहे.

5) टॉपर कसे बनावे?

सर्वांत श्रेष्ठ कसे बनायचे? श्रेष्ठ असण्याचा अर्थ आहे दुसऱ्यापेक्षा अधिक ज्ञान प्राप्त करणे. अर्थात हे जरुरी नाही की तुम्ही किती ज्ञान प्राप्त केले आहे जरुरी हे आहे की तुम्ही प्राप्त केलेले ज्ञान हे इतरांपेक्षा किती जास्त आहे.

तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या श्रीकृष्णाने सांगितल्या आहेत. या आचरणात आणून तुम्ही तुमचे जिवंत सफल करू शकता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here