आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

इजिप्तच्या पिरॅमिडचे हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जर मी तुम्हाला विचारले की जगातील सर्वात सुंदर ठिकाण कोणते तर तुमच्या मनात येईल की जम्मू-काश्मीर, स्विझर्लंड किंवा दुसरे कोणतेही ठिकाण, परंतु जर मी तुम्हाला विचारले की जगातील सगळ्यात रहस्यने भरलेले ठिकाण कोणते तर त्याचे उत्तर असेल इजिप्त.

जवळपास चार हजार वर्षाच्या अगोदर इजिप्तमध्ये इजिप्तशियन लोक राज्य करत होते. हे लोक एक उत्तम प्रकारचे कलाकार होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत . त्याचबरोबर ते काही अनोख्या रहस्यमय गोष्टी आपल्यासाठी सोडून गेले आहेत. परग्रहावर मानवांची वस्ती असणे , त्यांनी बांधलेले पिरॅमिड आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांसोबत एका लाईन मध्ये असणे ,त्याचबरोबर पिरॅमिडच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या थंड वातावरण असणे जे की तापमानाला २० डिग्री पेक्षा कमी ठेवणे, असणे अशा अनेक गोष्टी आहेत याचा शोध आजपर्यंत वैज्ञानिकांना ही लागलेला नाही.

सगळ्यात मोठे आश्चर्य हे आहे की तिथल्या लोकांनी एवढे मोठे अवाढव्य बांधकाम कसे केले असेल. जिथे फक्त पिरॅमिड नाही तर विश्वास न ठेवता येणाऱ्या खूप कलाकृती आहेत. काय सगळ्या वस्तू एकट्यानेच बनवलेल्या असतील.

पिरॅमिड

इजिप्तचे ‘पिरॅमिड’ या संपूर्ण जगातील आश्चर्यकारक व लक्षवेधी वास्तु आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या पिरॅमिड वरती मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धती वापरून त्याला समजून घेतले जात आहे, परंतु आजपर्यंत याचे रहस्य कोणी सोडवू शकले नाही.

या लोकांनी बांधकामासाठी लागणारे दगड कुठून आणली असतील, याला एका लाईन मध्ये कसे काय बसवले असेल,यासाठी कोणते कॉंक्रीट त्यांनी वापरले असेल, कोणतेही मशीन किंवा साधन न वापरता अशा वास्तू बनवणे वैज्ञानिकांच्या दृष्टीने अशक्य आहे.

एका पिरॅमिडमध्ये जवळपास २३ लाख चुनखडक वापरले गेले आहेत. या दगडांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे खूप कठीण आहे हे तर मग हे दगड पिरॅमिड बांधताना एका लाईन मध्ये बसवणे हे तर खूपच अशक्य गोष्ट आहे ,पण या दोन्ही गोष्टी यांनी करून दाखवल्या आहेत.

पिरॅमिड साठी वापरल्या जाणाऱ्या एका दगडाचे वजन जवळपास सत्तावीनशे किलो ते सत्तर हजार किलो यांच्या दरम्यान आहे.

आजच्या जगात मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी आपण जे मॉडर्न क्रेन वापरतो ते जास्तीत जास्त २० हजार किलो वजन उचलू शकतात. विचार करा आज एवढं तंत्रज्ञान असताना हे मुश्किल आहे तर जवळपास चार हजार वर्षापूर्वी या लोकांनी हे कसे करून दाखवले.

आता प्रश्न असा की हे पिरॅमिड नेमके का व कशासाठी बनवलेले असेल.परंतु याच्याबद्दल कोणतेच ठोस संशोधन नसल्यामुळे असे सांगितले जाते की हे पिरॅमिड त्याकाळी तेथे राज्य करणाऱ्या राजा व राणी यांची समाधी बांधण्यासाठी तयार केले गेले. ‘ममी’ बद्दल तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकले असेल तर जे लोक राजा आणि राणी यांच्या समाधीसाठी ही वास्तू आहे असे मानतात त्यांच्या म्हणण्यानुसार राजा व राणी त्यांच्या शरीराला ममी बनवून त्यांना समाधीमध्ये ठेवण्यात येत असे, परंतु एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की आज पर्यंत या पिरामिड मध्ये असे किती शरीर सापडले तर याचे उत्तर आहे ‘शून्य’. हे खर आहे. आजपर्यंत एकही ममी रूपातील शरीर येथे सापडलेले नाही.

पिरॅमिड

पिरॅमिडचे संशोधन आजपर्यंत संपूर्ण पद्धतीने करण्यात आलेले नाही पण जेवढे संशोधन झाले त्यावरुन असे समोर आले की पिरॅमिडच्या दगडावरती कोणत्याही प्रकारचा संदेश किंवा कोणतेही स्वरूपातील लेखन सापडले नाही. जे की इजिप्तच्या इतर वास्तूमध्ये आढळून येते. या सर्व गोष्टीवरून असा तर्क लावण्यात येतो की हे पिरॅमिड राजा व राणी यांच्या समाधीसाठी बनवले गेले नसून ते कोणत्यातरी इतर कारणासाठी तयार करण्यात आले होते.

जर तुम्ही संपूर्ण जगाचा नकाशा घेतला आणि त्या नकाशा मध्ये जगाचा मध्य भाग शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असे दिसून येईल की ज्या ठिकाणी पिरॅमिड बनवले गेले आहेत तोच पूर्ण जगाचा भौगोलिक मध्य आहे.

पिरामिड साठी वापरले गेलेले दगड साधारण दगडाच्या कितीतरी पटीने मजबूत आहेत. वैज्ञानिकांनी या दगडावरती खूप संशोधन केले. हे दगड चुनखडक सारखे आहेत पण ते चुनखडक नाहीत. वैज्ञानिकांना असे दगड इतर कुठेही सापडले नाहीत . पिरॅमिड चे बांधकाम इतके मजबूत आहे की कोणत्याही प्रकारच्या भूकंपाचा यावर परिणाम होत नाही .

दुसरी गोष्ट म्हणजे पिरॅमिडच्या बाजूला असलेल्या वाळवंटात उष्ण वातावरण असते परंतु पिरॅमिडच्या आतमध्ये एकदम थंड वातावरण असते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here