===
जगातील आठ रहस्यमय आणि आश्चर्यकारक ठिकाणे…
जगामध्ये अशी आणि ठिकाणे आहेत जी अनेक गुप्त रहस्याने भरलेली आहेत ,या रहस्याने भरलेल्या ठिकाणाबद्दल जास्त कुणाला माहीत नाही .काही ठिकाणांचे रहस्य आज पर्यंत शास्त्रज्ञ सुद्धा सांगू शकलेले नाहीत. चला तर मग आज जाणून घेऊया जगातील आठ रहस्याने भरलेल्या ठिकाणाबद्दल.
१. ब्लड फॉल अंटार्टिका

पहिल्या ठिकाणाचे नाव आहे ब्लड फॉल अंटार्टिका अंटार्टिका खंडाच्या टेलर बर्फाच्छादित प्रदेशात हे रहस्य वसलेले आहे. या बर्फाच्छादित प्रदेशात एक जागा अशीही आहे जिथे लाल रंगाचा झरा वाहतो. याला पाहिल्यावर असे वाटते या झऱ्या मधून रक्त वाहत आहे. याचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी खूप प्रयत्न केले परंतु त्यामागचे अचूक कारण त्यांना सापडले नाही. वैज्ञानिकांनी यामध्ये असे अनुमान लावले की या जागेच्या बर्फाखाली लोह खनिजाचे प्रमाण जास्त आहे ज्यामुळे पाण्याला लाल रंग येतो .आजही हा लाल पाण्याचा झरा एक रहस्य बनून आहे
२.मॅग्नेटिक हिल मौंटन न्यू ब्रुन्सविक
ही मॅग्नेटिक हिल तिच्या एका वेगळ्याच राहस्यासाठी प्रसिद्ध आहे. या मॅग्नेटिक हिल वरती असा एक चुंबकीय प्रभाव आहे की वाहने चालू न करताच चालू लागतात. या ठिकाणाचा शोध १९३० मध्ये लागला आहे.या रस्त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे .ही जागा मोठ्या स्तरावर पर्यटन क्षेत्र बनलेलं आहे.भारताच्या लदाख क्षेत्रामध्ये सुद्धा एक मॅग्नेटिक हिल आहे.
३. मोराखी बोल्डर्स(दगड-गोटे) न्युझीलँड
न्यूझीलंडच्या पूर्व किनाऱ्यावर जवळपास बारा फुटापर्यंत दगडांचे ढिगारे आहेत. हे दगड दिसायला गोलाकार व मोती सारखे आहेत. याचे निर्माण लाखो वर्षापूर्वी कोणत्यातरी जीवनामुळे किंवा एखाद्या वस्तूच्या भोवती समुद्र रेती जमल्यामुळे झाली आहे. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत येथे अशा गोष्टी आढळून आल्या आहेत पण या ठिकाणी ही रचना अत्यंत अवाढव्य रुपात आहे.
४.लॉंगइअरब्येन नॉर्वे
स्वालबार्ड अंटार्टिका सागराच्या ग्रीन लँड वर नॉर्वे दीप समूह आहे. या जागेबद्दल असं म्हटलं जात आहे की याठिकाणी २० एप्रिल पासून २३ ऑगस्ट पर्यंत सूर्यास्त होत नाही. रात्र असो की दिवस येथे सूर्य असतोच.
५.पमुक्ले तुर्की
तुर्कीच्या पमुक्ले ठिकाणी असलेली ही जागा आपल्या वेगळ्या आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे.येथे सतरा प्रकारचे गरम पाण्याचे झरे आहेत.गरम पाण्याचे झरे येथे हजारो वर्षापासून आहेत . झऱ्यायातून बाहेर येणाऱ्या पाण्यात असलेले खनिज हवेच्या संपर्कात आल्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते हे कॅल्शियम कार्बोनेट झऱ्याच्या किनाऱ्यावरती हजारो सालापासून जमा होत आहे त्यामुळे या घरांचा आकार स्विमिंग तुला सारखा झाला आहे .या झऱ्याच्या पाण्याचे तापमान ३७ डिग्री पासून १०० डिग्री पर्यंत असते. अशा पाण्यामध्ये अंघोळ करणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.
६.इटरनल क्लेम फॉल( वाहत्या धबधब्याखाली पेटती ज्वाला) न्यूयॉर्क
या ठिकाणी एक छोटासा झरा वाहतो ज्याच्यामध्ये एक जळणारी ज्वाला दिसते. पाहणारा प्रत्येक विचार करतो कि येथे ही ज्वाला कशी काय जळत आहे. शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले आहे की याठिकाणी दगडांच्या मधून मिथेन गॅस बाहेर येतो .विसाव्या सुरुवातीला कोणीतरी मिथेन गॅसला आग लावली तेव्हापासून ही ज्योत अशीच जळत आहे.
७. मोव्हिंग स्टोन्स(हलणारे दगड) कॅलिफोर्निया
या ठिकानाचे रहस्य सर्वांपेक्षा वेगळे आहे .याठिकाणी असणार्या काही दगडांचे आपोआप सरकणे ही नासा साठी सुद्धा एक रहस्यमय गोष्ट बनून राहिली आहे .याठिकाणी असणारा प्रदेश एकदम सपाट आहे परंतु या ठिकाणी असणाऱ्या दगडांची हालचाल आपोआप एका जागेहून दुसर्या जागी होत असते .इथे असे एकूण दीडशे दगड आहेत परंतु या दगडांना हलताना कोणी डोळ्यांनी पाहिलेले नाही .खूप वर्षापासून हे दगड जवळपास अडीचशे किलोमीटर हालचाल होताना आढळून आले आहेत. वैज्ञानिकांनी असे सांगितले आहे की वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या दगडांच्या हालचाल होते.
८.ओल्ड फेथफुल ,यलो स्टोन नॅशनल पार्क
यलो स्टोन नॅशनल पार्क मध्ये जगातील सर्वात जास्त गरम पाण्याच्या फवारे आहेत. यामध्ये पाणी जमिनीमधून कारंजा चा फवारा सारखे बाहेर पडते .या परीसरात जवळजवळ तीनशे नैसर्गिक पाण्याचे फवारे आहेत परंतु यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे ‘ओल्ड फेथफुल ‘ कारण हा जगातला सर्वात जास्त उंचीचा गरम पाण्याचा फवारा आहे. यातून कायम विस्फोट होत असतात मात्र याचे कारण अजून समजू शकले नाही.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!